VIDEO | असला कॅच फक्त सुपरमॅनलाच जमेल, फिल्डरची डाईव्ह पाहून तुम्हीही चकित व्हाल

क्रिकेटमध्ये अनेकदा असे काही क्षण येत असतात जे पाहून आपण आपल्या डोळ्यांवर विश्‍वास ठेवू शकत नाहीत, या खेळात अनेकदा खेळाडू असे काही उत्तम खेळाचे प्रदर्शन करतात, की ते पाहून आपल्या डोळ्यांच पारणं फिटलं, अशी भावना असते. असाच काहीसा प्रकार एका सामन्यात घडला आहे.

VIDEO | असला कॅच फक्त सुपरमॅनलाच जमेल, फिल्डरची डाईव्ह पाहून तुम्हीही चकित व्हाल
फोर्ड ट्रॉफीमधला रॉबर्ट ओ डोनलचा अप्रतिम झेल Image Credit source: VideoGrab
Follow us
| Updated on: Feb 26, 2022 | 11:12 AM

मुंबई : क्रिकेट (Cricket) हा असा एक खेळ आहे, ज्यात काहीही शक्य असते. अगदी एखादा संघ सामना जिंकत नाही तोपर्यंत या खेळात काहीही चमत्कारी बदल होउन सामना दुसऱ्या संघाच्या खिशातही जाऊ शकतो. त्यामुळे हा खेळ सर्वांनाच आवडतो. क्रिकेटमध्ये सर्वच अनिश्‍चित असते. काही सामन्यांमध्ये असे काही कॅच घेतले जातात जे आश्चर्यचकित करतात. हे कसे घडू शकते? याचे आश्चर्य वाटते. हे अजिबात शक्य नाही, तोंडात बोटे घालायला भाग पाडणारा असाच झेल न्यूझीलंडमध्ये खेळल्या जात असलेल्या क्रिकेट सामन्यादरम्यान घेतला गेला आहे. हा सामना फोर्ड ट्रॉफीचा (Ford Trophy) अंतिम सामना होता आणि दोन अंतिम फेरीतील सेंट्रल डिस्ट्रिक्ट्स आणि ऑकलंड हे संघ समोरासमोर होते. ज्या खेळाडूने हा कॅच पकडला आहे, त्याला पाहून तुम्हाला सुपरमॅनची आठवण आल्याशिवाय राहणार नाही. हा अविश्वसनीय कॅच (amazing Catch) सेंट्रल डिस्ट्रिक्टच्या डावात घेतला गेला. या अप्रतिम कॅचद्वारे त्यांची पहिली विकेट पडली. सलामीला यष्टिरक्षक बेली विगिन्स फलंदाज होता आणि गोलंदाज लॉकी फर्ग्युसन होता. ज्या खेळाडूने हा झेल घेतला तो रॉबर्ट ओ डोनेल होता.

खेळाडू की सुपरमॅन?

सेंट्रल डिस्ट्रिक्टच्या डावातील सहाव्या षटकाच्या पहिल्या चेंडूवर हा कॅच घेण्यात आला. हा झेल बिलकुल सोपा नव्हता. परंतु ओ डोनलने उंच झेपावत हा झेल टिपला. क्षेत्ररक्षक रॉबर्ट ओ डोनलने आपल्या प्रयत्नाने त्याचे कॅचमध्ये रूपांतर केले. आणि, त्याने ज्या पद्धतीने हा कॅच घेतला ते पाहून सर्वजण अवाक झाले. जणू एखाद्या सुपरमॅनने हा कॅच घेतला आहे असे सर्वांना वाटले. हा अप्रतिम कॅच पकडणारा रॉबर्ट ओ डोनल हा ऑकलंडचा कर्णधारही आहे. जेव्हा कर्णधारच असा झेल पकडतो तेव्हा संघाचा उत्साह कुठे पोहोचेल, याचा आपण विचार करु शकतो. या कॅचमुळे सेंट्रल डिस्ट्रिक्टच्या सलामीवीराचा डाव 14 धावांच्या पुढे जाऊ शकला नाही आणि तो लॉकी फर्ग्युसनचा बळी ठरला.

