टी 20 वर्ल्ड कप जिंकायचा असेल, तर इशान किशनला बाहेर बसवा, ऑस्ट्रेलियन दिग्गजाने सांगितलं कारण
यंदा ऑक्टोबर-नोव्हेंबर मध्ये ऑस्ट्रेलियात (Australia) टी 20 वर्ल्ड कप (T20 World Cup) स्पर्धा होणार आहे. आज जगभरात जिथे-जिथे टी 20 चे आंतरराष्ट्रीय सामने सुरु आहेत, तिथे आगामी वर्ल्ड कप डोळ्यासमोर ठेवून संघांच्या कामगिरीचं मुल्यमापन होतय.
मुंबई: यंदा ऑक्टोबर-नोव्हेंबर मध्ये ऑस्ट्रेलियात (Australia) टी 20 वर्ल्ड कप (T20 World Cup) स्पर्धा होणार आहे. आज जगभरात जिथे-जिथे टी 20 चे आंतरराष्ट्रीय सामने सुरु आहेत, तिथे आगामी वर्ल्ड कप डोळ्यासमोर ठेवून संघांच्या कामगिरीचं मुल्यमापन होतय. प्रत्येक टीम आपली सर्वश्रेष्ठ प्लेइंग इलेव्हन निवडण्याचा प्रयत्न करतेय. भारतीय संघाबाबत बोलायचं झाल्यास, काही खेळाडूंच ऑस्ट्रेलियाला जाणं निश्चित आहे, पण काही खेळाडूंच्या स्थानाबद्दल अजूनही अस्पष्टता आहे. ऑस्ट्रेलियाचा दिग्गज क्रिकेटपटू रिकी पाँटिंगने (Ricky Ponting) त्याला संधी मिळाल्यास, तो कुठल्या खेळाडूंना निवडेल, त्या बद्दल सांगितलं.
दिनेश कार्तिक आणि ऋषभ पंत बद्दल पाँटिंग काय विचार करतो?
“विकेटकीपर फलंदाज म्हणून मी ऋषभ पंत आणि दिनेश कार्तिकला संधी देईन, पण इशान किशनला नाही” असं पाँटिंगने सांगितलं. ऋषभ पंत आयपीएल मध्ये दिल्ली कॅपिटल्सकडून खेळतो तो कॅप्टन आणि पाँटिंग त्या टीमचा कोच आहे. “वनडे फॉर्मेट मध्ये ऋषभ काय करु शकतो? हे आपण पाहिलं. टी 20 मध्ये तो काय करु शकतो? त्याच्या क्षमतेची मला पूर्ण कल्पना आहे. दिनेश कार्तिकने सुद्धा यंदाच्या आयपीएल मध्ये दमदार कामगिरी केली. मला विचारलं, तर मी या दोन्ही खेळाडूंना टीम मध्ये ठेवण्याचा प्रयत्न करीन” असं पाँटिंगने सांगितलं.
पंत-कार्तिक हवेतच
“फलंदाजीबद्दल बोलायचं झाल्यास, ऋषभ पंत तिसऱ्या आणि चौथ्या नंबरवर फिट आहे. त्याच्यानंतर दिनेश आणि हार्दिक पंड्याचा नंबर येईल. याचाच अर्थ इशान किशन, सूर्यकुमार यादव किंवा श्रेयस अय्यरला बाहेर बसवाव लागेल. तुमच्याकडे विपुल प्रमाणात प्रतिभावान खेळाडू असतील, तर संघ निवड कठीण होऊन बसते. पंत आणि कार्तिकच्या बाबतीत मी, इशान किशनपेक्षा दोघांना जास्त प्राधान्य देईन” असं पाँटिंगच मत आहे.
कोहली बद्दल काय म्हटलं?
“विराट कोहलीला वर्ल्ड कपच्या संघातून वगळलं. त्याच्याजागी संघात येणाऱ्या खेळाडूने चांगलं प्रदर्शन केलं, तर कोहलीचा संघात पुनरागमन करण्याचा मार्ग अजून खडतर होईल” असं पाँटिंग म्हणाला. ‘मी असतो, तर कोहलीला भरपूर संधी दिल्या असत्या’, असं पाँटिंग म्हणाला. “कोहलीला त्याचा आत्मविश्वास पुन्हा मिळाला, तर त्याच्या इतका दुसरा सर्वोत्तम खेळाडू नाहीय. मी टीम इंडियाचा कॅप्टन किंवा कोच असतो, तर कोहलीसाठी शक्य तितक्या गोष्टी सोप्या करण्याचा प्रयत्न केला असता” असं पाँटिंगने सांगितलं.