Sarfaraz Khan| सरफराज खानला टीम इंडियात घेण्याआधी रोहित शर्माने त्याची हेरगिरी का केलेली?
Sarfaraz Khan| सरफराज खानने राजकोट टेस्टच्या दोन्ही इनिंगमध्ये मिळून एकूण 130 धावा केल्या आहेत. त्याने पहिल्या डावात 62 आणि दुसऱ्या डावात नाबाद 68 धावा केल्या. राजकोट टेस्ट संपल्यानंतर कॅप्टन रोहित शर्मा सरफराज खानबद्दल एक मोठी गोष्ट बोलला.
Sarfaraz Khan| भारत आणि इंग्लंडमधील तिसऱ्या कसोटी सामन्यादरम्यान सरफराज खानने फक्त डेब्युच केला नाही, तर आपलं नाण खणखणीत वाजवून दाखवलं. पण तुम्हाला माहित आहे का? ज्या राजकोटमध्ये सरफराजने राज्य केलं, त्याला टीममध्ये घेण्याआधी त्याची हेरगिरी झाली होती. त्याची चौकशी करण्यात आली होती. हे सर्व करण्यामागे टीम इंडियाचा कॅप्टन रोहित शर्मा होता. गमतीशीर बाब म्हणजे स्वत: रोहितने याचा खुलासा केला.
रोहित शर्मा या गोष्टीचा कधी खुलासा केला? राजकोट टेस्ट मॅच संपल्यानंतर पत्रकार परिषदेत रोहितने हा खुलासा केला. देशांतर्गत क्रिकेटमध्ये सरफराज खान धावांचा पाऊस पाडत होता. फर्स्ट क्लास क्रिकेटमध्ये त्याने 70 च्या सरासरीने धावा केल्या. त्याच्याबद्दल रोहित शर्माला फार माहिती नव्हती. रोहितने त्याची फलंदाजी सुद्धा फार पाहिली नव्हती. कारण बॅटिंग करताना पाहिलं असतं, तर सरफराज बद्दल पाठिमागून चौकशी करण्याची गरजच उरली नसती.
अन्य प्लेयर्सकडून रोहितने सरफराजबद्दल काय ऐकलेलं?
राजकोट कसोटी सामना संपल्यानंतर रोहित शर्मा सरफराजबद्दल म्हणाला की, “मी त्याला फार बॅटिंग करताना पाहिलं नव्हतं. पण मुंबईतील काही खेळाडूंकडून सरफराजच कौतुक ऐकलं होतं. कठीण परिस्थितीत फलंदाजी करण्यात आणि मोठी धावसंख्या उभारण्यात तो माहीर आह. त्याला मोकळीक दिली, तर तो आपल काम करु जातो असं अन्य प्लेयर्सकडून रोहितने ऐकलं होतं?”
राजकोट टेस्टमध्ये काय दिसलं?
रोहित म्हणाला की, “सरफराजबद्दल हे सर्व ऐकल्यानंतर त्याच्याबद्दल मला एक अंदाज आलाय. त्याच व्यक्तीमत्व कसं आहे? जो विचार केलेला, ऐकलेलं. राजकोट टेस्टमध्ये तेच पहायला मिळालं. धावांची भूख असणारा, सतत मोठी धावसंख्या करणारा फलंदाज त्याच्यामध्ये दिसला”
अशी कामगिरी करणारा सरफराज भारताचा कितवा फलंदाज?
सरफराज खानने राजकोट टेस्टच्या पहिल्या इनिंगमध्ये 62 धावा केल्या. तेच दुसऱ्या डावात 68 धावांवर नाबाद राहिला. टेस्ट डेब्युच्या दोन्ही इनिंगमध्ये अर्धशतकी खेळी करणारा भारताचा तो चौथा फलंदाज आहे. राजकोट टेस्टमध्ये त्याने कॅप्टन रोहित शर्माचा विश्वास जिंकला.