AQI
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

IND vs WI, Rohit Sharma : अरेरे गडबड झाली, जे व्हायचं तेच झालं, रोहित शर्मासोबत सामन्यात नेमकं काय घडलं? पाहा VIDEO

कर्णधार रोहित शर्मानं वेस्ट इंडिजविरुद्धच्या दुसऱ्या टी-20 सामन्यातही असं काही केलं की त्यानंतर चर्चा सुरू झाली. ही गडबड नेमकी काय झाली, रोहितनं नेमकं काय केलं, जाणून घ्या...

IND vs WI, Rohit Sharma : अरेरे गडबड झाली, जे व्हायचं तेच झालं, रोहित शर्मासोबत सामन्यात नेमकं काय घडलं? पाहा VIDEO
कालच्या सामन्यात गडबडImage Credit source: social
Follow us
| Updated on: Aug 02, 2022 | 7:39 AM

नवी दिल्ली : प्रत्येक खेळाडूला असं वाटतं की त्यानं अशा एखाद्या विक्रमाचं (Records) उदाहरण बनू नये की ज्यामुळे त्याला पश्चाताप करावा लागेल. खेळाडू याकडे देखील लक्ष देऊन असतात. पण, अनेकदा असा विक्रम नकळत होतो. तो घडून जातो. ते अनावधानानं होतं. कोणत्याही खेळात विजय-पराजय असतोच. कोणत्याही सामन्यापूर्वी सराव असला तरी मैदानात काय होईल, हे सांगता येत नाही. पण, असं अनेकदा होतं जे खेळाडूंना देखील अनपेक्षित असतं. आता रोहित शर्माच्या (Rohit Sharma) नावावर असाच एक विक्रम जमा झाला आहे . म्हणजेच वेस्ट इंडिजविरुद्धच्या (IND vs WI) दुसऱ्या टी-20 सामन्यातही असाच प्रकार घडला, जो भारतीय कर्णधार आजवर सावरत होता. त्यानं थोडी धांदल उडवल्यामुळेही हे घडलंय. आता जिथे गोंधळ असेल तिथे गडबड तर होणारच ना. पहिला T20 भारतीय नायक आणि कर्णधार रोहित शर्मा धावा करण्याच्या इराद्याने क्रीझवर उतरला. पण, उलट्या पायाने डगआऊटवर परतावे लागल्याने त्याचा बेत फसला.

कोणता विक्रम रोहितच्या गळ्यात पडला?

कालत्या इंडिजविरुद्धच्या सामन्यात असं झालं की नेहमीप्रमाणे रोहित शर्मानं स्ट्राइक घेतली. येथे गोलंदाजीत ओबेद मॅकॉयने वेस्ट इंडिजकडून पदार्पण केलं. पण पहिल्याच चेंडूवर जे घडले, जे दाखवले गेले. त्यामुळे रोहित शर्माला लाजिरवाण्या विक्रमाच्या पंक्तीत जाऊन बसावं लागलं.

हा व्हिडीओ पाहा

…तर तो एक लाजिरवाणा विक्रम

आता तुम्ही म्हणाल हे काय आहे. कोणता असा विक्रम आहे, कोणता व्हिडीओ आहे. तर जाणून घ्या. रोहित शर्माची विकेट पडली. ते ठीक आहे. पण, आंतरराष्ट्रीय सामन्याच्या पहिल्याच चेंडूवर कर्णधारपदावरून बाद होणारा रोहित शर्मा हा पहिला भारतीय आणि जगातील दुसरा खेळाडू ठरला आहे.

पहिल्याच चेंडूवर बाद

रोहित शर्माच्या आधी सामन्याच्या पहिल्याच चेंडूवर बाद झालेला कर्णधार आयर्लंडचा विल्यम पोर्टरफिल्ड होता. 2012 मध्ये ऑस्ट्रेलियाविरुद्धच्या सामन्यात तो पहिल्याच चेंडूवर बाद झाला होता. याशिवाय टी-20 आंतरराष्ट्रीय सामन्यात पहिल्या चेंडूवर बाद होणारा रोहित हा भारताचा दुसरा खेळाडू आहे. त्याच्याआधी पृथ्वी शॉनेही टी-20 आंतरराष्ट्रीय सामन्यात पहिल्या चेंडूवर विकेट फेकली होती.

खातेही उघडता आले नाही

रोहित शर्माने वेस्ट इंडिजविरुद्धच्या दुसऱ्या T20 सामन्यात फक्त 1 चेंडूचा सामना केला, ज्यावर तो बाद झाला. म्हणजेच पहिल्या T20 मध्ये 62 धावांची इनिंग खेळणाऱ्या भारतीय कर्णधाराला दुसऱ्या सामन्यात खातेही उघडता आले नाही. त्यामुळे या नको असलेल्या विक्रमाची चांगलीच चर्चा काल रंगली होती. क्रिकेटप्रेमींना देखील हे आवडलेलं नाही.

पाकचा पुंछमध्ये मोठा हल्ला, काळजाचा ठोका चुकणारा व्हिडीओ पाहिला?
पाकचा पुंछमध्ये मोठा हल्ला, काळजाचा ठोका चुकणारा व्हिडीओ पाहिला?.
मुस्लिम सुपरस्टार मित्रासाठी अभिनेत्याची मंदिरात पूजा; वादाला उधाण
मुस्लिम सुपरस्टार मित्रासाठी अभिनेत्याची मंदिरात पूजा; वादाला उधाण.
India-Pakistan War : अटारी-वाघा बॉर्डरवर बीटिंग रिट्रीट बंद, कारण...
India-Pakistan War : अटारी-वाघा बॉर्डरवर बीटिंग रिट्रीट बंद, कारण....
खुदा न खास्ता अगर... तणावादरम्यान मेहबूबा मुफ्तींच्या डोळ्यात पाणी अन्
खुदा न खास्ता अगर... तणावादरम्यान मेहबूबा मुफ्तींच्या डोळ्यात पाणी अन्.
संरक्षण मंत्र्यांची तिन्ही सैन्यांसोबत बैठक,भारताची पुढची रणनिती ठरणार
संरक्षण मंत्र्यांची तिन्ही सैन्यांसोबत बैठक,भारताची पुढची रणनिती ठरणार.
IPL 2025 : आयपीएलचे उर्वरित सामने रद्द होणार? BCCI लवकरच घेणार निर्णय
IPL 2025 : आयपीएलचे उर्वरित सामने रद्द होणार? BCCI लवकरच घेणार निर्णय.
पाकिस्ताननं जगाकडे मागितली भीक, युद्धासाठी कर्ज हवं? पण खरं काय?
पाकिस्ताननं जगाकडे मागितली भीक, युद्धासाठी कर्ज हवं? पण खरं काय?.
पाकला कडकी...भीक मागण्याची वेळ तरी युद्धाची खुमखुमी, जगापुढे पसरले हात
पाकला कडकी...भीक मागण्याची वेळ तरी युद्धाची खुमखुमी, जगापुढे पसरले हात.
पाकिस्तानची मोठी कबुली...ती आमची चूक, US च्या इशाऱ्यावरून घाणरडं कृत्य
पाकिस्तानची मोठी कबुली...ती आमची चूक, US च्या इशाऱ्यावरून घाणरडं कृत्य.
जल, थल, आकाश! भारताकडून पाकिस्तानवर जोरदार हल्ला सुरूच
जल, थल, आकाश! भारताकडून पाकिस्तानवर जोरदार हल्ला सुरूच.