Rohit sharma: ‘चल पळ तिथे’, भर मैदानात रोहित शर्मा युजवेंद्र चहलवर चिडला पहा VIDEO

रोहित युजवेंद्र चहलवर चिडला, ते सुद्धा स्टंम्पसमधल्या मायक्रोफोनमुळे सर्वांना समजलं. कोरोनामुळे स्टेडियमवर प्रेक्षकांना परवानगी नाहीय.

Rohit sharma: 'चल पळ तिथे', भर मैदानात रोहित शर्मा युजवेंद्र चहलवर चिडला पहा VIDEO
Rohit-chahal PTI Photo
Follow us
| Updated on: Feb 10, 2022 | 2:00 PM

अहमदाबाद: भारताने वेस्ट इंडिज विरुद्ध दुसरी वनडे जिंकून (India vs West indies) मालिकेत 2-0 अशी आघाडी घेतली आहे. फलंदाज म्हणून कालच्या सामन्यात रोहित शर्मा (Rohit sharma) अपयशी ठरला पण कॅप्टन म्हणून यशस्वी रणनिती आखून संघाच्या विजयात त्याने महत्त्वाची भूमिका बजावली. भारताने वेस्ट इंडिजला विजयासाठी 238 धावांचे लक्ष्य दिलं होतं. वनडेमध्ये (One day) तसं पाहायला गेलं, तर हे सामान्य लक्ष्य होतं. पण रोहितने अत्यंत हुशारीने गोलंदाजी आणि क्षेत्ररक्षणात वारंवार बदल करुन, वेस्ट इंडिजला अडचणीत आणलं. अखेर वेस्ट इंडिजचा डाव 193 धावात आटोपला व भारताने 44 धावांनी दुसरी वनडे जिंकली. कॅप्टन म्हणून मैदानावर वावरत असताना, रोहितला सतत खेळाडूंबरोबर संवाद साधावा लागत होता. क्षेत्ररक्षण लावताना खेळाडूंना काही सूचना कराव्या लागत होत्या. रोहितचे मैदानावरील हे शब्द, सूचना स्टंम्पसमधल्या मायक्रोफोनमुळे सर्वसामान्य प्रेक्षकांनाही समजत होत्या.

एकाप्रसंगी रोहित युजवेंद्र चहलवर चिडला, ते सुद्धा स्टंम्पसमधल्या मायक्रोफोनमुळे सर्वांना समजलं. कोरोनामुळे स्टेडियमवर प्रेक्षकांना परवानगी नाहीय. रिकाम्या स्टेडियम्समुळे स्टंम्पसमधल्या मायक्रोफोनद्वारे घरबसल्या प्रेक्षकांना मैदानावर खेळाडूंमध्ये होणारा संवाद समजतो.

नेमकं काय झालं? वेस्ट इंडिजचा डाव पूर्णपणे अडचणीत आलेला असताना, ओडियन स्मिथ आणि अलझारी जोसेफची नवव्या विकेटसाठी जमलेली जोडी थोडी त्रासदायक ठरत होती. त्यावेळी ही जोडी फोडण्यासाठी रोहितने ऑफ स्पिनर वॉशिंग्टन सुंदरला गोलंदाजीसाठी आणलं. त्यावेळी फिल्ड प्लेसमेंट करत असताना रोहित युजवेंद्र चहलवर चिडला.

रोहित स्मिथ-जोसेफची जोडी फोडण्यासाठी क्षेत्ररक्षणाची व्यूहरचना रचत असताना चहल रोहितला अपेक्षित असलेल्या वेगाने मैदानात हालचाल करत नव्हता. त्यामुळे रोहित चिडला. “मागे जा, काय झालं तुला? का नीट पळत नाहीयस? चल तिथे पळ” हे रोहितचे शब्द स्टंम्पसवरच्या मायक्रोफोनमुळे सर्वांनी ऐकले. त्यावेळी रोहित चिडलेला दिसत होता. ओडियन स्मिथला बाद केल्यानंतर वेस्ट इंडिजचा डाव गडगडला. 193 धावांवर त्यांचा संघ ऑलआऊट झाला. भारताने हा सामना 44 धावांनी जिंकला.

Rohit Sharma caught on stump mic yelling angry to Yuzvendra Chahal in 2nd ODI

Non Stop LIVE Update
सुप्रिया सुळे मुख्यमंत्रीपदाचा चेहरा? शरद पवार त्यांना CM करणार?
सुप्रिया सुळे मुख्यमंत्रीपदाचा चेहरा? शरद पवार त्यांना CM करणार?.
लाडकी बहीणचा महायुतीला फायदा होणार? पवार म्हणाले, 'नाव गोंडस पण...'
लाडकी बहीणचा महायुतीला फायदा होणार? पवार म्हणाले, 'नाव गोंडस पण...'.
इचलकरंजीत 2019च्या सभेची पुनरावृत्ती,भर पावसात पुन्हा शरद पवारांची सभा
इचलकरंजीत 2019च्या सभेची पुनरावृत्ती,भर पावसात पुन्हा शरद पवारांची सभा.
'एकदा या गद्दाराला पाडा...', उद्धव ठाकरेंचा अब्दुल सत्तारांवर हल्लाबोल
'एकदा या गद्दाराला पाडा...', उद्धव ठाकरेंचा अब्दुल सत्तारांवर हल्लाबोल.
MNS Manifesto : ''आम्ही हे करु'','मनसे'च्या जाहीरनाम्यात कोणासाठी काय
MNS Manifesto : ''आम्ही हे करु'','मनसे'च्या जाहीरनाम्यात कोणासाठी काय.
शिवतीर्थवरील सभेच्या शर्यतीतून मनसे आऊट? 17 तारखेची सभा होणार की नाही
शिवतीर्थवरील सभेच्या शर्यतीतून मनसे आऊट? 17 तारखेची सभा होणार की नाही.
'...मुली आणणार कुठून?', मुंडेंचा शरद पवार गटाच्या उमेदवाराला खोचक सवाल
'...मुली आणणार कुठून?', मुंडेंचा शरद पवार गटाच्या उमेदवाराला खोचक सवाल.
'भाजपविरोधात मतदान करा, नाहीतर अल्लाहसोबत बेईमानी...', फडणवीस आक्रमक
'भाजपविरोधात मतदान करा, नाहीतर अल्लाहसोबत बेईमानी...', फडणवीस आक्रमक.
महायुतीचा CM पदाचा चेहरा कोण? फडणवीस स्पष्टच म्हणाले, 'मी शर्यतीत...'
महायुतीचा CM पदाचा चेहरा कोण? फडणवीस स्पष्टच म्हणाले, 'मी शर्यतीत...'.
म्हणून राष्ट्रपती राजवट लागली, पवारांचं नाव घेत फडणवीसांचा गौप्यस्फोट
म्हणून राष्ट्रपती राजवट लागली, पवारांचं नाव घेत फडणवीसांचा गौप्यस्फोट.