Rohit Sharma | वर्ल्ड कप फायनलमधील पराभवावर प्रश्न, रोहित पुन्हा…
रोहित शर्माच्यान नेतृ्त्वात टीम इंडियाने वर्ल्ड कपमध्ये सुस्साट कामगिरी केली. पण अखेरच्या आणि अंतिम सामन्यात टीम इंडियाला पराभूत व्हावं लागलं. कॅप्टन रोहित अफगाणिस्तान विरुद्ध टी 20 मालिका 3-0 ने जिंकल्यावर कायम म्हणाला?
बंगळुरु | टीम इंडिया-अफगाणिस्तान तिसरा टी 20 सामना बरोबरीत सुटला. पहिली सुपर ओव्हर टाय झाली. टीम इंडिया दुसऱ्या सुपर ओनव्हरमध्ये विजयी झाली. टीम इंडियाचा अशाप्रकारे थरारक विजय झाला. टीम इंडियाने टी 20 वर्ल्ड कपआधाची अखेरची मालिका जिंकली. कॅप्टन रोहित शर्मा याच्या नेतृत्वात टीम इंडियाने ही कामगिरी केली. रोहितने 14 महिन्यांनंतर टी 20 टीममध्ये कमबॅक केलं. रोहित पहिल्या 2 सामन्यात झिरोवर आऊट झाल्यानंतर तिसऱ्या सामन्यात शतक ठोकलं.
सुपर ओव्हरचा अपवाद वगळता रोहितला अपेक्षित असं सर्व काही झालं. टीम इंडियाने मोठ्या जल्लोषात मालिका विजय साजरा केला. मात्र एका प्रश्नाने रोहितच्या आनंदावर विरझन पडलं. रोहित जे गेल्या काही दिवसांपासून विसरण्याचा प्रयत्न करत होता, ते त्याला पुन्हा आठवावं लागलं. रोहितला विचारलेल्या प्रश्नाचं उत्तर देताना त्याच्या चेहऱ्यावर निराशा स्पष्टपणे दिसून येत होती.
सुपर ओव्हरमधील विजयानंतर जिओ सिनेमासह रोहितने संवाद साधला. स्पोर्ट्स प्रेझेंटेटर अमोल त्यागी यांनी रोहितला असंख्य भारतीयांच्या मनातील प्रश्न विचारला.टीम इंडियाला सलग 10 सामन्यातील विजयानंतर आयसीसी वनडे वर्ल्ड कप 2023 फायनलमध्ये ऑस्ट्रेलिया विरुद्ध पराभूत व्हाव लागलं. टीम इंडियाचं स्वप्न पुन्हा एकदा भंग झालं. भारतीयांसाठी तो काळा दिवस ठरला. रोहित त्यातून बाहेर पडला होता. मात्र त्यागीने तो प्रश्न विचारला आणि रोहितला जुन्या आणि नको त्या आठवणी पुन्हा आठवायला भाग पाडलं.
रोहित काय म्हणाला?
View this post on Instagram
“मला त्यावर परत परत बोलायचं नाहीये. मी त्यावर बोलू इच्छित नाही. माझ्यासाठी 50 षटकांचा वर्ल्ड कप सर्वात मोठा आहे. याचा अर्थ मी टी 20 आणि वर्ल्ड टेस्ट चॅम्पियनशीपला महत्त्व देत नाही, असं होत नाही. आम्ही 50 ओव्हरचा वर्ल्ड कप पाहत मोठे झालो आहोत. भारतात जेव्हा वर्ल्ड कप होतो, तेव्हा एकच माहोल असतो. आम्ही प्रयत्न केले. मात्र आम्ही करु शकलो नाही, त्याबाबत आम्ही दु:खी होतो. टीम दु:खी होती. चाहतेही दु:खी होते. मात्र आमच्याकडे आणखी एक संधी आहे. त्यासाठी आम्ही प्रयत्न करु” असं उत्तर रोहितने अमोल त्यागीच्या प्रश्नावर दिलं. भारतात वर्ल्ड कप, सलग 10 सामन्यात विजय, त्यानंतर मोठी निराशा. तु वैयक्तिक तिथून ते इथपर्यंत काय केलंस? असा प्रश्न अमोलने विचारला होता, यावर रोहितने हे उत्तर दिलं.