Rishabh Pant: ‘हे’ आहेत ऋषभ पंतचे प्राण वाचवणारे दोन हिरो, स्वत: ऋषभने केला नावाचा खुलासा

Rishabh Pant: या भीषण अपघातातून ऋषभ पंत सुदैवाने बचावला. ऋषभच्या हाताला, डोक्याला, कमरेला आणि पोटाला मार लागला. पंतने अपघातानंतर सोमवारी पहिल्यांदा सोशल मीडियावर पोस्ट करुन माहिती दिली.

Rishabh Pant: 'हे' आहेत ऋषभ पंतचे प्राण वाचवणारे दोन हिरो, स्वत: ऋषभने केला नावाचा खुलासा
Rishabh pant
Follow us
| Updated on: Jan 17, 2023 | 10:32 AM

मुंबई: मागच्या महिन्यात ऋषभ पंतच्या कारला भीषण अपघात झाला होता. रुडकी येथे जात असताना कार डिवायडरला धडकून पलटी झाली. त्यानंतर कारने पेट घेतला. या भीषण अपघातातून ऋषभ पंत सुदैवाने बचावला. ऋषभच्या हाताला, डोक्याला, कमरेला आणि पोटाला मार लागला. पंतने अपघातानंतर सोमवारी पहिल्यांदा सोशल मीडियावर पोस्ट करुन माहिती दिली. पंतने त्याची हेल्थ अपडेट देताना सर्जरी यशस्वी झाल्याच सांगितलं. त्याने फॅन्स आणि हितचिंतकांचे आभार मानले. पंतने यावेळी त्याचे प्राण वाचवणाऱ्या दोघांचा आवर्जुन उल्लेख केला.

या दोन हिरोंना कधी विसरणार नाही

हे सुद्धा वाचा

ऋषभ पंतने त्याच्या टि्वटर अकाऊंटवर प्राण वाचवणाऱ्या दोन मुलांचे फोटो शेअर केले व त्यांच्या नावाचा खुलासा केला. या दोन मुलांनी हॉस्पिटलमध्ये जाऊन पंतची विचारपूसही केली होती. “मी व्यक्तीगत प्रत्येकाचे आभार मानू शकत नाही. पण या दोन हिरोंना कधी विसरणार नाही. अपघातानंतर त्यांनी माझी मदत केली. मी व्यवस्थित हॉस्पिटलमध्ये कसा पोहोचीन? हे त्यांनी सुनिश्चित केलं. रजत कुमार आणि निशु कुमार तुम्हा दोघांचे भरपूर आभार. मी नेहमीच तुमचा आभारी आणि ऋणी राहीन” असं पंतने त्याच्या टि्वटमध्ये म्हटलय.

सहा आठवड्यानंतर ऋषभवर आणखी एक सर्जरी

अपघातानंतर ऋषभ पंतवर आधी डेहराडूनच्या मॅक्स हॉस्पिटलमध्ये उपचार झाले. त्यानंतर त्याला मुंबईच्या कोकिलाबेन हॉस्पिटलमध्ये शिफ्ट करण्यात आलं. ऋषभ पंतवर मुंबईच्या कोकिलाबेन हॉस्पिटमध्ये गुडघ्यावर लिगामेंट शस्त्रक्रिया झाली. आता सहा आठवड्यानंतर ऋषभवर आणखी एक सर्जरी होऊ शकते. ऋषभ आयपीएल, आशिया कप तसच ऑक्टोबर-नोव्हेंबरमध्ये होणाऱ्या वर्ल्ड कप स्पर्धेला मुकू शकतो. लिगामेंट शस्त्रक्रियेनंतर रिकव्हरीसाठी 6 ते 8 महिन्यांचा कालावधी लागतो. डॉक्टरांचे मानले आभार

“मी मनापासून माझे चाहते, संघातील सहकारी, डॉक्टर आणि फिजियो यांचे आभार मानतो. तुमच्या शब्दांनी मला धीर दिला. माझी हिम्मत वाढवली. तुम्हा सर्वांना मैदानावर पाहण्यासाठी मी उत्सुक आहे” असं ऋषभने त्याच्या दुसऱ्या टि्वटमध्ये म्हटलय.

हवा तर पोलीस बंदोबस्त देऊ,कोणालाही पाठीशी घालणार नाही - अजित पवार
हवा तर पोलीस बंदोबस्त देऊ,कोणालाही पाठीशी घालणार नाही - अजित पवार.
संतोष देशमुख यांच्या मुलीच्या शिक्षणाची जबाबदारी आम्ही घेतो -शरद पवार
संतोष देशमुख यांच्या मुलीच्या शिक्षणाची जबाबदारी आम्ही घेतो -शरद पवार.
'परभणी प्रकरणात खरी वस्तूस्थिती जाणून...,' काय म्हणाले शरद पवार ?
'परभणी प्रकरणात खरी वस्तूस्थिती जाणून...,' काय म्हणाले शरद पवार ?.
मस्साजोग प्रकरणात अख्खं गाव...',पवार भेटीवर काय म्हणाले खासदार सोनावणे
मस्साजोग प्रकरणात अख्खं गाव...',पवार भेटीवर काय म्हणाले खासदार सोनावणे.
संजय राऊत रेकी प्रकरणानंतर मंत्री नितेश राणे म्हणाले की मच्छर...
संजय राऊत रेकी प्रकरणानंतर मंत्री नितेश राणे म्हणाले की मच्छर....
देवेंद्र फडणवीस यांच्या अवतीभोवतीची मंडळी कोण ? संजय राऊत यांचा सवाल
देवेंद्र फडणवीस यांच्या अवतीभोवतीची मंडळी कोण ? संजय राऊत यांचा सवाल.
धूप-अगरबत्ती लावण्यावरून वाद, मराठी कुटुंबाला बेमद मारहाण, अखेर मुजोर
धूप-अगरबत्ती लावण्यावरून वाद, मराठी कुटुंबाला बेमद मारहाण, अखेर मुजोर.
'तो माझाच माल, त्याला कोणाची काही...', राऊतांवर शिवसेना नेत्याचा टोला
'तो माझाच माल, त्याला कोणाची काही...', राऊतांवर शिवसेना नेत्याचा टोला.
'माझ्यासह पत्नीला वर्षापासून त्रास अन् शिवीगाळ पण आता मराठी...'- आरोपी
'माझ्यासह पत्नीला वर्षापासून त्रास अन् शिवीगाळ पण आता मराठी...'- आरोपी.
परळीत अजितदादा गटाच्या माजी नगरसेविकेच्या मुलानं कर्मचाऱ्याला धुतलं
परळीत अजितदादा गटाच्या माजी नगरसेविकेच्या मुलानं कर्मचाऱ्याला धुतलं.