रोहित शर्माकडे ख्रिस गेलचा हा महारेकॉर्ड मोडण्याची संधी

भारताचा कर्णधार रोहित शर्माने ऑस्ट्रेलिया विरुद्ध धडाकेबाज खेळी केली होती. त्याने ४२ बॉलमध्ये ९२ रन केले. रोहित शर्माचं शतक थोड्यासाठी हुकलं. आता जर भारत फायनलमध्ये पोहोचली तर आणखी दोन सामने होऊ शकतात. ज्यामध्ये रोहित शर्माकडे मोठा रेकॉर्ड करण्याची संधी आहे.

रोहित शर्माकडे ख्रिस गेलचा हा महारेकॉर्ड मोडण्याची संधी
Follow us
| Updated on: Jun 26, 2024 | 6:01 PM

ICC T20 विश्वचषक 2024 मध्ये टीम इंडियाचा कर्णधार रोहित शर्मा आता चांगल्या फॉर्ममध्ये खेळत आहे. ज्या पद्धतीने त्याने ऑस्ट्रेलिया विरुद्ध फलंदाजी केली आहे ती गेम चेंजर ठरली आहे. रोहित शर्मा टीम इंडियाचं नेतृत्व करत आहे. या T20 विश्वचषकात त्याने भारतासाठी आतापर्यंत सर्वाधिक धावा केल्या आहेत. ICC T20 विश्वचषक 2024 मध्ये टीम इंडियाने सेमीफायनलमध्ये धडक दिली आहे. तेथे त्याचा सामना इंग्लंड सोबत होणार आहे. भारतीय संघाने जर उपांत्य फेरीत विजय मिळवल्यास तर अंतिम सामना अफगाणिस्तान किंवा दक्षिण आफ्रिकेविरोधात होऊ शकतो. रोहित शर्माने या दोन सामन्यांमध्ये 11 सिक्स मारले आहे. तर T20 आणि ODI विश्वचषक स्पर्धेत सर्वाधिक षटकार मारण्याचा विश्वविक्रम रोहितच्या नावावर जाईल. सध्या हा विश्वविक्रम वेस्ट इंडिजचा माजी सलामीवीर ख्रिस गेलच्या नावावर आहे.

T20 आणि एकदिवसीय विश्वचषकासह, ख्रिस गेलने 2003 ते 2021 दरम्यान एकूण 112 सिक्स मारलेत. तर रोहित शर्माने 2007 ते 2024 दरम्यान एकूण 102 सिक्स मारले आहेत. विश्वचषकात गेल आणि रोहित हे दोनच फलंदाज आहेत ज्यांनी मिळून १०० हून अधिक सिक्स मारलेत. ऑस्ट्रेलियाचा डेव्हिड वॉर्नर या यादीत तिसऱ्या स्थानावर आहे, ज्याने 2009 ते 2024 दरम्यान एकूण 81 सिक्स मारले आहेत. चौथ्या क्रमांकावर ऑस्ट्रेलियाचा ग्लेन मॅक्सवेल आहे, ज्याने 2012 ते 2024 दरम्यान 73 सिक्स मारले आहेत.

पाचव्या क्रमांकावर दक्षिण आफ्रिकेचा एबी डिव्हिलियर्स आहे. ज्याने 2007 ते 2016 दरम्यान एकूण 67 सिक्स मारले आहेत. यादीतील टॉप-10 मध्ये रोहित शर्मा हा एकमेव भारतीय आहे, तर विराट कोहली 12 व्या क्रमांकावर आहे. विराट कोहलीने 2011 ते 2024 दरम्यान 46 सिक्स मारले आहेत. रोहित शर्माने टीम इंडियाच्या सुपर-8 मधील शेवटच्या सामन्यात ऑस्ट्रेलियाविरुद्ध आठ सिक्स मारले होते आणि तो ज्याप्रकारे फॉर्मात आहे, तो गेलचा हा महान विक्रम मोडू शकतो.

रोहित शर्माने ऑस्ट्रेलिया विरुद्धच्या सामन्यात जोरदार फटकेबाजी करत फक्त ४२ बॉलमध्ये ९२ रनची खेळी केली होती. रोहित शर्माने ७ फोर आणि ८ सिक्स या सामन्यात ठोकले होते.

18 दिवसांनंतरही आरोपींना अटक नाही, पोलीस करतायत तरी काय ?
18 दिवसांनंतरही आरोपींना अटक नाही, पोलीस करतायत तरी काय ?.
आणखी एका सरपंचावर जीवघेणा हल्ला, तुळजापुरात बीडची पुनरावृत्ती
आणखी एका सरपंचावर जीवघेणा हल्ला, तुळजापुरात बीडची पुनरावृत्ती.
माझा संतोष देशमुख होण्याची वाट बघताय का ? कोणी केला सवाल
माझा संतोष देशमुख होण्याची वाट बघताय का ? कोणी केला सवाल.
अभिनेते अनुपम खेर यांची माजी पंतप्रधान मनमोहन सिंग यांना श्रद्धांजली
अभिनेते अनुपम खेर यांची माजी पंतप्रधान मनमोहन सिंग यांना श्रद्धांजली.
बीड प्रकरणात आरोपीला वाचवण्यात गृहमंत्र्यांचा हात - संजय राऊतांचा आरोप
बीड प्रकरणात आरोपीला वाचवण्यात गृहमंत्र्यांचा हात - संजय राऊतांचा आरोप.
माजी पंतप्रधान डॉ. मनमोहन सिंह यांचं निधन, देशात 7 दिवसांचा दुखवटा
माजी पंतप्रधान डॉ. मनमोहन सिंह यांचं निधन, देशात 7 दिवसांचा दुखवटा.
डॉ. मनमोहन सिंह यांचं निधन, शरद पवार यांनी वाहिली श्रद्धांजली
डॉ. मनमोहन सिंह यांचं निधन, शरद पवार यांनी वाहिली श्रद्धांजली.
देशाच्या अर्थव्यवस्थेला बळकट करणारं नेतृत्व
देशाच्या अर्थव्यवस्थेला बळकट करणारं नेतृत्व.
महाराष्ट्रातल्या सर्व शस्र परवान्यांची चौकशी लावा - अंजली दमानिया
महाराष्ट्रातल्या सर्व शस्र परवान्यांची चौकशी लावा - अंजली दमानिया.
99 अपराध यांनी पचवले, संतोष देशमुख 100 वा होता, काय म्हणाले सुरेश धस?
99 अपराध यांनी पचवले, संतोष देशमुख 100 वा होता, काय म्हणाले सुरेश धस?.