VIDEO | KKR vs MI, IPL 2022: सलग तिसऱ्या दारुण पराभवानंतर रोहित शर्मा संतापला, कॅमेरासमोर म्हणाला…
इंडियन प्रीमियर लीग (IPL) च्या इतिहासातील सर्वात यशस्वी संघ मुंबई इंडियन्स (MI) ची 2022 च्या हंगामात अतिशय खराब सुरुवात झाली आहे. रोहित शर्माच्या नेतृत्वाखाली मुंबई संघाने चालू हंगामात तीन सामने खेळले आणि तिन्ही सामन्यांमध्ये त्यांना पराभवाचा सामना करावा लागला.
मुंबई : इंडियन प्रीमियर लीग (IPL) च्या इतिहासातील सर्वात यशस्वी संघ मुंबई इंडियन्स (MI) ची 2022 च्या हंगामात अतिशय खराब सुरुवात झाली आहे. रोहित शर्माच्या नेतृत्वाखाली मुंबई संघाने चालू हंगामात तीन सामने खेळले आणि तिन्ही सामन्यांमध्ये त्यांना पराभवाचा सामना करावा लागला. मंगळवारी खेळवण्यात आलेल्या तिसऱ्या सामन्यात मुंबईला कोलकाता नाईट रायडर्सकडून (KKR) पराभव स्वीकारावा लागला. कोलकात्याविरुद्धच्या पराभवानंतर रोहित शर्मा संतापलेला दिसत होता. सामना संपल्यानंतर त्याला पत्रकार परिषदेला सामोरं जावं लागलं. तो यावेळी त्याच्या नेहमीच्या कूल अंदाजात दिसला नाही. तर तो संतापलेला वाटत होता. तो यावेळी हताश झाला होता. कॅमेऱ्यासमोर आल्यानंतर रोहित स्वतःला अॅडजस्ट करत असताना डॅनी मॉरिसन या व्यक्तीने त्याला प्रश्न विचारला. रोहितला कदाचित त्याचा प्रश्न ऐकू आला नाही आणि त्याने त्याला आवाज वाढवायला सांगितले. ही बाब कॅमेऱ्यात कैद झाली. यामध्ये रोहित हताशपणे बोलत असल्याचे दिसत आहे. रोहित म्हणाला, ‘आवाज बढाओं यार थोड़ा’. प्रश्न विचारणाऱ्या मॉरिसनला रोहितचं हे बोलणं आवडलं नाही तरीही तो शांत राहिला.
रोहितकडून पॅट कमिन्सचं कौतुक
रोहित म्हणाला की, “कमिन्सकडून अजिबात अशा खेळीची अपेक्षा नव्हती. तो येऊन अशी धडाकेबाज खेळी खेळेल असं जरादेखील वाटलं नव्हतं. या विजयाचं संपूर्ण श्रेय त्यालाच जातं. खेळपट्टी फलंदाजीसाठी चांगली होती. आमची सुरुवात चांगली झाली नसली तरी शेवटच्या 4-5 षटकांमध्ये आम्ही 70 पेक्षा जास्त धावा केल्या, ही आमच्यासाठी चांगली गोष्ट आहे. गोलंदाजीत आम्ही सुरुवातीची 14 षटकं चांगली टाकली. पण कमिन्सची खेळी खूपच चांगली होती.”
कमिन्स आणि व्यंकटेशची अर्धशतकं
या सामन्यात कोलकाता संघाचा कर्णधार श्रेयस अय्यरने नाणेफेक जिंकून प्रथम गोलंदाजी करण्याचा निर्णय घेतला होता. कर्णधाराचा निर्णय जलदगती गोलंदाज उमेश यादवने सार्थ ठरवला. त्याने पहिल्या षटकात केवळ एक धाव दिली. तर तिसऱ्या षटकात मुंबईचा कर्णधार रोहित शर्माला माघारी धाडलं. मुंबईने 11 षटकात 55 धावांत तीन विकेट गमावल्या होत्या. यानंतर सूर्यकुमार यादवच्या अर्धशतकाच्या जोरावर मुंबईने 4 बाद 161 धावा केल्या. प्रत्युत्तरात कोलकाता संघाने 5 विकेट्सच्या बदल्यात 162 धावा करून सामना जिंकला. पॅट कमिन्सने 15 चेंडूत नाबाद 56 धावा केल्या. तर सलामीवीर व्यंकटेश अय्यरने 41 चेंडूत नाबाद 50 धावा केल्या.
#RohitSharma This pretty much explains the #MIvsKKR Results ??#IPL pic.twitter.com/zBIZhkLPoZ
— Mohd Yawer (@Dashingboy3212) April 6, 2022
इतर बातम्या
MI vs KKR kieron pollard: पोलार्ड तात्या अजूनही तितकाच डेंजरस, पाच बॉलमध्ये दाखवून दिलं
KKR vs MI Rohit Sharma: उमेश यादव समोर रोहित शर्मा हतबल, IPL मध्ये आतापर्यंत इतकावेळ घेतला विकेट