IPL 2022: BCCI ची निवड समिती मोठ्या निर्णयाच्या तयारीत, कॅप्टनसह एकाच वेळी पाच सिनियर खेळाडूंना बसवणार?

IPL 2022: सध्या सुरु असलेल्या इंडियन प्रीमियर लीग स्पर्धेत विराट कोहली आणि रोहित शर्मा खूपच खराब फॉर्ममध्ये आहेत. धावांसाठी त्यांचा संघर्ष सुरु आहे. रोहित आणि विराट हे भारतीय संघाच आंधारस्तभ आहेत.

IPL 2022: BCCI ची निवड समिती मोठ्या निर्णयाच्या तयारीत,  कॅप्टनसह एकाच वेळी पाच सिनियर खेळाडूंना बसवणार?
Team India (Test)Image Credit source: BCCI TWITTER
Follow us
| Updated on: May 15, 2022 | 2:00 PM

मुंबई: दक्षिण आफ्रिकेविरुद्धच्या (South Africa Series) आगामी पाच टी-20 सामन्यांच्या मालिकेसाठी नव्याने संघ निवड होऊ शकते. या टीममध्ये तुम्हाला अनेक सिनियर चेहरे दिसणार नाहीत. कदाचित क्रिकेट चाहत्यांसाठी हा आश्चर्याचा धक्का असेल. पण आगामी दक्षिण आफ्रिकेविरुद्धच्या मालिकेसाठी सिनियर खेळाडूंना विश्रांती देण्यात येऊ शकते. टीम इंडियाचा कॅप्टन रोहित शर्मा, (Rohit sharma) विराट कोहली, (Virat kohli) केएल राहुल, ऋषभ पंत आणि वेगवान गोलंदाज जसप्रीत बुमराह यांना विश्रांती देण्याची योजना आहे. दक्षिण आफ्रिकेचा संघ या मालिकेसाठी भारतात येणार आहे. 9 जून 2022 पासून ही मालिका सुरु होईल. दिल्लीच्या अरुण जेटली स्टेडियमवर पहिला सामना खेळला जाणार आहे. “कॅप्टन रोहित शर्मा, विराट कोहली, केएल राहुल, ऋषभ पंत आणि वेगवान गोलंदाज जसप्रीत बुमराह यांना दक्षिण आफ्रिकेविरुद्धच्या आगामी मालिकेसाठी विश्रांती देण्यात येऊ शकते” असं बीसीसीआय मधील सूत्रांनी ANI ला सांगितलं.

आकडेचा वास्तव सांगून जातायत

सध्या सुरु असलेल्या इंडियन प्रीमियर लीग स्पर्धेत विराट कोहली आणि रोहित शर्मा खूपच खराब फॉर्ममध्ये आहेत. धावांसाठी त्यांचा संघर्ष सुरु आहे. रोहित आणि विराट हे भारतीय संघाच आंधारस्तभ आहेत. पण सध्या त्यांच्याच बॅट मधून धावा आटल्या आहेत. वनडाऊन येणारा विराट कोहली आता ओपनिंगला येतो. पण त्याने काही फरक पडलेला नाही. त्याला या सीजनमध्ये फक्त एक अर्धशतक झळकावता आलं आहे. तो आता सहज बाद होत आहे. विराट करीयरच्या खूपच वाईट फॉर्ममधून जातोय. रोहितची स्थितीही यापेक्षा काही वेगळी नाही. तो नेतृत्व करत असलेल्या मुंबई इंडियन्सने तर सलग आठ सामने गमावले. मुंबई इंडियन्स आयपीएल 2022 मधून बाहेर होणारा पहिला संघ ठरला आहे. .यंदाच्या आयपीएलमध्ये रोहितने 218 तर विराटने 216 धावा केल्या आहेत. ऋषभ पंतही फार काही चांगल्यया फॉर्ममध्ये नाहीय. त्याने 12 सामन्यात 294 धावा केल्या आहेत.

हे सुद्धा वाचा

हार्दिक पंड्या कॅप्टन?

केएल राहुल मात्र अपवाद आहे. त्याने 11 डावात 451 धावा केल्या आहेत. यात दोन शतकं आणि दोन अर्धशतक आहेत. दुसऱ्याबाजूला जसप्रीत बुमराहने 11 सामन्यात 12 विकेट काढल्या आहेत. कोलकाता नाइट रायडर्स विरुद्ध 5/10 ही त्याची सर्वोत्तम गोलंदाजी आहे. बीसीसीआयची निवड समिती भविष्याच्या दृष्टीने चाचपणी करण्यासाठी काही नव्या चेहऱ्यांना संधी देऊ शकते. यात राहुल तेवतिया, उमरान मलिक, दिनेश कार्तिक यांची नावं आघाडीवर आहेत. कॅप्टनशिपची जबाबदारी हार्दिक पंड्याकडे सोपवली जाऊ शकते.

सैफवर हल्ला करणाऱ्या 'त्या' व्यक्तीचा फोटो समोर, आरोपीची ओळख पटली?
सैफवर हल्ला करणाऱ्या 'त्या' व्यक्तीचा फोटो समोर, आरोपीची ओळख पटली?.
सैफच्या हल्ल्यावर मुख्यमंत्र्यांची पहिली प्रतिक्रिया; म्हणाले...
सैफच्या हल्ल्यावर मुख्यमंत्र्यांची पहिली प्रतिक्रिया; म्हणाले....
सैफवर हल्ला करणाऱ्या 'त्या' व्यक्तीचं लोकेशन ट्रेस, मुंबईच्या या भागात
सैफवर हल्ला करणाऱ्या 'त्या' व्यक्तीचं लोकेशन ट्रेस, मुंबईच्या या भागात.
सैफचा जीव घ्यायचा होता? बॉलिवूडच्या खलनायकाकडून हल्ल्याचा निषेध
सैफचा जीव घ्यायचा होता? बॉलिवूडच्या खलनायकाकडून हल्ल्याचा निषेध.
लाडकी बहीण योजना महिलांना आमिष दाखवण्यासाठी... सरकारनं काय म्हटलं?
लाडकी बहीण योजना महिलांना आमिष दाखवण्यासाठी... सरकारनं काय म्हटलं?.
'बारामतीत दरमहिन्याला बोलवत जा कारण...', मुंडे दादांना काय म्हणाल्या?
'बारामतीत दरमहिन्याला बोलवत जा कारण...', मुंडे दादांना काय म्हणाल्या?.
ट्रेन रिकामी, सीटवर पाय; विशेष लोकलमध्ये रेल्वे कर्मचाऱ्यांची दादागिरी
ट्रेन रिकामी, सीटवर पाय; विशेष लोकलमध्ये रेल्वे कर्मचाऱ्यांची दादागिरी.
...म्हणून सैफ टार्गेटवर, शरद पवार गटाच्या बड्या नेत्याला कोणावर संशय?
...म्हणून सैफ टार्गेटवर, शरद पवार गटाच्या बड्या नेत्याला कोणावर संशय?.
सैफची प्रकृती सध्या कशी? 'लिलावती'कडून निवेदन जारी, नेमकं काय म्हटलंय?
सैफची प्रकृती सध्या कशी? 'लिलावती'कडून निवेदन जारी, नेमकं काय म्हटलंय?.
सैफवर चाकूने 6 वार पण 12 व्या मजल्यावरच्या घरात चोराची एन्ट्री कशी?
सैफवर चाकूने 6 वार पण 12 व्या मजल्यावरच्या घरात चोराची एन्ट्री कशी?.