रोहित शर्मा अन् विराट कोहली यांच्यात कडाक्याचे भांडण, व्हायरल VIDEO मध्ये नेमके काय
IND vs SA | टीम इंडियाला दक्षिण आफ्रिकेत हा पहिला विजय मिळवण्यासाठी तब्बल 31 वर्षांची वाट पाहावी लागली. परंतु या सामन्यातील रोहित शर्मा आणि विराट कोहली यांचा एक व्हिडिओ व्हायरल होत आहे. यामध्ये शिविगाळ झाल्याचा आरोप केला जात आहे.
केप टाऊन, दि. 5 जानेवारी 2024 | टीम इंडियाने केप टाऊनमध्ये कसोटी सामन्यामध्ये दक्षिण आफ्रिकेला 7 विकेटने हरवले. भारतीय क्रिकेट संघाने हा सामना जिंकत मालिकेत एक-एक अशी बरोबरी केली. भारतीय क्रिकेट संघाने हा सामना 5 सेशन पूर्ण होण्याआधीच जिंकला. टीम इंडियाला दक्षिण आफ्रिकेत हा पहिला विजय मिळवण्यासाठी तब्बल 31 वर्षांची वाट पाहावी लागली. रोहित शर्मा याच्या नेतृत्वात टीम इंडियाने ही कामिगरी करुन दाखवली. या सामन्यासंदर्भातील एक व्हिडिओ व्हायरल होत आहे. या व्हिडिओत रोहित आणि विरोटमध्ये भांडण झाल्याचा दावा केला जात आहे. यावेळी शिवीगाळ दिल्याचे सोशल मीडियातील युजर म्हणत आहे.
काय आहे व्हिडिओमध्ये
सोशल मीडियावर एक व्हिडियो व्हायरल झाला आहे. यामध्ये रोहित शर्मा आणि विराट कोहली एका दुसऱ्याशी बोलताना दिसत नाही. या व्हिडिओतील आवाज स्पष्ट नाही. व्हायरल व्हिडिओमध्ये रोहित शर्मा रिव्हू घेण्यासंदर्भात म्हणतो, “ले लेता हूं” त्यानंतर त्याच्या तोंडातून शिवी निघाली. पुढे तो म्हणतो, “तीन-तीन हैं (रिव्यू).” रोहित शर्मा याच्या प्रश्नावर उत्तर देताना विराट कोहली म्हणतो, “हां ले ले (रिव्यू) क्या पता इनसाइडएज लगा हो.” यावेळी त्याच्याबाजूला के एल राहुल दिसत आहे.
Rohit : "Le leta hoon, Ma ch*dane gaya, teen teen hain!"😭Kohli-Ha lele lele kya pata inside edge laga ho🤣 #IndVsSa #ViratKohli #RohitSharmapic.twitter.com/JnsZOnl8LX
— harsh (@harshonx_) January 4, 2024
व्हिडिओचे सत्य काय आहे
व्हिडिओ व्हायरल झाल्यानंतर रोहित शर्मा आणि विराट कोहली यांच्यात शिविगाळ झाल्याचे म्हटले जात आहे. परंतु यामध्ये सत्य नाही. सामन्यात आफ्रिकेच्या नऊ विकेट पडल्या होत्या. रोहित शॉर्ट फिल्डींग करत होते. यावेळी सिराजचा चेंडू फलंदाजाच्या पॅडवर पडला. अंपायरने अपील फेटाळले. यामुळे रोहित विराट याला विचारत होते की, डीआरएस बाकी आहे, घेऊ का? यावेळी विराट म्हणाले घेऊन घे. याला सोशल मीडियातील युजर शिविगाळ झाल्याचे म्हणत आहे. भारताने हा सामना जिंकला. पहिल्या डाव्यात मोहम्मद सिराज याने सहा गडी बाद केले. दुसऱ्या डावात जयप्रीत बुमराह याने सहा जणांना तंबूत पाठवले. पहिल्या कसोटी सामन्यात आफ्रिकेने भारताचा पराभव केला होता. यामुळे ही मालिका एक-एक अशी झाली आहे.