VIDEO: मुंबई इंडियन्सचा कर्णधार रोहित बनला प्रँकस्टार, पत्नी रितीकासोबत केलेला हा प्रँक पाहाच!
रोहित शर्मा आणि त्याची पत्नी रितीका हे दोघेही सोशल मीडियावर चांगलेच अॅक्टिव्ह असतात. दोघांचेही सोशल मीडियावर अनेक चाहते असून त्यांच्या पोस्टला भरभरुन प्रतिसाद मिळत असतो.
मुंबई : आयपीएलचं यंदाचं पर्व हळूहळू अंतिम सामन्याच्या दिशेने जात आहे. प्लेऑफमध्ये दिल्ली, चेन्नई आणि बंगळुरू हे संघ गेले असून तिसऱ्या स्थानासाठी हैद्राबाद सोडता इतर संघामध्ये चुरस आहे. यामध्ये शर्यतीत मुंबई इंडियन्सचा संघही आहे. दरम्यान संघाचा कर्णधार रोहित शर्मा (Rohit Sharma) मात्र सध्या सामन्यापूर्वीचा ताण हलका करण्यासाठी फॅमिलीसोबत वेळ घालवत आहे.
रोहितने पत्नी रितिकासोबत (Ritika Sajdeh) एक प्रँक करतानाचा व्हिडीओ स्वत:च शूट केला असून त्याच्या इन्स्टाग्रामवर पोस्टही केला आहे. या व्हिडीओमध्ये रोहित एक चॉक्लेट त्याच्या मुठीत बंद करुन अचानक रितीकासमोर येतो. तो तिला मुठीत काय आहे? ते पाहायला सांगतो. पण रोहितच्या खोडकर वृत्तीमुळे दचकलेली रितीका सुरुवातीला भितीपोटी मुठीला हात लावत नाही. अखेर रोहितच्या म्हणण्यावर ती मुठीला स्पर्श करताच रोहित मुठी खोलतो त्यावेळी त्यात चॉक्लेट पाहून रितीकाही आनंदी होते. दरम्यान या व्हिडीओला रोहितच्या चाहत्यांनी खूप लाईक केले असून मुंबई इंडियन्स संघाच्या इन्स्टाग्राम पेजवरुन रोहितला प्रँकस्टार अशी पदवी देणारी कमेंच करण्यात आली आहे.
View this post on Instagram
रितिका रोहित 2015 साली लग्नाच्या बेडीत
रितिका-रोहित 2015 साली लग्नाच्या बेडीत अडकले. रोहतची पहिली गर्लफ्रेंड सोफिया हयातबरोबरच्या ब्रेकअप नंतर रोहितची रितिका बरोबर ओळख झाली. पुढे खूप चांगली मैत्री होऊन त्या मैत्रीचं रुपांर प्रेमात झालं. त्यानंतर दोघांनी 2015 साली लग्न केलं. ज्यानंतर त्यांनी एका मुलीला जन्म दिला. समायरा ही रोहित-रितिकाची क्युट मुलगी आहे. अनेक मॅचेसला रितिका समायराला घेऊन मैदानावर उपस्थिती लावत असते.
प्लेऑफसाठी मुंबई इंडियन्सचा मार्ग खडतर
यंदाच्या आयपीएलचा विचार करता मुंबई इंडियन्स प्लेऑफमध्ये पोहोचण्याची शक्यता आता त्यांच्या दमदार कामगिरीवर अवलंबून असेल. कारण रोहित शर्माच्या या टीमला आता फक्त जिंकणेच नाही तर त्यांचा नेट रन रेटही वाढवायचा आहे. संघाला पुढील दोन सामने राजस्थान रॉयल्स आणि सनरायझर्स हैदराबाद यांच्याशी खेळायचे आहेत. हे दोन्ही सामने सोपे होणार नाहीत कारण सनरायझर्सकडे गमावण्यासारखे काहीच नाही आणि राजस्थान रॉयल्स स्वतः प्लेऑफच्या शर्यतीसाठी मोठा दावेदार आहे.
मुंबई इंडियन्सचे उर्वरीत सामने
– 05 ऑक्टोबर (मंगळवार): मुंबई vs राजस्थान रॉयल्स, सायंकाळी 7:30 वाजता, शारजाह – 08 ऑक्टोबर (शुक्रवार): मुंबई vs सनरायजर्स हैद्राबाद, दुपारी 3:30 वाजता, अबू धाबी
इतर बातम्या
IPL 2021: यशस्वी जैस्वालची तुफानी खेळी, चेन्नईवर विजयानंतर धोनीकडून खास गिफ्ट
(Rohit Sharma Prank with wife Ritika Sajdeh posted on instagram see video)