Video: विजेतेपदानंतर रोहित शर्माने बारबाडोसमधील माती का खाल्ली ? अखेर पंतप्रधान नरेंद्र मोदीसमोर रोहितने उघडला राज
Rohit Sharma and narendra modi : मला संघातील खेळाडूंनी सांगितले होते, तू ट्रॉफी घेण्यासाठी जाताना सरळ चालत जाऊ नको. काहीतरी वेगळे कर. मग मी नृत्य करत गेलो. ही चहल आणि कुलदीपची आयडिया होती, असे रोहित याने सांगितले.
भारतीय टीमने रोहित शर्माच्या नेतृत्वात टी 20 वर्ल्ड कप 2024 वर भारताचे नाव कोरले. भारताने 29 जून रोजी विजेतेपद मिळाल्यानंतर 4 जुलै रोजी टीम इंडिया भारतात परत आली. भारतीय क्रिकेट संघाचे देशात मोठ्या जल्लोषात स्वागत झाले. टीम इंडिया दिल्लीला पोहचल्यानंतर हॉटेलमध्ये गेली. त्यानंतर पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या निवासस्थानी गेली. त्या ठिकाणी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी टीम इंडियामधील खेळाडूंशी चर्चा केली. पंतप्रधान नरेंद्र मोदी खेळाडूंशी मोकळपणे संवाद साधला. त्यावेळी रोहित शर्मा याने बारबाडोसमधील खेळपट्टीवर माती का खाल्ली त्याचे कारण सांगितले.
रोहित याने उघडला राज
रोहित शर्मा याचा माती खाण्याचा व्हिडिओ चांगलाच व्हायरल झाला. त्यावर सोशल मीडियावर बऱ्याच प्रतिक्रिया आल्या. त्यावर पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी रोहित याला विचारले. ते म्हणाले, क्रिकेट तुमचे हे जीवन आहे. त्या ठिकाणच्या खेळपट्टीवर माती खाण्याचे काम एखादा हिंदुस्थानीच करु शकतो. परंतु तुझ्या त्या कृतीमागे काय भावना होती? असा प्रश्न नरेंद्र मोदी यांनी रोहित शर्मा याला विचारला. त्यावर रोहित म्हणाला, विजेतेपदाचा तो क्षण आयुष्यभर लक्षात ठेवायचा होता. त्या खेळपट्टीवर आम्ही खेळलो. त्या खेळपट्टीवरच जिंकलो. यापूर्वी अनेक वेळा वर्ल्डकप आमच्या खूप जवळ आला होता. परंतु यश आले नाही. या पिचवर विजेतेपद मिळाले. त्यामुळे त्या क्षणी माझ्याकडून ही कृती झाली.
Our World T20 🏏 Champions enthralled everyone with their outstanding performances. Had a wonderful conversation with them. Do watch! https://t.co/1UPGbCmx6F
— Narendra Modi (@narendramodi) July 5, 2024
डान्स करत का गेला?
रोहित याच्या स्पष्टीकरणानंतर पंतप्रधान नरेंद्र मोदी म्हणाले, तुझ्या भावना मला त्या कृतीतून दिसल्या. पण जेव्हा विजेतेपद घेण्यासाठी जात होतो, तेव्हा नृत्य केले. त्यावर रोहित म्हणाला, मला संघातील खेळाडूंनी सांगितले होते, तू ट्रॉफी घेण्यासाठी जाताना सरळ चालत जाऊ नको. काहीतरी वेगळे कर. मग मी नृत्य करत गेलो. त्यावर मोदी म्हणाले, ही चहल याची आयडिया होती का? त्यावर सर्व खेळाडू हसायला लागले. परंतु ही चहल आणि कुलदीपची आयडिया होती, असे रोहित याने सांगितले.
रोहित शर्मा याने मैदानावर देशाचा तिरंगाही लावला. या सामन्यातील विजयानंतर रोहित शर्मा आणि विराट कोहली दोघेही T 20 आंतरराष्ट्रीय क्रिकेट मधून निवृत्त घेतली. त्यामुळे या दोन्ही खेळाडूंसाठी हा क्षण संस्मरणीय होता.