रोहित शर्मा अन् रितिकाने खूप विचारपूर्वक ठेवलंय आपल्या मुलाचं नाव, अर्थ समजल्यावर तुम्हीही कराल कौतुक
टीम इंडियाचा कर्णधार रोहित शर्मा 15 नोव्हेंबरला दुसऱ्यांदा बाबा झाला. रोहित शर्माची पत्नी रितिकाने मुलाच्या जन्मानंतर 15 दिवसांनी त्याच्या नावाबाबत माहिती दिली आहे.

टीम इंडियाचा कर्णधार रोहित शर्मा 15 नोव्हेंबरला दुसऱ्यांदा बाबा झाला. रोहित शर्माची पत्नी रितिकाने मुलाच्या जन्मानंतर 15 दिवसांनी त्याच्या नावाबाबत माहिती दिली आहे. रितिकाने ख्रिसमसच्या थीमवर अतिशय क्रिएटिव्ह पद्धतीने सोशल मीडियावर आपल्या लाडक्या मुलांचं नाव सांगितलं. रोहित आपल्या मुलाच्या जन्मानंतर लगेचच ऑस्ट्रेलियाला रवाना झाला होता. सध्या ऑस्ट्रेलिया विरूद्ध टीम इंडिया पाच कसोटी सामन्यांची मालिका खेळत आहे. मुलाच्या जन्मामुळे रोहित ऑस्ट्रेलियाविरूद्धचा पहिला कसोटी सामना खेळू शकला नाही.रोहित शर्माच्या अनुपस्थितीमध्ये जसप्रीत बुमराहाच्या नेतृत्वात पहिल्या कसोटी सामन्यात टीम इंडियानं ऑस्ट्रेलियाचा पराभव केला.पहिला कसोटी सामना 22 नोव्हेंबरला सुरू झाला होता आणि रोहित शर्मा 24 नोव्हेंबरला ऑस्ट्रेलियाला पोहोचला.
दरम्यान मुलाच्या जन्मानंतर 15 दिवसांनी आता रोहितची पत्नी रितिकाने आपल्या मुलाच्या नावाबद्दल माहिती दिली आहे. तीने सांगितलं की माझ्या मुलाचं नाव अहान आहे. याचे अनेक अर्थ निघतात. अहानचा अर्थ जागृती, चेतना असा होता. याशिवाय अहानचा अर्थ सूर्याचं पृथ्वीवर पडणारं पहिलं किरण असा देखील होतो.अहानचा अर्थ नवी सुरुवात असा देखील होतो. या नावाची मुलं हे अतिशय हुशार आणि गुणी असतात. रोहित शर्माची पत्नी रितिकाने इंस्टाग्राम स्टोरीच्या माध्यमातून आपल्या मुलाच्या नावाबाबत खुलासा केला आहे.
2015 ला झालं होतं रोहित रितिकाचं लग्न
रोहित आणि रितिकाने 2015 साली लग्न केलं होतं. लग्नानंतर तीन वर्षांनी रोहित आणि रितिका आई-वडील बनले. रितिकाने मुलीला जन्म दिला. रोहितने आपल्या मुलीचं नाव समायरा असं ठेवलं. समायराचा जन्म 2018 मध्ये झाला. त्यानंतर यावर्षी 15 नोव्हेंबरला रोहित आणि रितिका पुन्हा एकदा आई-वडील झाले. रितिकाला मुलगा झाला. याबाबत रोहित शर्मानं सोशल मीडियावर पोस्ट करत आपल्या चाहात्यांना माहिती दिली होती. रोहित शर्मानं आपल्या मुलाच्या जन्माची माहिती देताना एक अॅनिमेटेड फोटो शेअर केला होता, त्याखाली ‘ फैमिली, जहां हम 4 सदस्य हो गये’ असं कॅप्शन दिलं होतं.