Rishabh Pant: ऋषभ पंतच अपघातानंतर पहिलं टि्वट, करिअरबद्दल केलं मोठं वक्तव्य

Rishabh Pant first reaction after accident: डेहराडूनच्या मॅक्स हॉस्पिटलमध्ये उपचार झाले. त्यानंतर त्याला मुंबईच्या कोकिलाबेन हॉस्पिटलमध्ये शिफ्ट करण्यात आलं. अपघातानंतर ऋषभ पंतने सोशल मीडियावर पहिली पोस्ट केलीय.

Rishabh Pant: ऋषभ पंतच अपघातानंतर पहिलं टि्वट, करिअरबद्दल केलं मोठं वक्तव्य
Follow us
| Updated on: Jan 17, 2023 | 10:31 AM

Rishabh Pant first reaction after accident: टीम इंडियाचा विकेटकीपर बॅट्समन ऋषभ पंतच्या कारला मागच्यावर्षी भीषण अपघात झाला होता. दिल्लीवरुन रुडकी येथे जात असताना हा भीषण अपघात झाला होता. अपघातानंतर ऋषभ पंतवर आधी डेहराडूनच्या मॅक्स हॉस्पिटलमध्ये उपचार झाले. त्यानंतर त्याला मुंबईच्या कोकिलाबेन हॉस्पिटलमध्ये शिफ्ट करण्यात आलं. अपघातानंतर ऋषभ पंतने सोशल मीडियावर पहिली पोस्ट केलीय. सर्जरी यशस्वी झाली. पुढच्या आव्हानांसाठी मी तयार आहे, असं पंतने त्याच्या टि्वटमध्ये म्हटलं आहे. कठीण काळात साथ दिल्याबद्दल ऋषभ पंतने बीसीसीआय, फॅन्स, सरकारी अथॉरिटीचे आभार मानले. पंतला मैदानात लवकर पुनरागमन करायचं आहे.

ऋषभने टि्वटमध्ये काय म्हटलय?

“सपोर्ट आणि शुभेच्छाबद्दल मी तुमचा आभारी आहे. माझी सर्जरी यशस्वी झाली हे तुम्हाला सांगताना मला आनंद होतोय. रिकव्हरी सुरु झालीय. मी पुढच्या आव्हानांसाठी सज्ज आहे. बीसीसीआय, जय शाह आणि सरकारी अथॉरिटीचे आभार” असं ऋषभने त्याच्या टि्वटमध्ये म्हटलय.

तुमच्या शब्दांनी मला धीर दिला

“मी मनापासून माझे चाहते, संघातील सहकारी, डॉक्टर आणि फिजियो यांचे आभार मानतो. तुमच्या शब्दांनी मला धीर दिला. माझी हिम्मत वाढवली. तुम्हा सर्वांना मैदानावर पाहण्यासाठी मी उत्सुक आहे” असं ऋषभने त्याच्या दुसऱ्या टि्वटमध्ये म्हटलय.

सहा आठवड्यानंतर आणखी एक शस्त्रक्रिया

ऋषभ पंतवर मुंबईच्या कोकिलाबेन हॉस्पिटमध्ये गुडघ्यावर लिगामेंट शस्त्रक्रिया झाली. आता सहा आठवड्यानंतर ऋषभवर आणखी एक सर्जरी होऊ शकते. ऋषभ आयपीएल, आशिया कप तसच ऑक्टोबर-नोव्हेंबरमध्ये होणाऱ्या वर्ल्ड कप स्पर्धेला मुकू शकतो. लिगामेंट शस्त्रक्रियेनंतर रिकव्हरीसाठी 6 ते 8 महिन्यांचा कालावधी लागतो. हे कुठल्या चमत्कारापेक्षा कमी नाही

ऋषभ पंतच या भीषण रस्ते अपघातातून वाचणं हे कुठल्या चमत्कारापेक्षा कमी नाही. त्याची कार डिवायडरला धडकून पलटी झाली. त्यानंतर कारने पेट घेतला. पंत कसाबसा कारबाहेर पडण्यात यशस्वी ठरला. हरियाणा रोडवेजचा ड्रायव्हर सुशील कुमारने पंतची मदत केली. या बस ड्रायव्हर आणि कंडक्टरचा उत्तराखंड सरकारने नंतर सन्मान केला.

250 कोटींचा पीकविमा घोटाळ्याचा पॅटर्न, धस अण्णा यांचे मुंडेंवर निशाणा
250 कोटींचा पीकविमा घोटाळ्याचा पॅटर्न, धस अण्णा यांचे मुंडेंवर निशाणा.
'माझ्या मुलाचा मर्डर..', सोमनाथ सूर्यवंशीच्या आईच्या पवारांसमोरच संताप
'माझ्या मुलाचा मर्डर..', सोमनाथ सूर्यवंशीच्या आईच्या पवारांसमोरच संताप.
Mumbai Boat Accident कसा झाला, त्याला जबाबदार कोण?
Mumbai Boat Accident कसा झाला, त्याला जबाबदार कोण?.
'दादा, त्याला मंत्रिमंडळातून काढा..',अजित पवारांसमोर गावकऱ्यांचा संताप
'दादा, त्याला मंत्रिमंडळातून काढा..',अजित पवारांसमोर गावकऱ्यांचा संताप.
हवा तर पोलीस बंदोबस्त देऊ,कोणालाही पाठीशी घालणार नाही - अजित पवार
हवा तर पोलीस बंदोबस्त देऊ,कोणालाही पाठीशी घालणार नाही - अजित पवार.
संतोष देशमुख यांच्या मुलीच्या शिक्षणाची जबाबदारी आम्ही घेतो -शरद पवार
संतोष देशमुख यांच्या मुलीच्या शिक्षणाची जबाबदारी आम्ही घेतो -शरद पवार.
'परभणी प्रकरणात खरी वस्तूस्थिती जाणून...,' काय म्हणाले शरद पवार ?
'परभणी प्रकरणात खरी वस्तूस्थिती जाणून...,' काय म्हणाले शरद पवार ?.
मस्साजोग प्रकरणात अख्खं गाव...',पवार भेटीवर काय म्हणाले खासदार सोनावणे
मस्साजोग प्रकरणात अख्खं गाव...',पवार भेटीवर काय म्हणाले खासदार सोनावणे.
संजय राऊत रेकी प्रकरणानंतर मंत्री नितेश राणे म्हणाले की मच्छर...
संजय राऊत रेकी प्रकरणानंतर मंत्री नितेश राणे म्हणाले की मच्छर....
देवेंद्र फडणवीस यांच्या अवतीभोवतीची मंडळी कोण ? संजय राऊत यांचा सवाल
देवेंद्र फडणवीस यांच्या अवतीभोवतीची मंडळी कोण ? संजय राऊत यांचा सवाल.