रोहित शर्माचा विसरभोळेपणा पुन्हा एकदा अधोरेखित, विजयी सोहळ्यात झालं असं की…

टी20 वर्ल्डकप जेतेपद मिळवल्यानंतर टीम इंडियाचं मोठ्या जल्लोषात स्वागत करण्यात आलं. चाहत्यांचा उत्साह आणि प्रेम पाहून भारतीय खेळाडूही भारावून गेले. वर्ल्डकप जिंकल्यानंतर पाच दिवस उलटूनही चाहत्यांचा उत्साह पाहून खेळाडूंचं मन भरून आलं. विजयी सोहळ्यात कर्णधार रोहित शर्माने आपल्या भावनांना मोकळी वाट करून दिली. पण या संबोधनातही त्याचा विसरभोळेपणा अधोरेखित झाला.

रोहित शर्माचा विसरभोळेपणा पुन्हा एकदा अधोरेखित, विजयी सोहळ्यात झालं असं की...
Follow us
| Updated on: Jul 04, 2024 | 10:32 PM

टीम इंडियाने टी20 वर्ल्डकपचं जेतेपद 17 वर्षांनंतर मिळवलं. तसेच आयसीसी चषकांचा दुष्काळ 11 वर्षानंतर संपवला. टीम इंडियाच्या या कामगिरीचं सर्वच स्तरातून कौतुक होत आहे. मुंबईत तर खेळाडूंचं न भूतो न भविष्यती असं स्वागत करण्यात आलं. लाखोंचा जनुसमुदाय यावेळी टीम इंडियाच्या स्वागतासाठी जमा झाला होता. भारतीय खेळाडूंनाही चाहत्यांचा जोश पाहून आनंद झाला. या विजयाच्या सोहळ्यात कर्णधार रोहित शर्माने आपल्या भावनांना मोकळी वाट करून दिली. रोहित शर्माने खेळाडू, सपोर्ट स्टाफ आणि चाहत्यांचे आभार मानले. यावेळी रोहित शर्माचा विसरभोळेपणा पुन्हा एकदा अधोरेखित झाला. टी20 वर्ल्डकप जिंकून 14 वर्षांचा दुष्काळ संपवला असं रोहित शर्मा सहज म्हणून गेला. पण नंतर त्याला आपली चूक लक्षात आली आणि त्याने चूक दुरूस्त केली. आयसीसी चषकांचा 11 वर्षांचा दुष्काळ संपवला असं म्हणून त्याने तात्काळ आपल्या चुकीची दुरुस्ती केली.

रोहित शर्माने हार्दिक पांड्या, सूर्यकुमार यादव याचंही कौतुक केलं. हार्दिक पांड्याने शेवटच्या षटकात घेतलेली विकेट खूपच महत्त्वाची होती असं तो म्हणाला. तर सूर्यकुमार यादवने घेतलेल्या झेलचं कौतुक करण्यासही मागेपुढे पाहिलं नाही. रोहित शर्माने हार्दिक पांड्याचा उल्लेख केल्यानंतर चाहत्यांनीही दाद दिली. यावेळी त्यांनी हार्दिक हार्दिकचा जयघोष केला. हे सर्व ऐकून हार्दिक पांड्या भावूक झाल्याचं दिसून आलं. ही खूप खास टीम आहे आणि मी खूप नशिबवान आहे की या संघाचं नेतृत्व करत असंही रोहित शर्मा पुढे म्हणाला. हा चषक संपूर्ण देशाचा आहे असंही रोहित शर्माने सांगितलं.

रोहित शर्माने यावेळी 2007 टी20 वर्ल्डकप आणि आताच्या वर्ल्डकपची तुलना होऊ शकत नाही असंही सांगितलं. दोन्ही विजय तितकेच महत्त्वाचे होते. 2011 वनडे वर्ल्डकप असो की, 2013 चॅम्पियन्स ट्रॉफी आणि आताचा टी20 वर्ल्डकप सर्वकाही स्पेशल आहे. दरम्यान, 2025 चॅम्पियन्स ट्रॉफी पाकिस्तानात होणार आहे. ही स्पर्धा भारतासाठी महत्त्वाची आहे. कारण मागच्या चॅम्पियन्स ट्रॉफीमध्ये पाकिस्तानने भारताला अंतिम फेरीत पराभूत केलं होतं. रोहित शर्मा आणि विराट कोहलीने टी20 वर्ल्डकप क्रिकेटला रामराम ठोकला आहे. मात्र दोघंही वनडे खेळणार आहे. त्यामुळे चॅम्पियन ट्रॉफी 2025 स्पर्धा खूपच महत्त्वाची आहे.

Non Stop LIVE Update
कोकणरेल्वेचा खोळंबा; रूळावर पाणी,एक्स्प्रेस अडकल्या, प्रवाशांची पायपीट
कोकणरेल्वेचा खोळंबा; रूळावर पाणी,एक्स्प्रेस अडकल्या, प्रवाशांची पायपीट.
पनवेलच्या पडघे गावाला पुराचा वेढा, साचलं गुडघाभर पाणी अन् वाहनं गेली..
पनवेलच्या पडघे गावाला पुराचा वेढा, साचलं गुडघाभर पाणी अन् वाहनं गेली...
मला हरभऱ्याच्या झाडावर चढवू नका, वडेट्टीवार काय म्हणाले?
मला हरभऱ्याच्या झाडावर चढवू नका, वडेट्टीवार काय म्हणाले?.
मुख्यमंत्री शिंदेंच्या दरे गावची वाहतूक पूर्णपणे बंद, नेमकं कारण काय?
मुख्यमंत्री शिंदेंच्या दरे गावची वाहतूक पूर्णपणे बंद, नेमकं कारण काय?.
राज्यात मध्यरात्रीपासूनच संततधार, तुमच्या जिल्ह्यात कोणता अलर्ट?
राज्यात मध्यरात्रीपासूनच संततधार, तुमच्या जिल्ह्यात कोणता अलर्ट?.
लाडकी बहीण योजनेचा 'या' महिलांना देखील लाभ, फडणवीसांनी केलं स्पष्ट
लाडकी बहीण योजनेचा 'या' महिलांना देखील लाभ, फडणवीसांनी केलं स्पष्ट.
विठुरायाच्या भक्तांसाठी आनंदाची बातमी, आजपासून 24 तास...
विठुरायाच्या भक्तांसाठी आनंदाची बातमी, आजपासून 24 तास....
सोमय्यांचा हातोडा त्यांच्याच पायावर, आरोपांनंतर वायकरांना क्लिनचीट
सोमय्यांचा हातोडा त्यांच्याच पायावर, आरोपांनंतर वायकरांना क्लिनचीट.
जरांगेंचा अल्टिमेटम अन काय करणार सरकार? सगेसोयऱ्यांचा अध्यादेश काढणार?
जरांगेंचा अल्टिमेटम अन काय करणार सरकार? सगेसोयऱ्यांचा अध्यादेश काढणार?.
शिवसेना,राष्ट्रवादीवर सुप्रीम फैसला, विधानसभेच्या आधी काय येणार निर्णय
शिवसेना,राष्ट्रवादीवर सुप्रीम फैसला, विधानसभेच्या आधी काय येणार निर्णय.