IPL 2023 : Rohit Sharma च्या गायब होण्याच कारण आलं समोर, वाढणार Mumbai Indians च टेन्शन

IPL 2023 Mumbai Indians News : सगळे होते, पण मुंबईचा कॅप्टन रोहित कुठे दिसत नव्हता. रोहित शर्मा ट्रॉफीसह कॅप्टन्सच्या फोटोशूटला नव्हता. त्यामुळे मुंबईच्या चाहत्यांच टेन्शन वाढलय.

IPL 2023 : Rohit Sharma च्या गायब होण्याच कारण आलं समोर, वाढणार Mumbai Indians च टेन्शन
Rohit sharma Image Credit source: BCCI
Follow us
| Updated on: Mar 31, 2023 | 8:09 AM

IPL 2023 Mumbai Indians News : IPL 2023 सीजन सुरु व्हायला काही तास उरले आहेत. सर्वच टीम्स आपआपल्या तयारीमध्ये व्यस्त आहेत. शुक्रवारी सीजनचा पहिला सामना खेळला जाणार आहे. पण त्याआधी मुंबई इंडियन्सचा कॅप्टन रोहित शर्माच नाव सर्वांच्या ओठावर आहे. याच कारण आहे, रोहित शर्माची फोटोशूटला अनुपस्थिती. गुरुवारी IPL ट्रॉफीसोबत सर्वच टीम्सच्या कॅप्टनच फोटोशूट झालं. यात रोहित कुठे दिसला नाही, त्यामुळे अनेकांनी आश्चर्य व्यक्त केलय. रोहितच्या अनुपस्थितीच जे कारण समोर आलय, त्यामुळे मुंबई इंडियन्सच टेन्शन वाढू शकतं.

मुंबई इंडियन्सची टीम आपला स्टार गोलंदाज जसप्रीत बुमराहशिवाय उतरणार आहे. जसप्रीत बुमराह पाठदुखीमुळे टीमच्या बाहेर आहे. बुमराह यंदाच्या सीजनमध्ये खेळू शकणार नाहीय, हे सर्वांनाच माहित आहे.

रोहित फोटोशूटला का आला नाही?

मुंबई इंडियन्सची डोकेदुखी वाढवलीय कॅप्टन रोहित शर्माने. त्याची तब्येत चांगली नसल्याची माहिती आहे. त्यामुळेच तो कॅप्टन्सच्या फोटोशूटला हजर राहू शकला नाही.

ते फोटो पोस्ट झाल्यानंतर समजलं

गुरुवारच्या शूटचे फोटो IPL च्या सोशल मीडिया अकाऊंटवर पोस्ट करण्याचत आले आहेत. यामध्ये रोहित दिसत नसल्याच लगेच सगळ्यांच्या लक्षात आलं. रोहितच्या अनुपस्थितीबद्दल मुंबई इंडियन्स किंवा आयपीएलकडून काहीही सांगण्यात आलेलं नाही. रोहित शर्माची तब्येत ठिक नसल्याच वृत्त टाइम्स ऑफ इंडियाने दिलय. त्यामुळेच तो फोटो शूटला हजर राहिला नाही.

बातमीय काय म्हटलय?

रोहितच्या फिटनेसने नक्कीच काही प्रमाणात मुंबई इंडियन्सच टेन्शन वाढवलं असणार. पाचवेळच्या चॅम्पियन मुंबई इंडियन्सचा सामना 2 एप्रिलला होणार आहे. रॉयल चॅलेंजर्स बँगलोर विरुद्ध मुंबईची पहिली मॅच आहे. रोहित या मॅचसाठी फिट होतो की, नाही ते लवकरच समजेल. रविवारपर्यंत रोहित फिट होईल, असं वृत्तात म्हटलं आहे. मग, मुंबईने सूर्यकुमारला का नाही पाठवलं?

रोहित शर्मा फोटोशूटला का हजर नव्हता? त्याच उत्तर मिळालय. रोहितला बर नव्हतं, मग मुंबई इंडियन्सने त्याच्याजागी उपकर्णधार सूर्यकुमार यादवला का पाठवलं नाही? हा प्रश्न निर्माण होतोय. सनरायजर्स हैदराबादने एडन मार्करामच्या अनुपस्थितीत भुवनेश्वर कुमारकडे ही जबाबदारी सोपवली. तो पहिल्या मॅचमध्ये टीमच नेतृत्व करणार आहे.

Non Stop LIVE Update
सुप्रिया सुळे मुख्यमंत्रीपदाचा चेहरा? शरद पवार त्यांना CM करणार?
सुप्रिया सुळे मुख्यमंत्रीपदाचा चेहरा? शरद पवार त्यांना CM करणार?.
लाडकी बहीणचा महायुतीला फायदा होणार? पवार म्हणाले, 'नाव गोंडस पण...'
लाडकी बहीणचा महायुतीला फायदा होणार? पवार म्हणाले, 'नाव गोंडस पण...'.
इचलकरंजीत 2019च्या सभेची पुनरावृत्ती,भर पावसात पुन्हा शरद पवारांची सभा
इचलकरंजीत 2019च्या सभेची पुनरावृत्ती,भर पावसात पुन्हा शरद पवारांची सभा.
'एकदा या गद्दाराला पाडा...', उद्धव ठाकरेंचा अब्दुल सत्तारांवर हल्लाबोल
'एकदा या गद्दाराला पाडा...', उद्धव ठाकरेंचा अब्दुल सत्तारांवर हल्लाबोल.
MNS Manifesto : ''आम्ही हे करु'','मनसे'च्या जाहीरनाम्यात कोणासाठी काय
MNS Manifesto : ''आम्ही हे करु'','मनसे'च्या जाहीरनाम्यात कोणासाठी काय.
शिवतीर्थवरील सभेच्या शर्यतीतून मनसे आऊट? 17 तारखेची सभा होणार की नाही
शिवतीर्थवरील सभेच्या शर्यतीतून मनसे आऊट? 17 तारखेची सभा होणार की नाही.
'...मुली आणणार कुठून?', मुंडेंचा शरद पवार गटाच्या उमेदवाराला खोचक सवाल
'...मुली आणणार कुठून?', मुंडेंचा शरद पवार गटाच्या उमेदवाराला खोचक सवाल.
'भाजपविरोधात मतदान करा, नाहीतर अल्लाहसोबत बेईमानी...', फडणवीस आक्रमक
'भाजपविरोधात मतदान करा, नाहीतर अल्लाहसोबत बेईमानी...', फडणवीस आक्रमक.
महायुतीचा CM पदाचा चेहरा कोण? फडणवीस स्पष्टच म्हणाले, 'मी शर्यतीत...'
महायुतीचा CM पदाचा चेहरा कोण? फडणवीस स्पष्टच म्हणाले, 'मी शर्यतीत...'.
म्हणून राष्ट्रपती राजवट लागली, पवारांचं नाव घेत फडणवीसांचा गौप्यस्फोट
म्हणून राष्ट्रपती राजवट लागली, पवारांचं नाव घेत फडणवीसांचा गौप्यस्फोट.