Vijay Hazare Trophy दुखापतग्रस्त खेळाडूच्या जागी काश्मीरच्या टीममधून खेळणार रोहित शर्मा
उमरान मलिक न्यूझीलंड दौऱ्यावर गेला आहे. आता आणखी दोन खेळाडूंना दुखापती झाल्या आहेत.
नवी दिल्ली: विजय हजारे ट्रॉफीबद्दल एक महत्त्वाची अपडेट आहे. ही 50 ओव्हर्सची एक देशांतर्गत क्रिकेट टुर्नामेंट आहे. जम्मू-काश्मीरच्या टीममध्ये एक फेरबदल झालाय. उमरान मलिक न्यूझीलंड दौऱ्यावर गेला आहे. आता आणखी दोन खेळाडूंना दुखापती झाल्या आहेत. जम्मू-काश्मीरच्या दुखापतग्रस्त खेळाडूंमध्ये ऑलराऊंडर अब्दुल समद सुद्धा आहे.
अब्दुल समद टीमचा स्टार प्लेयर
अब्दुल समदला लिगामेंट टीयरची दुखापत झालीय. ज्यामुळे तो विजय हजारे ट्रॉफीमध्ये एकही सामना खेळू शकणार नाहीय. अब्दुल समद टीमचा स्टार प्लेयर होता. फलंदाजी आणि गोलंदाजी दोन्ही आघाड्यांवर सामन्याची दिशा पालटण्याची त्याची क्षमता आहे.
अब्दुल समद आणि शाहरुख डारला दुखापत
अब्दुल समदच्या आधी जम्मू-काश्मीरचा वेगवान गोलंदाज शाहरुख डारला दुखापत झाली. पंजाब विरुद्ध सामन्याच्यावेळी त्याला दुखापत झाली. त्याचा खांदा खेचला गेला होता. त्यामुळे तो जम्मू-काश्मीरच्या टीममधून खेळू शकणार नाहीय. अब्दुल आणि शाहरुखच्या जागी आता दोन नव्या खेळाडूंचा टीममध्ये समावेश करावा लागेल.
जम्मू-काश्मीरला मोठा झटका
टुर्नामेंटच्या मध्यावर या दोन खेळाडूंच टीमबाहेर होणं जम्मू-काश्मीर टीमसाठी एक झटका आहे. कारण टीमचा स्टार खेळाडू उमरान मलिक आधीच टीमसोबत नाहीय. उमरान मलिक टीम इंडियासोबत न्यूझीलंड दौऱ्यावर आहे.
रोहित शर्मा आणि रैनाला मिळाली जागा
अब्दुल समद आणि शाहरुख डारच्या जागी आता जम्म-काश्मीरच्या टीममध्ये रोहित शर्मा आणि सूर्यांश रैनाचा टीममध्ये समावेश करण्यात आलाय. दोघेही चांगले खेळाडू आहेत. ते जम्मू-काश्मीर टीमकडून खेळत आलेत. सूर्यांश रैना विकेटकीपर फलंदाज तर रोहित शर्मा मध्यमगती गोलंदाज आहे.