Video : रोहित शर्माने टी20 वर्ल्डकप ट्रॉफी उंचावण्यापूर्वी केली मेस्सीची कॉपी, अगदी तशीच घेतली एन्ट्री

टी20 वर्ल्डकप स्पर्धा जिंकण्याचं स्वप्न अखेर पूर्ण झालं आहे. रोहित शर्मा, विराट कोहली आणि राहुल द्रविडने शेवट गोड केला. कारण राहुल द्रविडचा प्रशिक्षपदाचा कार्यकाळ संपला आहे. तर विराट-रोहितने या टी20 फॉर्मेटमधून निवृत्ती जाहीर केली आहे.सर्व काही आनंदात पार पडलं. आता रोहित शर्माचा ट्रॉफी घेतानाचा व्हिडीओ व्हायरल होत आहे. यात रोहित शर्माने हुबेहुब मेस्सीची कॉपी केली.

Video : रोहित शर्माने टी20 वर्ल्डकप ट्रॉफी उंचावण्यापूर्वी केली मेस्सीची कॉपी, अगदी तशीच घेतली एन्ट्री
Follow us
| Updated on: Jun 30, 2024 | 2:36 AM

टी20 वर्ल्डकप स्पर्धेच्या जेतेपदावर अखेर टीम इंडियाने नाव कोरलं आहे. धाकधूक वाढवणाऱ्या या सामन्यात भारताने विजय मिळवला. 14व्या षटकानंतर हा सामना दक्षिण अफ्रिकेच्या पारड्यात झुकला होता. मात्र तिथून हा सामना भारतीय संघाने खेचून आणला. जवळपास 11 वर्षे टीम इंडिया आयसीसी जेतेपदासाठी कासावीस झाली होती. गेल्या काही वर्षात संधी मिळाली सुद्धा..पण त्या संधीचं सोनं करण्यात अपयश आलं. पण टीम इंडियाची मेहनत मात्र सुरुच होती. त्याला आता कुठे यश मिळालं आहे. टी20 वर्ल्डकप स्पर्धेत एकही सामना न गमवता टीम इंडियाने विजय मिळवला आहे. वनडे वर्ल्डकप स्पर्धेतील पराभवानंतर सहा महिन्यातच टीम इंडियाने करून दाखवलं आहे. इतकंच काय तर बीसीसीआयने रोहित शर्मावर विश्वास दाखवला तो त्याने सार्थकी लावला. विजयानंतर प्रत्येक खेळाडू आनंदात न्हाहून निघाला होता. यावेळी रोहित शर्मा वेगळ्याच मूडमध्ये दिसला.

जेतेपदाची ट्रॉफी घेताना रोहित शर्माच्या अंगात लियोनल मेस्सीचं भूत संचारलं होतं, असं म्हंटलं वावगं ठरणार आहे. मेस्सीची फुटबॉल कारकीर्दही अशीच काहीशी होती. वर्ल्डकपचं स्वप्न उराशी बाळगून अनेक वर्षे काढली. अखेर शेवटच्या टप्प्यात जेतेपदावर नाव कोरलं. असंच काही रोहित शर्माचं झालं आहे. टी20 फॉर्मेटमधून निवृत्ती घेण्यापूर्वी जेतेपदाचं स्वप्न पूर्ण झालं आहे. म्हणूनच त्याने ट्रॉफी घेण्यासाठी मेस्सीच्या स्टाईलमध्ये एन्ट्री घेतली आणि ट्रॉफी उंचावली. रोहित शर्माची एन्ट्री पाहून खेळाडूंनाही आनंद झाला. त्यांनी प्रत्यक्ष क्षणांचा आनंद लुटला. तसेच ट्रॉफी उंचावून आनंदोत्सव साजरा केला.

दोन्ही संघांची प्लेइंग 11

दक्षिण आफ्रिका (प्लेइंग इलेव्हन): क्विंटन डी कॉक (विकेटकीपर), रीझा हेंड्रिक्स, एडन मार्कराम (कर्णधार), ट्रिस्टन स्टब्स, हेनरिक क्लासेन, डेव्हिड मिलर, मार्को जॅनसेन, केशव महाराज, कागिसो रबाडा, ॲनरिक नॉर्टजे, तबरेझ शामसी.

भारत (प्लेइंग इलेव्हन): रोहित शर्मा (कर्णधार), विराट कोहली, ऋषभ पंत (विकेटकीपर), सूर्यकुमार यादव, शिवम दुबे, हार्दिक पंड्या, रवींद्र जडेजा, अक्षर पटेल, अर्शदीप सिंग, कुलदीप यादव, जसप्रीत बुमराह.

Non Stop LIVE Update
विधानपरिषदेत शिवीगाळ, भर सभागृहात दानवेंनी कोणाला वापरली अर्वाच्य भाषा
विधानपरिषदेत शिवीगाळ, भर सभागृहात दानवेंनी कोणाला वापरली अर्वाच्य भाषा.
मुंबई पदवीधर मतदारसंघात अनिल परब vs किरण शेलारांमध्ये लढत, आघाडीवर कोण
मुंबई पदवीधर मतदारसंघात अनिल परब vs किरण शेलारांमध्ये लढत, आघाडीवर कोण.
नाहीतर भिडेंच्या मिशा कापणार, 'त्या' वादग्रस्त वक्तव्यावरून कुणी घेरल?
नाहीतर भिडेंच्या मिशा कापणार, 'त्या' वादग्रस्त वक्तव्यावरून कुणी घेरल?.
विधान परिषदेसाठी भाजपकडून ही 5 नावं जाहीर, मुंडेंसह कोणाची लागली वर्णी
विधान परिषदेसाठी भाजपकडून ही 5 नावं जाहीर, मुंडेंसह कोणाची लागली वर्णी.
पंकजा मुंडेंचं भाजपकडून पुनर्वसन, विधान परिषदेची उमेदवारी मिळाली
पंकजा मुंडेंचं भाजपकडून पुनर्वसन, विधान परिषदेची उमेदवारी मिळाली.
हे काय मॅच जिंकणार! विधानसभेत त्यांच्या...'त्या' दाव्यावर कुणाचा टोला?
हे काय मॅच जिंकणार! विधानसभेत त्यांच्या...'त्या' दाव्यावर कुणाचा टोला?.
आम्ही 13 जुलैपर्यंतच वाट बघणार, त्यानंतर...जरांगेंचा सरकारला अल्टिमेटम
आम्ही 13 जुलैपर्यंतच वाट बघणार, त्यानंतर...जरांगेंचा सरकारला अल्टिमेटम.
मनोज जरांगे साहेब, जरा शब्दांना...शिंदे गटाच्या महिला नेत्यानं सुनावलं
मनोज जरांगे साहेब, जरा शब्दांना...शिंदे गटाच्या महिला नेत्यानं सुनावलं.
कुटुंबातील 17 जण पिकनीकला, भावाचा फोन अन् घाबरतच म्हणाला, मुलगी वाहून
कुटुंबातील 17 जण पिकनीकला, भावाचा फोन अन् घाबरतच म्हणाला, मुलगी वाहून.
सत्तेची वारी शेवटची..माझी लाडकी बहीण योजनेवरून सामनातून दादांवर निशाणा
सत्तेची वारी शेवटची..माझी लाडकी बहीण योजनेवरून सामनातून दादांवर निशाणा.