Rohit sharma New Test Captain: विराटच्या जागी टेस्टमध्ये कॅप्टन कोण? अखेर प्रश्नाच मिळालं उत्तर
Rohit sharma New Test Captain: रोहित शर्माची (Rohit Sharma) भारताच्या कसोटी संघाच्या कर्णधारपदी (India new test Captain) निवड करण्यात आली आहे.
मुंबई: दक्षिण आफ्रिकेतील कसोटी मालिकेत (South Africa test series) 2-1 असा पराभव झाल्यानंतर मागच्या महिन्यात विराट कोहलीने (Virat kohli) कसोटी संघाचे कर्णधारपद सोडलं होतं. त्यानंतर विराटच्या जागी कोण कर्णधार होणार? अशी क्रिकेट चाहत्यांमध्ये चर्चा सुरु होती. रोहित शर्मा, केएल राहुल, ऋषभ पंत आणि जसप्रीत बुमराह या चार नावांवर चर्चा सुरु होती. राहुल आणि बुमराहने आपल्याला कसोटी संघाचे कर्णधारपद भूषवायला आवडेल, तो आपला सन्मानच असेल, असं म्हटलं होतं. भारताच्या वनडे आणि टी-20 संघाचा नियमित कर्णधार म्हणून रोहित शर्माची (Rohit sharma) आधीच निवड झाली होती. त्यामुळे रोहित शर्माचं नाव टेस्ट कॅप्टनशिपसाठी आघाडीवर होतं. अखेर आज त्यावर शिक्कामोर्तब झालं. रोहित शर्माची भारताच्या कसोटी संघाच्या कर्णधारपदी निवड करण्यात आली आहे. तो विराट कोहलीची जागा घेईल. आगामी श्रीलंकेविरुद्धच्या कसोटी मालिकेपासून रोहित कसोटी कर्णधार म्हणून करीयर सुरु करेल. रोहित आता क्रिकेटच्या तिन्ही फॉर्मेटमध्ये कॅप्टन बनला आहे.