IND vs SL: ‘श्रेयसला माहितीय तो अजिंक्यच्या….’, रोहित शर्मा अय्यरबद्दल बोलला खास गोष्ट
IND vs SL: भारताने आज श्रीलंकेविरुद्धचा दुसरा कसोटी सामना (IND vs SL 2nd Test) 238 धावांच्या मोठ्या फरकाने जिंकला. भारताने ही मालिका 2-0 अशी जिंकली आहे.
IND vs SL: भारताने आज श्रीलंकेविरुद्धचा दुसरा कसोटी सामना (IND vs SL 2nd Test) 238 धावांच्या मोठ्या फरकाने जिंकला. भारताने ही मालिका 2-0 अशी जिंकली आहे. या सामन्यात भारताच्या युवा खेळाडूंनी जबरदस्त कामगिरी केली. श्रेयस अय्यरने (Shreyas iyer) दोन्ही डावात अर्धशतक झळकवली व भारताच्या विजयात मोलाचं योगदान दिलं. हा डे-नाइट कसोटी सामना गुलाबी चेंडूने खेळवण्यात आला. रोहितने (Rohit sharma) सामना संपल्यानंतर श्रेयस अय्यर, ऋषभ पंत, आर. अश्विन आणि रवींद्र जाडेजा या खेळाडूंच कौतुक केलं. संघाने विजयाचा आनंद साजरा केला. प्रेक्षकांच्या उपस्थितीने या सामन्याला आणखी विशेष बनवलं, असं रोहितने सांगितलं. पहिल्या कसोटी सामन्याप्रमाणे दुसऱ्या कसोटीचाही टीम इंडियाने तीन दिवसात निकाल लावला आहे. भारताने दिलेल्या 447 धावांच्या लक्ष्याचा पाठलाग करताना श्रीलंकेचा दुसरा डाव 208 धावात संपुष्टात आला. भारताने हा कसोटी सामना 238 धावांनी जिंकला. मोहाली कसोटीत टीम इंडियाने डावाने विजय मिळवला होता.
रवींद्र जाडेजा परिपूर्ण पॅकेज “आम्ही टीम म्हणून या सामन्याचा आनंद घेतला. आम्हाला अनेक गोष्टी साध्य करायच्या होत्या आणि आम्ही त्या केल्या, असं मला वाटतं. रवींद्र जाडेला एक फलंदाज म्हणून विकसित झालेलं पाहिलं. फलंदाज म्हणून दिवसागणिक त्याच्यात अधिकाधिक सुधारणा होतेय. सातव्या क्रमांकावर येऊन तो फलंदाजीला अधिक भक्कम बनवतो. तो एक परिपूर्ण पॅकेज आहे. त्याच्या फिल्डिंग आणि गोलंदाजीचा संघाला भरपूर फायदा होतो” असं रोहित म्हणाला. रोहितच्या नेतृत्वाखाली टीमने आज पहिला विजय मिळवला.
श्रेयस अय्यरबद्दल म्हणाला
“टी 20 चा फॉर्म श्रेयसने कसोटीतही कायम ठेवला. टी 20 मालिकेत तो एकदाही आऊट झाला नव्हता. पुजारा आणि रहाणेच्या जागी तो खेळतोय, हे त्याला ठाऊक होतं. त्याने चांगली कामगिरी केली” असं रोहित शर्मा म्हणाला. या कसोटीच्या पहिल्या डावात श्रेयसने 92 आणि दुसऱ्याडावात 67 धावा केल्या.
ऋषभ पंतचही कौतुक
“प्रत्येक सामन्यागणिक ऋषभ पंतमध्ये सुधारणा होतेय. मागच्यावर्षी इंग्लंड विरुद्धच्या मालिकेत आणि आताही त्याने घेतलेले स्टंम्पिग आणि कॅचेसमध्ये त्याचा आत्मविश्वास दिसून आला” असे रोहित म्हणाला.
Words of praise from #TeamIndia Captain @ImRo45 for the champion bowler @ashwinravi99 ? ?#INDvSL | @Paytm pic.twitter.com/SKySkSMj13
— BCCI (@BCCI) March 14, 2022
अश्विन मॅच विनर “अश्विनच्या हाती आम्ही जेव्हा कधी चेंडू सोपवतो, तेव्हा तो मॅच विनिंग कामगिरी करतो. अजून अनेक वर्ष त्याला खेळायचं आहे” असं रोहित म्हणाला.