IND vs PAK T20 World Cup: जिंकल्यानंतर रोहित शर्माने Virat Kohli ला चक्क खांद्यावर उचललं, पहा VIDEO
IND vs PAK T20 World Cup: रोहितच्या डोळ्यात आधी पाणी आलं, जिंकल्यानंतरही तो स्वत:ला रोखू शकला नाही.
मेलबर्न: भारत-पाकिस्तानमध्ये (IND vs PAK) आज क्रिकेटचा एक रोमांचक सामना पहायला मिळाला. अखेरच्या चेंडूपर्यंत क्रिकेटचा थरार टिपेला पोहोचला होता. जगभरातील कोट्यवधी क्रिकेटप्रेमींचे श्वास रोखले गेले होते. अखेरच्या चेंडूवर रविचंद्रन अश्विनने (R AShwin) चौकार मारुन टीम इंडियाला विजय मिळवून दिला. खरंतर या मॅचमध्ये पाकिस्तान चांगल्या स्थितीमध्ये होता. पण विराट कोहलीने (Virat Kohli) बाजी उलटवली.
त्या दोघांनी मॅच सोडली नाही
रोहित शर्माने टॉस जिंकून पाकिस्तानला प्रथम फलंदाजीसाठी पाचारण केलं. पाकिस्तानने 20 ओव्हर्समध्ये 8 बाद 159 धावा केल्या. या लक्ष्याचा पाठलाग करताना टीम इंडियाची स्थिती 4 बाद 31 होती. अनेकांनी अपेक्षा सोडून दिली होती. पण विराट कोहली आणि हार्दिक पंड्याने मॅच सोडली नाही.
अशक्यप्राय वाटणारा विजय शक्य
दोघे जिद्दीने लढले आणि अशक्यप्राय वाटणारा विजय मिळवून दिला. विराटने 53 चेंडूत नाबाद 82 आणि हार्दिक पंड्याने 37 चेंडूत 40 धावा केल्या. फटकेबाजीची सुरुवात हार्दिक पंड्याने करुन दिली. पण नंतर रंगात आला, तो विराट कोहली. विराट जबरदस्त खेळला. 1 चेंडूत 1 रन्सची गरज असताना तो नॉन स्ट्राइकवर होता.
Winning Moments?
Rohit Sharma lifted Virat Kohli – Best Inning of #ViratKohli
#INDvsPAK2022 #IndVsPak pic.twitter.com/jHFONHg3Xb
— कॉशुर ? ?? (@koshur_90) October 23, 2022
रोहित शर्माला इतका आनंद झाला की, त्याने….
अश्विनने चौकार मारुन विजय मिळवून देताना टीम इंडियाने सेलिब्रेशन सुरु केलं. ऐतिहासिक मेलबर्नच्या मैदानात हा विजय मिळवला आहे. दीर्घकाळ लक्षात राहील, असा हा विजय आहे. टीम इंडियाच्या या विजयाने रोहित शर्माला इतका आनंद झाला की, त्याने चक्क विराट कोहलीला आपल्या खांद्यावर उचलून घेतलं.