दुखापतीवर मात करण्यासाठी रोहित शर्मा आणि रविंद्र जाडेजा NCA त दाखलं

मागच्या आठवड्यात रोहितची वनडे कर्णधारपदी निवड करण्यात आली. रोहितला दुखापतीतून सावरण्यासाठी तीन ते चार आठवड्याचा वेळ लागेल, असा अंदाज आहे.

दुखापतीवर मात करण्यासाठी रोहित शर्मा आणि रविंद्र जाडेजा NCA त दाखलं
Follow us
| Updated on: Dec 17, 2021 | 4:04 PM

मुंबई: भारताच्या टी-20, वनडे संघाचा कर्णधार रोहित शर्मा (Rohit sharma) आणि अष्टपैलू क्रिकेटपटू रविंद्र जाडेजा (Ravindra jadeja) हे NCA राष्ट्रीय क्रिकेट अकादामीत दाखल झाले आहेत. एनसीएमध्ये या दोन्ही खेळाडूंच्या फिटनेसवर मेहनत घेतली जाणार आहे. जेणेकरुन त्यांना दक्षिण आफ्रिकेविरुद्धची एकदिवसीय मालिकेत खेळता येईल. दुखापतीमुळे हे दोन्ही खेळाडू आगामी दक्षिण आफ्रिकेविरुद्धच्या तीन कसोटी सामन्यांच्या मालिकेला मुकणार आहेत. 26 डिसेंबर ते 15 जानेवारी दरम्यान कसोटी मालिका होणार आहे.

रोहितची कसोटी संघाच्या उपकर्णधारपदी निवड झाली. पण मुंबईत सरावादरम्यान त्याला दुखापत झाली. त्याच्याजागी इंडिया ए चा कर्णधार प्रियांक पांचाळची निवड करण्यात आली आहे. न्यूझीलंड विरुद्ध कसोटी मालिकेत खेळताना दुखापत झाल्यामुळे अक्सर पटेल आणि जाडेजाही १८ सदस्यीय संघाचा भाग नाहीय. भारताच्या अंडर-१९ संघाचा कर्णधार यश धुलही या एनसीएमध्ये आहे. त्याने रोहित आणि जाडेजा सोबतचे फोटो सोशल मीडियावर शेअर केले आहेत.

२३ डिसेंबरपासून यूएईत आशिया कप स्पर्धेला सुरुवात होणार आहे. त्याआधी अंडर-१९ ची टीम एनसीएमध्ये सराव करत आहे. मागच्या आठवड्यात रोहितची वनडे कर्णधारपदी निवड करण्यात आली. रोहितला दुखापतीतून सावरण्यासाठी तीन ते चार आठवड्याचा वेळ लागेल, असा अंदाज आहे.

मायदेशात झालेल्या न्यूझीलंड विरुद्धच्या टी-20 मालिकेत रोहितने नेतृत्व केलं. त्याच्या नेतृत्वाखाली भारताने ही मालिका सहज जिंकली. आता वनडे मालिकेसाठी सुद्धा तो उपलब्ध होईल अशी अपेक्षा आहे. गुडघ्याच्या दुखापतीमुळे जाडेजाला संघाबाहेर जावे लागले आहे. त्याला दुखापतीतून सावरण्यासाठी रोहितपेक्षा जास्त वेळ लागू शकतो.

संबंधित बातम्या: IND VS SA: कॅप्टन कोहली २९ वर्षांपासूनची विजयाची प्रतिक्षा संपवणार, गांगुलीला विश्वास India south Africa Tour Video : जोहान्सबर्गला जाताना विमानात विराटने इशांत शर्माला डिवचलं विराट, गेलला जमलं नाही, ते पाकिस्तानच्या मोहम्मद रिजवानने करुन दाखवलं, बाबर म्हणाला….

ट्रेन रिकामी, सीटवर पाय; विशेष लोकलमध्ये रेल्वे कर्मचाऱ्यांची दादागिरी
ट्रेन रिकामी, सीटवर पाय; विशेष लोकलमध्ये रेल्वे कर्मचाऱ्यांची दादागिरी.
...म्हणून सैफ टार्गेटवर, शरद पवार गटाच्या बड्या नेत्याला कोणावर संशय?
...म्हणून सैफ टार्गेटवर, शरद पवार गटाच्या बड्या नेत्याला कोणावर संशय?.
सैफची प्रकृती सध्या कशी? 'लिलावती'कडून निवेदन जारी, नेमकं काय म्हटलंय?
सैफची प्रकृती सध्या कशी? 'लिलावती'कडून निवेदन जारी, नेमकं काय म्हटलंय?.
सैफवर चाकूने 6 वार पण 12 व्या मजल्यावरच्या घरात चोराची एन्ट्री कशी?
सैफवर चाकूने 6 वार पण 12 व्या मजल्यावरच्या घरात चोराची एन्ट्री कशी?.
कराडला कोठडी अन् वकिलांमध्येच जुंपली, कोर्टाबाहेर एकच गदारोळ अन्...
कराडला कोठडी अन् वकिलांमध्येच जुंपली, कोर्टाबाहेर एकच गदारोळ अन्....
वाल्मिक कराडच्या समर्थकांच्या आलं अंगात, महिलांमध्ये घुमतंय कोण?
वाल्मिक कराडच्या समर्थकांच्या आलं अंगात, महिलांमध्ये घुमतंय कोण?.
पंतप्रधान मोदी मुंबईत अन् मंत्री धनंजय मुंडे परळीत... नेमकं कारण काय?
पंतप्रधान मोदी मुंबईत अन् मंत्री धनंजय मुंडे परळीत... नेमकं कारण काय?.
Saif Ali Khan | अभिनेता सैफ अली खानवर चाकू हल्ला, अपडेट्स काय ?
Saif Ali Khan | अभिनेता सैफ अली खानवर चाकू हल्ला, अपडेट्स काय ?.
'...म्हणून सरपंच देशमुख यांची हत्या', CIDन कोर्टात काय केला मोठा दावा?
'...म्हणून सरपंच देशमुख यांची हत्या', CIDन कोर्टात काय केला मोठा दावा?.
कराडच्या गावात महिलांचं समर्थनार्थ आंदोलन, थेट रस्त्यावर झोपल्या अन्..
कराडच्या गावात महिलांचं समर्थनार्थ आंदोलन, थेट रस्त्यावर झोपल्या अन्...