आयपीएलमधील (IPL) सर्वात यशस्वी संघ मुंबई इंडियन्स (Mumbai Indians) यांचा आजचा पंजाब किंग्स विरुद्धचा सामना त्यांच्यासाठी अत्यंत महत्त्वाचा असणार आहे. दुसरे पर्व सुरु झाल्यापासून सलग तीन सामने पराभूत
झाल्यामुळे आजचा सामना जिंकण त्यांच्यासाठी अनिवार्य आहे. दरम्यान संघाचा कर्णधार रोहित शर्मा (Rohit Sharma) याच्याकडे संघाला जिंकवण्यासह एका विक्रमाला गवासणी घालण्याची संधी देखील आहे. आजच्या सामन्यात दोन षटकार खेचताच रोहित टी20 मध्ये 400 षटकार पूर्ण करेल. यासोबतच तो सर्वाधिक टी20 षटकार लगावणाऱ्यांमध्ये आठव्या स्थानावरुन सातव्या स्थानावर जाऊ शकतो. 399 षटकार ठोकणाऱ्या
ऑस्ट्रेलियाच्या एरॉन फिंचला तो मागे टाकू शकतो. रोहितने आतापर्यंत 352 सामन्यात 398 षटकार ठोकले आहेत.