Rohit Sharma IPL 2023 : ‘रोहित नाव बदलून तू आता, No…’, श्रीकांत रोहितला जिव्हारी लागेल असं बोलले

Rohit Sharma IPL 2023 : रोहित शर्मा काल CSK विरुद्धच्या सामन्यात सुद्धा फ्लॉप ठरला. त्याच्या बॅटमधून धावा जणू आटल्या आहेत. त्यामुळे रोहित शर्मा क्रिकेट विश्लेषकांच्या रडारवर आहे. रोहितवर सातत्याने चहूबाजूंनी टीका सुरु आहे.

Rohit Sharma IPL 2023 : 'रोहित नाव बदलून तू आता, No...', श्रीकांत रोहितला जिव्हारी लागेल असं बोलले
IPL 2023 Rohit sharma-Srikkanth
Follow us
| Updated on: May 07, 2023 | 11:09 AM

मुंबई : इंडियन प्रीमियर लीगच्या सलग दुसऱ्या सीजनमध्ये रोहित शर्माचा संघर्ष सुरु आहे. त्याचा एव्हरेज 20 च्या खाली आहे. मागच्या 2022 च्या सीजनमध्ये त्याने 14 सामन्यात फक्त 268 धावा केल्या. मुंबई इंडियन्सला हा सीजन कधी लक्षात ठेवायलाही आवडणार नाही. कारण मागच्या सीजनमध्ये पॉइंट्स टेबलमध्ये मुंबई इंडियन्सची टीम तळाला होती. मागच्या सीजनमध्ये रोहित शर्माने 19.14 च्या सरासरीने धावा केल्या. एकही अर्धशतक झळकवल नव्हतं.

आयपीएलच्या चालू सीजनमध्ये रोहित शर्माने एक हाफ सेंच्युरी झळकवली आहे. 10 सामन्यात 18.40 च्या सरासरीने 184 धावा केल्या आहेत. शनिवारी रोहित शुन्यावर बाद झाला. चालू सीजनमध्ये त्याचा हा दुसरा डक आहे.

धोनीच्या जाळ्यात अलगद अडकला रोहित

रोहित शर्माच्या या कामगिरीवर माजी क्रिकेटपटू कृष्णमचारी श्रीकांत यांनी जोरदार टीका केली आहे. मुंबईच्या डावात तिसऱ्या ओव्हरमध्ये रोहित शर्मा आऊट झाला. सीएसकेचा कॅप्टन एमएस धोनीने रचलेल्या सापडळ्यात अलगद अडकला. दीपक चाहरच्या गोलंदाजीवर धोनी स्टम्पच्या जवळ उभा राहिला. स्लोअर वन चेंडूवर रोहितने लॅप शॉट मारण्याचा प्रयत्न केला. पण त्याने गलीत रवींद्र जाडेजाकडे सोपा झेल दिला.

श्रीकांत रोहितवर विखारी टीका करताना काय म्हणाले?

22 एप्रिलला पंजाब किंग्स विरुद्ध रोहितने 44 धावा केल्या. त्यानंतर चार इनिंगमध्ये त्याने फक्त 5 धावा केल्या आहेत. काल सीएसके विरुद्धच्या सामन्यात रोहित बाद झाल्यानंतर कृष्णचारी श्रीकांत यांनी बोचरी टीका केली. कॉमेंट्री करताना श्रीकांत रोहितला ‘नो हिट शर्मा’ म्हणाले. “रोहितने त्याचं नाव बदलून नो हिट शर्मा करुन घ्यावं. मी मुंबई इंडियन्सचा कॅप्टन असतो, तर त्याला प्लेइंग इलेव्हनमध्ये सुद्धा स्थान दिलं नसतं” असं श्रीकांत म्हणाले.

रोहित शुन्यावर कितीवेळा OUT ?

आयपीएल करियरमध्ये रोहित शर्माची शुन्यावर बाद होण्यीच ही 16 वी वेळ आहे. त्याने दिनेश कार्तिक, मंदीप सिंग आणि सुनील नरेन यांना मागे टाकलय. कॅप्टन म्हणून खेळताना रोहित शर्मा 11 वेळा शुन्यावर बाद झालाय.

कालच्या सामन्यात चेन्नई सुपर किंग्सने मुंबई इंडियन्सवर 6 विकेट राखून विजय मिळवला. मुंबई इंडियन्सने चेन्नई सुपर किंग्सला विजयासाठी 140 धावांच टार्गेट दिलं होतं. चेन्नईने 17.4 ओव्हरमध्ये आरामात हे लक्ष्य पार केलं.

खातेवाटपानंतर मंत्र्यांना बंगल्यांचे वाटप, बघा कोणाला कोणता बंगला?
खातेवाटपानंतर मंत्र्यांना बंगल्यांचे वाटप, बघा कोणाला कोणता बंगला?.
...म्हणून सोमनाथ सूर्यवंशीची हत्या, राहुल गांधींचा मोठा आरोप काय?
...म्हणून सोमनाथ सूर्यवंशीची हत्या, राहुल गांधींचा मोठा आरोप काय?.
'साहेब म्हणतील ते तोरण अन् साहेब...', भुजबळांच्या समर्थनार्थ बॅनर
'साहेब म्हणतील ते तोरण अन् साहेब...', भुजबळांच्या समर्थनार्थ बॅनर.
म्हणून भुजबळ फडणवीसांकडे गेले? भाजपच्या बड्या नेत्यानं स्पष्टच सांगितल
म्हणून भुजबळ फडणवीसांकडे गेले? भाजपच्या बड्या नेत्यानं स्पष्टच सांगितल.
काँग्रेसच्या बड्या नेत्यानं काढली अशोक चव्हाण यांची लायकी, काय म्हणाले
काँग्रेसच्या बड्या नेत्यानं काढली अशोक चव्हाण यांची लायकी, काय म्हणाले.
भुजबळांच्या नाराजीवर अखेर अजित पवार बोलले, 8 दिवसांनी घेतली दखल अन्...
भुजबळांच्या नाराजीवर अखेर अजित पवार बोलले, 8 दिवसांनी घेतली दखल अन्....
दादांना सोडून भाजपमध्ये जाणार? फडणवीसांच्या भेटीनंतर भुजबळांचे खुलासे
दादांना सोडून भाजपमध्ये जाणार? फडणवीसांच्या भेटीनंतर भुजबळांचे खुलासे.
सनी लिओनी घेतेय सरकारी योजनेचा लाभ, दर महिन्याला खात्यात 'इतके' रूपये
सनी लिओनी घेतेय सरकारी योजनेचा लाभ, दर महिन्याला खात्यात 'इतके' रूपये.
लाथा-बुक्के अन् दगडानं मारहाण, भाजपच्या ज्येष्ठ नेत्यावर जीवघेणा हल्ला
लाथा-बुक्के अन् दगडानं मारहाण, भाजपच्या ज्येष्ठ नेत्यावर जीवघेणा हल्ला.
सबसे कातील गौतमी पाटील नव्या वर्षात चाहत्यांना देणार मोठं सरप्राईज
सबसे कातील गौतमी पाटील नव्या वर्षात चाहत्यांना देणार मोठं सरप्राईज.