T20 World cup | रोहित-विराट वर्ल्ड कपच्या टीममध्ये आले, तर ‘या’ 3 टॅलेंटेड खेळाडूंचा पत्ता होईल कट

T20 World cup | कधी अस झालय का? रोहित-विराट पैकी कोणी इतर खेळाडूंसाठी धोका बनलेत. पण आता असं होऊ शकतं. आगमी T20 वर्ल्ड कपमध्ये रोहित-विराट 3 खेळाडूंच्या नजरेत विलन बनू शकतात. कारण या दोघांमुळे त्यांना T20 वर्ल्ड कप टीममधील स्थान गमवाव लागेल.

T20 World cup | रोहित-विराट वर्ल्ड कपच्या टीममध्ये आले, तर 'या' 3 टॅलेंटेड खेळाडूंचा पत्ता होईल कट
rohit sharma-virat kohli
Follow us
| Updated on: Jan 16, 2024 | 2:11 PM

T20 World cup | रोहित शर्मा आणि विराट कोहलीमुळे टीम इंडियाच्या 3 खेळाडूंना धोका निर्माण झालाय. कारण या दोघांमुळे तीन युवा खेळाडूंचा पत्ता कट होऊ शकतो. हे तीन युवा प्लेयर T20 वर्ल्ड कप टीममधून आपल स्थान गमावू शकतात, हा त्यांच्यासाठी मोठा धोका आहे. कारण या तीन युवा खेळाडूंनी चांगला परफॉर्मन्स दिला, तरी रोहित-विराटचा अनुभव त्यापेक्षा मोठा आहे. त्यामुळे या तीन खेळाडूंना संघातील आपल स्थान गमवाव लागेल. आता प्रश्न हा आहे की, हे तीन खेळाडू कोण आहेत?, ज्यांच्यावर रोहित-विराटमुळे T20 वर्ल्ड कप टीममधून बाहेर होण्याचा धोका आहे. यात ऋतुराज गायकवाड़, तिलक वर्मा आणि इशान किशन हे प्लेयर आहेत.

या तीन खेळाडूंसाठी रोहित-विराट कसा अडथळा ठरु शकतात? त्यासाठी तुम्हाला बॅटिंग ऑर्डर पाहावी लागेल. अन्य खेळाडू सध्या ज्या क्रमांकावर खेळतात, त्यावर रोहित आणि विराटचा पहिल्यापासून दबदबा आहे. अशावेळी हे दोन सिनिअर प्लेयर टीममध्ये असतील, दुसऱ्या खेळाडूंना बाहेर बसायचच आहे.

महाराष्ट्रातील प्लेयरला बसू शकतो फटका

ऋतुराज गायकवाड ओपनिंगला येतो. त्याचप्रमाणे रोहित शर्मा सुद्धा ओपन करतो. रोहित प्लेइंग 11 चा भाग असेल, तर सहाजिकच ओपनिंगसाठी पहिली संधी त्याला मिळेल. रोहितचा जोडीदार कोण असावा? त्यासाठी टीम मॅनेजमेंटची पसंती शुभमन गिल आणि यशस्वी जैस्वाल याच्यापैकी एकाला असेल. त्यात ऋतुराज गायकवाड फिट बसत नाही.

त्या जागेवर टीम मॅनेजमेंटकडे केएल राहुलचा पर्याय

इशान किशनची सुद्धा तिच स्थिती आहे. तो सुद्धा ओपनिंग करतो. सध्या तो टीमच्या बाहेर आहे. याआधी टीममध्ये असताना तो प्लेइंग इलेव्हनचा भाग नव्हता. अफगाणिस्तान विरुद्धच्या सीरीजमध्ये रोहित शर्मा ओपनिंगला यायचा. अशावेळी यशस्वी जैस्वाल, शुभमन गिल टीममध्ये असताना इशान किशनला संधी मिळण्याचा प्रश्नच नाही येतं. ओपनिंग ऐवजी मधल्याफळीत इशान किशनचा विचार केला, तर तिथे टीम मॅनेजमेंटकडे केएल राहुलचा पर्याय आहे.

विराटमुळे त्याला जागा सोडावी लागली

तिलक वर्मा मोहालीमध्ये अफगाणिस्तान विरुद्धच्या पहिल्या T20 सामन्यात टीमचा भाग होता. इंदोरमध्ये विराट कोहली दुसऱ्या T20 सामन्यासाठी टीममध्ये येताच त्याला आपली जागा सोडावी लागेल. यातून एक गोष्ट स्पष्ट होते, विराट खेळणार असेल, तर तिलक वर्माला T20 वर्ल्ड कपच्या टीममध्ये स्थान मिळण कठीण आहे.

वडेट्टीवारांचा गंभीर आरोप, 'मविआ'ला फटका बसण्याचं सांगितलं कारण
वडेट्टीवारांचा गंभीर आरोप, 'मविआ'ला फटका बसण्याचं सांगितलं कारण.
...म्हणून शरद पवार महाविकास आघाडीत नाराज, मोठी माहिती समोर
...म्हणून शरद पवार महाविकास आघाडीत नाराज, मोठी माहिती समोर.
काँट्रॅक्ट द्यायचं असेल तर कराडशी संपर्क साधा.', आव्हाडांचं गंभीर आरोप
काँट्रॅक्ट द्यायचं असेल तर कराडशी संपर्क साधा.', आव्हाडांचं गंभीर आरोप.
शाळेच्या शौचालयात विद्यार्थिनीचं टोकाच पाऊल अन् संपवलं जीवन, काय घडलं?
शाळेच्या शौचालयात विद्यार्थिनीचं टोकाच पाऊल अन् संपवलं जीवन, काय घडलं?.
'तर आम्ही आमचा मार्ग...'; मविआत वादाची ठिणगी? राऊतांचं मोठं वक्तव्य
'तर आम्ही आमचा मार्ग...'; मविआत वादाची ठिणगी? राऊतांचं मोठं वक्तव्य.
मंत्रिपद तूर्त वाचलं, मुंडेंच्या राजीनाम्यावर दादा स्पष्टच म्हणाले...
मंत्रिपद तूर्त वाचलं, मुंडेंच्या राजीनाम्यावर दादा स्पष्टच म्हणाले....
आकाचा आकासुद्धा 302 च्या लाईनमध्ये? सुरेश धसांचा वाल्मिक कराडला इशारा
आकाचा आकासुद्धा 302 च्या लाईनमध्ये? सुरेश धसांचा वाल्मिक कराडला इशारा.
'हाके भाजपचे हस्तक', माईकच हिस्कावला अन् स्थानिकांनी त्यांनाच सुनावलं
'हाके भाजपचे हस्तक', माईकच हिस्कावला अन् स्थानिकांनी त्यांनाच सुनावलं.
धस अन् दादांमध्ये मुन्नी वॉर, बीड प्रकरणावरून कोणी कोणाला धरलं धारेवर?
धस अन् दादांमध्ये मुन्नी वॉर, बीड प्रकरणावरून कोणी कोणाला धरलं धारेवर?.
दिवसा तरूणीची हत्या, सुऱ्यानं 4-5 वार; थरकाप उडवणारा व्हिडीओ व्हायरल
दिवसा तरूणीची हत्या, सुऱ्यानं 4-5 वार; थरकाप उडवणारा व्हिडीओ व्हायरल.