View this post on Instagram

A post shared by Spark Sport (@sparknzsport)

सेंट्रल डिस्ट्रिक्टचा संघ 213 धावांत गुंडाळला

लॉकी फर्ग्युसनने या सामन्यात 10 षटके टाकली आणि 32 धावा देत 4 बळी घेतले. त्याचवेळी कर्णधार रॉबर्ड ओ डोनेलने त्याच्या आश्चर्यकारक कॅचनंतर सामन्यात आणखी एक कॅच घेतला. परिणामी सेंट्रल डिस्ट्रिक्ट संघ 49.5 षटकांत 213 धावांत सर्वबाद झाला. जर ऑकलंडने हा सामना जिंकला तर तो फोर्ड ट्रॉफीचा चॅम्पियन बनेल.

इतर बातम्या

IND VS SL: भारताला हरवण्यासाठी श्रीलंकेने निवडला मजबूत संघ, कसोटीसाठी टीमची घोषणा

IPL 2022: मुंबई इंडियन्सच्या ग्रुपमध्ये CSK चा संघ नाही, जाणून घ्या कुठल्या आधारावर दोन गटात झाली संघ विभागणी

IPL 2022 Schedule: मुंबई इंडियन्ससह अन्य संघांचे कोणाविरुद्ध किती सामने होणार, जाणून घ्या सर्व डिटेल्स

18 दिवसांनंतरही आरोपींना अटक नाही, पोलीस करतायत तरी काय ?
18 दिवसांनंतरही आरोपींना अटक नाही, पोलीस करतायत तरी काय ?.
आणखी एका सरपंचावर जीवघेणा हल्ला, तुळजापुरात बीडची पुनरावृत्ती
आणखी एका सरपंचावर जीवघेणा हल्ला, तुळजापुरात बीडची पुनरावृत्ती.
माझा संतोष देशमुख होण्याची वाट बघताय का ? कोणी केला सवाल
माझा संतोष देशमुख होण्याची वाट बघताय का ? कोणी केला सवाल.
अभिनेते अनुपम खेर यांची माजी पंतप्रधान मनमोहन सिंग यांना श्रद्धांजली
अभिनेते अनुपम खेर यांची माजी पंतप्रधान मनमोहन सिंग यांना श्रद्धांजली.
बीड प्रकरणात आरोपीला वाचवण्यात गृहमंत्र्यांचा हात - संजय राऊतांचा आरोप
बीड प्रकरणात आरोपीला वाचवण्यात गृहमंत्र्यांचा हात - संजय राऊतांचा आरोप.
माजी पंतप्रधान डॉ. मनमोहन सिंह यांचं निधन, देशात 7 दिवसांचा दुखवटा
माजी पंतप्रधान डॉ. मनमोहन सिंह यांचं निधन, देशात 7 दिवसांचा दुखवटा.
डॉ. मनमोहन सिंह यांचं निधन, शरद पवार यांनी वाहिली श्रद्धांजली
डॉ. मनमोहन सिंह यांचं निधन, शरद पवार यांनी वाहिली श्रद्धांजली.
देशाच्या अर्थव्यवस्थेला बळकट करणारं नेतृत्व
देशाच्या अर्थव्यवस्थेला बळकट करणारं नेतृत्व.
महाराष्ट्रातल्या सर्व शस्र परवान्यांची चौकशी लावा - अंजली दमानिया
महाराष्ट्रातल्या सर्व शस्र परवान्यांची चौकशी लावा - अंजली दमानिया.
99 अपराध यांनी पचवले, संतोष देशमुख 100 वा होता, काय म्हणाले सुरेश धस?
99 अपराध यांनी पचवले, संतोष देशमुख 100 वा होता, काय म्हणाले सुरेश धस?.