VIDEO : रोहितंच अप्रतिम शतक, रितीकाची Flying Kiss, व्हिडीओपाहून चाहतेही घायाळ

इंग्लंडविरुद्धच्या चौथ्या कसोटीच्या तिसऱ्या दिवशी रोहितने आपल्या कसोटी कारकिर्दीतील आठवे शतक झळकावले. परदेशी भूमीवरचे रोहितचे हे पहिले कसोटी शतक आहे.

VIDEO : रोहितंच अप्रतिम शतक, रितीकाची Flying Kiss, व्हिडीओपाहून चाहतेही घायाळ
रोहित आणि रितीका
Follow us
| Updated on: Sep 05, 2021 | 5:35 PM

लंडन : भारत आणि इंग्लंड यांच्यातील दौरा चांगलाच रंगला आहे. पहिला सामना अनिर्णीत सुटल्या नंतर दुसरा भारताने तर तिसरा सामना इंग्लंडने जिंकला. आता चौथी कसोटीही अगदी रंगात आली आहे. दरम्यान चौथ्या कसोटीच्या तिसऱ्या दिवशी भारताचा हिटमॅन रोहित शर्माने (Rohit Sharma) अप्रतिम शतक झळकावत परदेशी भूमीवर पहिलं कसोटी शतक ठोकलं आहे. त्याच्या या शतकावर सर्वच भारतीय फिदा झाले असताना पत्नी रितीकाही (Ritika sajdeh) कमालीची आनंदी झाली आहे. तिने तर शतक ठोकल्यानंतर रोहितला थेट फ्लाईंग किस देत त्याच अभिनंदन केलं आहे.

एकीकडे भारताचे इतर फलंदाज संघर्ष करताना दिसले आहेत, तर रोहित शर्मा वेगळ्याच फॉर्ममध्ये दिसत आहे. रोहितने लॉर्ड्स आणि हेडिंग्ले येथे खेळवण्यात आलेल्या कसोटी सामन्यांमध्ये शानदार खेळी साकारल्या आणि अर्धशतके केली होती, पण तो त्या अर्धशतकांचे शतकांत रूपांतर करू शकला नाही. रोहितने ओव्हल मैदानावर खेळवल्या जाणाऱ्या चौथ्या कसोटी सामन्यात ही कामगिरी पूर्ण केली. त्यांच्या या कामगिरीनंतर सर्वत्र त्याचं अभिनंदन होत असून पत्नी रितीकाने दिलेल्या फ्लाईंग किसचा व्हिडीओही व्हायरल होत आहे.

रोहितची अनेक विक्रमांना गवसणी

दरम्यान, रोहितची खेळी 127 धावांवर संपुष्टात आली आहे. मात्र त्याअगोदर त्याने अनेक विक्रम आपल्या नावे केले आहेत. आजच्या शतकी खेळीसह रोहितने त्याच्या आंतरराष्ट्रीय क्रिकेट कारकिर्दीतल्या 15000 धावांचा टप्पा पार केला आहे. तसेच त्याने कसोटी कारकिर्दीतल्या 3000 धावा पूर्ण केल्या आहेत. रोहितने इंग्लंडविरोधात क्रिकेटच्या तिन्ही फॉरमॅटमध्ये मिळून 3000 धावा पूर्ण केल्या आहेत. तसेच सलामीवीर म्हणून त्याने 11000 धावांचा डोंगर सर केला आहे. 2021 या वर्षात रोहितने 1000 आंतरराष्ट्रीय धावा जमवल्या आहेत.

रोहित नोव्हेंबर 2013 मध्ये कोलकाता येथे पहिला कसोटी सामना खेळला होता, पण त्यानंतर तो कसोटीत परदेशी भूमीवर शतक झळकावू शकला नाही. ही कमतरता रोहितने यावेळी इंग्लंडमध्ये सात वर्षानंतर (2021) मध्ये पूर्ण केली. रोहितने षटकार मारून कसोटीत शतक पूर्ण करण्याची ही तिसरी वेळ आहे.

इतर बातम्या

IND vs ENG 4th Test Day 4 Live: मोठी धावसंख्या उभी करण्यासाठी भारतीय सज्ज, विराट-जाडेजाची जोडी मैदानात

मॅचनंतर दादा ही कामं करायला सांगायचा, केबीसीच्या सेटवर सेहवाग-गांगुलीचा कलगीतुरा, बिग बी बघतच राहिले!

तो परत आला… भारताच्या गोलंदाजीवेळी Jarvo 69 मैदानात, इंग्लंडच्या फलंदाजाला दिला धक्का!

(Ritika sajdeh Giving Flying kiss to husband Rohit Sharma for his century at india vs England 4th test Video Went viral)

नाही लाल दिवा, आम्ही जातो आमच्या गावा; मंत्रिपद हुकल्यानं कोण नाराज?
नाही लाल दिवा, आम्ही जातो आमच्या गावा; मंत्रिपद हुकल्यानं कोण नाराज?.
श्रीरामाच्या घोषणा,जीवाला धोका रात्री 3.30 वाजता अंधारेंसोबत काय झालं?
श्रीरामाच्या घोषणा,जीवाला धोका रात्री 3.30 वाजता अंधारेंसोबत काय झालं?.
थर्टी फस्ट पार्टीसाठी किल्ल्यांवर जाताय? पण असं वागाल तर १ लाखांचा दंड
थर्टी फस्ट पार्टीसाठी किल्ल्यांवर जाताय? पण असं वागाल तर १ लाखांचा दंड.
भाजपच्या या 4 नेत्याचं सत्तेत कमबॅक, लालदिव्याची प्रतीक्षा अखेर संपली
भाजपच्या या 4 नेत्याचं सत्तेत कमबॅक, लालदिव्याची प्रतीक्षा अखेर संपली.
भरतशेठ... झाले थोडे लेट पण कॅबिनेटच आणलं थेट! मंत्रिपदाची माळ गळ्यात
भरतशेठ... झाले थोडे लेट पण कॅबिनेटच आणलं थेट! मंत्रिपदाची माळ गळ्यात.
'हा मैं नाराज, वहाँ नही रहेना..',भुजबळांचा भडका अन् हाती बंडाचा झेंडा?
'हा मैं नाराज, वहाँ नही रहेना..',भुजबळांचा भडका अन् हाती बंडाचा झेंडा?.
'मंत्रिमंडळात नाव आहे, असं सांगितलं अन् शपथविधीच्या वेळी वगळलं...'
'मंत्रिमंडळात नाव आहे, असं सांगितलं अन् शपथविधीच्या वेळी वगळलं...'.
छगन भुजबळांचा मंत्रिमंडळातून पत्ता कट, मनोज जरांगे पहिली प्रतिक्रिया
छगन भुजबळांचा मंत्रिमंडळातून पत्ता कट, मनोज जरांगे पहिली प्रतिक्रिया.
मंत्रिमंडळातून पत्ता कट शिवतारे भडकले, 'आता अडीच वर्षांनी मंत्रिपद...'
मंत्रिमंडळातून पत्ता कट शिवतारे भडकले, 'आता अडीच वर्षांनी मंत्रिपद...'.
मंत्रिमंडळ विस्तारानंतर नाराजी नाट्य, कोण-कोणत्या नेत्यांमध्ये नाराजी?
मंत्रिमंडळ विस्तारानंतर नाराजी नाट्य, कोण-कोणत्या नेत्यांमध्ये नाराजी?.