Rohit Sharma शतकानंतर कोणावर नाराज झाला? जाहीर प्रेस कॉन्फरन्समध्ये सुनावलं
Rohit Sharma : न्यूझीलंड विरुद्ध तिसऱ्या वनडेमध्ंये रोहितने 101 धावा केल्या. या शतकाने रोहितचे चाहते आनंदात आहेत. मात्र स्वत: रोहित नाराज आहे. भारतीय कॅप्टनने जाहीरपणे प्रेस कॉन्फरन्समध्ये आपली नाराजी जाहीर करुन त्यामागच कारण सांगितलं.
इंदोर – टीम इंडियाचा कॅप्टन रोहित शर्माचा मंगळवारी स्फोटक अंदाज पहायला मिळाला. तीन वर्षानंतर वनडे क्रिकेटमध्ये रोहित शर्माच्या बॅटमधून शतक निघालं. न्यूझीलंड विरुद्ध तिसऱ्या वनडेमध्ंये त्याने 101 धावा केल्या. या शतकाने रोहितचे चाहते आनंदात आहेत. मात्र स्वत: रोहित नाराज आहे. भारतीय कॅप्टनने जाहीरपणे प्रेस कॉन्फरन्समध्ये आपली नाराजी जाहीर करुन त्यामागच कारण सांगितलं. रोहित शर्माने वर्ष 2020 नंतर वनडे फॉर्मेटमध्ये शतक झळकवलं. त्यावर्षी टीम इंडिया कोरोनामुळे फार सामने खेळली नव्हती. ब्रॉडकास्टर्सने काही गोष्टी योग्य पद्धतीने दाखवाव्यात, असं रोहितच मत आहे. गोष्टी अशा पद्धतीने दाखवून नयेत की, ज्यामुळे भ्रम निर्माण होईल.
ब्रॉडकास्टर्सवर भडकला रोहित
“तीन वर्षात भले माझ्या बॅटमधून निघालेलं हे पहिलं शतक आहे. पण या दरम्यान मी फक्त 12 वनडे सामने खेळलो. काय घडतय, हे तुम्हाला समजलं पाहिजे. प्रसारकांनी सुद्धा योग्य गोष्टी दाखवल्या पाहिजेत” असं रोहित शर्मा म्हणाला. हिटमॅनच हे पुनरागमन आहे का? असा प्रश्न रोहितला विचारला. “2020 मध्ये सामने नव्हते. कोरोनामुळे सगळेच घरात होते. आम्ही वनडे मॅचेस खेळल्या नाहीत. मला दुखापत झाली होती. त्या सगळ्या गोष्टी लक्षात घेतल्या पाहिजेत” असं रोहित म्हणाला.
रँकिंगच्या प्रश्नावर रोहित काय म्हणाला?
न्यूझीलंड विरुद्ध तिसरा वनडे सामना जिंकून भारत आयसीसी वनडे रँकिंगमध्ये पहिल्या स्थानावर पोहोचलाय. रोहितला जेव्हा याबद्दल विचारलं, तेव्हा तो म्हणाला की, प्रामाणिकपणे सांगायच झाल्यास, रँकिंग वैगेरेने फार फरक पडत नाही. न्यूझीलंड विरुद्ध सीरीज सुरु होण्याआधी आम्ही चौथ्या स्थानावर होतो. आम्ही यावर जास्त विचार करत नाही. प्रत्येक सीरीजमुळे तुमचा आत्मविश्वास वाढतो. विराट-हार्दिकचा प्लान
शार्दुल ठाकूर, हार्दिक पंड्या आणि विराट कोहलीने मिळून न्यूझीलंडचा कॅप्टन टॉम लॅथमला आऊट करण्याची योजना बनवल्याच रोहितने सांगितलं. वनडे क्रिकेटमध्ये तुम्हाला तुमच कौशल्य दाखवायच आहे. शार्दुलकडे ते आहे. त्याने शानदार चेंडूवर टॉम लाथमला आऊट केलं. ही योजना विराट, हार्दिक आणि शार्दुलने मिळून बनवली होती.