IND vs WI : वेस्ट इंडिजविरुद्धच्या तिसऱ्या T20 सामन्यात ऋतुराज गायकवाड, आवेश खानला संधी मिळणार?

भारत आणि वेस्ट इंडिज (INDvsWI) यांच्यात आज शेवटचा तिसरा टी-20 सामना खेळवला जाणार आहे. भारताने टी-20 मालिकेत आधीच 2-0 अशी विजयी आघाडी घेतली आहे. त्यामुळे आजचा सामना भारताच्या दृष्टीने औपचारिकता आहे.

IND vs WI : वेस्ट इंडिजविरुद्धच्या तिसऱ्या T20 सामन्यात ऋतुराज गायकवाड, आवेश खानला संधी मिळणार?
Rituraj Gaikwad
Follow us
| Updated on: Feb 20, 2022 | 6:12 PM

मुंबई : भारत आणि वेस्ट इंडिज (INDvsWI) यांच्यात आज शेवटचा तिसरा टी-20 सामना खेळवला जाणार आहे. भारताने टी-20 मालिकेत आधीच 2-0 अशी विजयी आघाडी घेतली आहे. त्यामुळे आजचा सामना भारताच्या दृष्टीने औपचारिकता आहे. पण वेस्ट इंडिज आजचा सामना जिंकून किमान प्रतिष्ठा राखण्याचा प्रयत्न करेल. वनडे सीरीजप्रमाणे टी-20 मध्येही क्लीन स्वीप करण्याचा भारताचा प्रयत्न असेल. याआधी वनडे मालिकेत भारताने 3-0 असं निर्भेळ यश संपादन केलं होतं. तिसऱ्या टी-20 सामन्यापूर्वी भारतीय टीम मॅनेजमेंटने काही महत्त्वाचे निर्णय घेतले आहेत. विराट कोहली, (Virat kohli) ऋषभ पंत आणि शार्दुल ठाकूर (Shardul Thakur) या तिघांना विश्रांती दिली आहे. त्यामुळे आजच्या वेस्ट इंडिज विरुद्धच्या तिसऱ्या आणि श्रीलंकेविरुद्धच्या टी-20 सीरीजमध्ये हे तिघेही खेळताना दिसणार नाहीत. भारताने मालिका आधीच जिंकली आहे. त्यामुळे आजच्या सामन्यात भारतीय संघात अनेक बदल पहायला मिळू शकतात.

ऋतुराज गायकवाडला संधी संधी?

भारताने दुसऱ्या टी-20 सामन्यात संघात कोणतेही बदल केले नाहीत. पण मालिकेत विजयी आघाडी घेतल्यामुळे आता तिसऱ्या सामन्यात काही बदल होऊ शकतात. ऋतुराज गायकवाडला संघात संधी दिली दिली जाऊ शकते. स्थानिक क्रिकेट स्पर्धा आणि मागच्या आयपीएल सीजनमध्ये सर्वाधिक धावा करुनही ऋतुराजला अजून संधी मिळालेली नाही. गेले दोन तीन महिने तो बेंचवर बसून आहे. त्यामुळे आज त्याला संधी दिली जाऊ शकते.

आवेश खान, मोहम्मद सिराज प्लेईंग इलेव्हनमध्ये दिसणार?

गोलंदाजांमध्ये आजच्या सामन्यात आवेश खान आणि मोहम्मद सिराज या दोन खेळाडूंनाही संधी द्यावी, असे माजी दिग्गज क्रिकेटपटू सुनील गावस्कर यांचे मत आहे. सातत्याने क्रिकेट खेळत असलेल्या दीपक चाहर, भुवनेश्वर कुमारला विश्रांती देऊन आवेश खान आणि मोहम्मद सिराज या दोन वेगवान गोलंदाजांना आज प्लेईंग इलेव्हनमध्ये स्थान मिळू शकतं.

इतर बातम्या

Shikhar Dhawan: शेवटी बापच तो! घटस्फोटानंतर दोन वर्षांनी मुलाला भेटताच शिखर झाला भावूक

मुंबई-महाराष्ट्राच्या क्रिकेटपटूंवर अन्याय? दिलीप वेंगसरकर BCCI च्या निवड समितीवर भडकले

IND vs SL Series: भारताच्या कसोटी संघात निवड, कोण आहे सौरभ कुमार?

सैफवर हल्ला करणाऱ्या 'त्या' व्यक्तीचं लोकेशन ट्रेस, मुंबईच्या या भागात
सैफवर हल्ला करणाऱ्या 'त्या' व्यक्तीचं लोकेशन ट्रेस, मुंबईच्या या भागात.
सैफचा जीव घ्यायचा होता? बॉलिवूडच्या खलनायकाकडून हल्ल्याचा निषेध
सैफचा जीव घ्यायचा होता? बॉलिवूडच्या खलनायकाकडून हल्ल्याचा निषेध.
लाडकी बहीण योजना महिलांना आमिष दाखवण्यासाठी... सरकारनं काय म्हटलं?
लाडकी बहीण योजना महिलांना आमिष दाखवण्यासाठी... सरकारनं काय म्हटलं?.
'बारामतीत दरमहिन्याला बोलवत जा कारण...', मुंडे दादांना काय म्हणाल्या?
'बारामतीत दरमहिन्याला बोलवत जा कारण...', मुंडे दादांना काय म्हणाल्या?.
ट्रेन रिकामी, सीटवर पाय; विशेष लोकलमध्ये रेल्वे कर्मचाऱ्यांची दादागिरी
ट्रेन रिकामी, सीटवर पाय; विशेष लोकलमध्ये रेल्वे कर्मचाऱ्यांची दादागिरी.
...म्हणून सैफ टार्गेटवर, शरद पवार गटाच्या बड्या नेत्याला कोणावर संशय?
...म्हणून सैफ टार्गेटवर, शरद पवार गटाच्या बड्या नेत्याला कोणावर संशय?.
सैफची प्रकृती सध्या कशी? 'लिलावती'कडून निवेदन जारी, नेमकं काय म्हटलंय?
सैफची प्रकृती सध्या कशी? 'लिलावती'कडून निवेदन जारी, नेमकं काय म्हटलंय?.
सैफवर चाकूने 6 वार पण 12 व्या मजल्यावरच्या घरात चोराची एन्ट्री कशी?
सैफवर चाकूने 6 वार पण 12 व्या मजल्यावरच्या घरात चोराची एन्ट्री कशी?.
कराडला कोठडी अन् वकिलांमध्येच जुंपली, कोर्टाबाहेर एकच गदारोळ अन्...
कराडला कोठडी अन् वकिलांमध्येच जुंपली, कोर्टाबाहेर एकच गदारोळ अन्....
वाल्मिक कराडच्या समर्थकांच्या आलं अंगात, महिलांमध्ये घुमतंय कोण?
वाल्मिक कराडच्या समर्थकांच्या आलं अंगात, महिलांमध्ये घुमतंय कोण?.