IND vs ENG, Rohit Sharma : रोहितचा कोरोना रिपोर्ट निगेटिव्ह, टी-20 मालिका खेळण्यासाठी तयार? जाणून घ्या…

रोहित शर्माचा रिपोर्ट निगेटिव्ह आला आहे. लेस्टरशायरविरुद्धच्या सराव सामन्याच्या पहिल्या डावात रोहित शर्मा फलंदाजीला आला. मात्र त्यानंतर तो पॉझिटिव्ह असल्यानं सामन्यातून बाहेर पडला होता. संघातील इतर खेळाडूंचा अहवाल निगेटिव्ह आला असला आहे. आता रोहित खेळणार का, ते पाहणं महत्वाचं ठरेल. कसोटी 5 जुलै रोजी संपत आहे.

IND vs ENG, Rohit Sharma : रोहितचा कोरोना रिपोर्ट निगेटिव्ह, टी-20 मालिका खेळण्यासाठी तयार? जाणून घ्या...
Rohit sharmaImage Credit source: PTI
Follow us
| Updated on: Jul 03, 2022 | 11:58 AM

नवी दिल्ली : टीम इंडियासाठी एक महत्वाची बातमी असून तुम्ही त्याला बातमीला गूड न्यूजही म्हणू शकतात. रोहित शर्माबाबत (Rohit Sharma) टीम इंडियाला दिलासा देणारी ही बातमी समोर आली आहे. रोहितचा कोरोना (Corona) रिपोर्ट निगेटिव्ह आला आहे. अशा परिस्थितीत तो आयसोलेशनमधून बाहेर येऊ शकतो. आता रोहित निगेटिव्ह आला तर त्याची बातमी मात्र पॉझिटिव्ह आहे. त्यामुळे, त्‍याला इंग्‍लंड विरुद्धच्‍या 5व्‍या कसोटीतून (IND vs ENG) बाहेर काढण्‍यात आले. त्याच्या जागी जसप्रीत बुमराह संघाचे नेतृत्व करत आहे. बीसीसीआयने नुकतेच टी-20 आणि एकदिवसीय संघांची घोषणा केली. रोहित शर्माकडे दोन्ही झसंघांची कमान आली. अशा परिस्थितीत तो इंग्लंडविरुद्ध ७ जुलैपासून सुरू होणाऱ्या टी-२० मालिकेत टीम इंडियाचा भाग बनू शकतो. आयपीएल 2022 पासून तो आतापर्यंत आंतरराष्ट्रीय सामने खेळायला आलेला नाही.

रोहित शर्माचा रिपोर्ट निगेटिव्ह आला आहे. लेस्टरशायरविरुद्धच्या सराव सामन्याच्या पहिल्या डावात रोहित शर्मा फलंदाजीला आला. मात्र त्यानंतर तो पॉझिटिव्ह असल्यानं सामन्यातून बाहेर पडला होता. संघातील इतर खेळाडूंचा अहवाल निगेटिव्ह आला असला तरी कसोटी 5 जुलै रोजी संपत आहे. त्यामुळे विराट कोहलीसह 5 वरिष्ठ खेळाडूंना टी-20 मालिकेतील पहिल्या सामन्यासाठी विश्रांती देण्यात आली आहे.

आगामी मालिका महत्त्वाच्या

टीम इंडियाला इंग्लंडनंतर वेस्ट इंडिज दौऱ्यावर जायचे आहे. त्यानंतर टी-20 आशिया कप आहे. या वर्षी ऑक्टोबर-नोव्हेंबरमध्ये ऑस्ट्रेलियात टी-20 वर्ल्ड सामने होणार आहेत. अशा परिस्थितीत आता संघ व्यवस्थापन आणि प्रशिक्षक राहुल द्रविड अशा खेळाडूंना अधिक संधी देऊ इच्छितात ज्यांची T20 वर्ल्डसाठी निवड होऊ शकते. गेल्या वर्षी यूएईमध्ये झालेल्या स्पर्धेत भारतीय संघाची कामगिरी चांगली नव्हती. संघ पहिल्या फेरीतच बाद झाला होता.

पहिल्या T20 साठी संघ: रोहित शर्मा (कर्णधार), इशान किशन, ऋतुराज गायकवाड, संजू सॅमसन, सूर्यकुमार यादव, दीपक हुडा, राहुल त्रिपाठी, दिनेश कार्तिक, हार्दिक पंड्या, व्यंकटेश अय्यर, युझवेंद्र चहल, अक्षर पटेल, रवी बिष्णोई, भुवनेश्वर कुमार, हर्षल पटेल, आवेश खान, अर्शदीप सिंग आणि उमरान मलिक.

दुसऱ्या आणि तिसऱ्या T20 साठी संघ: रोहित शर्मा (कर्णधार), इशान किशन, विराट कोहली, सूर्यकुमार यादव, दीपक हुडा, श्रेयस अय्यर, दिनेश कार्तिक, ऋषभ पंत, हार्दिक पंड्या, रवींद्र जडेजा, युजवेंद्र चहल, अक्षर पटेल, जॅस्पीनो बुमराह, भुवनेश्वर कुमार, हर्षल पटेल, आवेश खान आणि उमरान मलिक.

Heart Attack: क्रिकेट खेळताना हृदयविकाराचा झटका, जागीच झाला मृ्त्यू
Heart Attack: क्रिकेट खेळताना हृदयविकाराचा झटका, जागीच झाला मृ्त्यू.
'ओबीसींना नाहक टार्गेट करु नये, अन्यथा..,' तायवाडे यांनी दिला इशारा
'ओबीसींना नाहक टार्गेट करु नये, अन्यथा..,' तायवाडे यांनी दिला इशारा.
पदांची पर्वा न करता कारवाई करा, बुलढाणा आक्रोश मोर्चात मागणी
पदांची पर्वा न करता कारवाई करा, बुलढाणा आक्रोश मोर्चात मागणी.
'बकरे की माँ कब तक दुवा मागेंगी ,' काय म्हणाले सुरेश धस?
'बकरे की माँ कब तक दुवा मागेंगी ,' काय म्हणाले सुरेश धस?.
अंजली दमानिया रिचार्जवर चालणाऱ्या ताई, राष्ट्रवादीच्या नेत्याची टीका
अंजली दमानिया रिचार्जवर चालणाऱ्या ताई, राष्ट्रवादीच्या नेत्याची टीका.
माझ्या कुटुंबाला तुमच्या आधाराची गरज, देशमुख यांच्या कन्येची मागणी
माझ्या कुटुंबाला तुमच्या आधाराची गरज, देशमुख यांच्या कन्येची मागणी.
भाजपाचे केवळ ७७ आमदार निवडून आलेत, आमदाराच्या स्फोटक दाव्यांनी खळबळ
भाजपाचे केवळ ७७ आमदार निवडून आलेत, आमदाराच्या स्फोटक दाव्यांनी खळबळ.
आवक जादा झाल्याने संत्र्‍यांचे भाव कोसळले, शेतकऱ्यांना मोठा तोटा
आवक जादा झाल्याने संत्र्‍यांचे भाव कोसळले, शेतकऱ्यांना मोठा तोटा.
बीड हत्या प्रकरण : अंजली दमानिया यांना गुन्हे शाखेची नोटीस
बीड हत्या प्रकरण : अंजली दमानिया यांना गुन्हे शाखेची नोटीस.
संतोष देशमुख प्रकरणात राष्ट्रवादीच्या महिला पदाधिकाऱ्याची CID चौकशी
संतोष देशमुख प्रकरणात राष्ट्रवादीच्या महिला पदाधिकाऱ्याची CID चौकशी.