T20 World Cup: टीम इंडियाच्या निर्णयांवर सुनील गावस्कर संतापले, रोहितच्या क्षमतेवर प्रश्न उपस्थित करणाऱ्यांना सुनावलं

सुनील गावस्कर म्हणाले की, किशनसारख्या युवा खेळाडूला सलामीच्या फलंदाजीची जबाबदारी द्यायला नको होती. किशनला त्याचा मुंबई इंडियन्समधला सहकारी ट्रेंट बोल्टने बाद केले.

T20 World Cup: टीम इंडियाच्या निर्णयांवर सुनील गावस्कर संतापले, रोहितच्या क्षमतेवर प्रश्न उपस्थित करणाऱ्यांना सुनावलं
Virat Kohli and Rohit Sharma
Follow us
| Updated on: Nov 01, 2021 | 1:09 PM

मुंबई : आयसीसी विश्वचषक-2021 (ICC T20 World Cup) मध्ये भारताचा पहिल्या सामन्यात दारुण पराभव झाला. या पराभवानंतर संघ निवडीबाबत अनेक प्रश्न उपस्थित झाले होते. न्यूझीलंडविरुद्धच्या दुसऱ्या सामन्यात टीम इंडिया आपल्या चुका सुधारून विजयासह पुनरागमन करेल, अशी अपेक्षा होती. तसेच, त्यांचे टीम कॉम्बिनेश सुधारेल असेही वाटत होते. पण विराट कोहलीने किवी संघाविरुद्ध घेतलेल्या निर्णयांनी सर्वांनाच चकित केले. याचा परिणाम असा झाला की, भारताचा आठ विकेट्सनी पराभव झाला आणि ICC T20 विश्वचषक-2021 च्या उपांत्य फेरीतील संघाचा मार्ग कठीण झाला आहे. संघात जे बदल करण्यात आले त्यात रोहित शर्माला सलामीला न पाठवण्याचा निर्णय घेण्यात आला. त्याच्या जागी ईशान किशनला केएल राहुलसोबत डावाची सुरुवात करण्यास पाठवण्यात आले. यामुळे भारताचे माजी कर्णधार सुनील गावस्कर संतापले आहेत. (Rohit Sharma was told we don’t trust you to face Trent Boult: Sunil Gavaskar on changes in India’s batting order against NZ)

स्पोर्ट्स तकशी संवाद साधताना गावस्कर म्हणाले की, किशनसारख्या युवा खेळाडूला सलामीच्या फलंदाजीची जबाबदारी द्यायला नको होती. किशनला त्याचा मुंबई इंडियन्समधला सहकारी ट्रेंट बोल्टने बाद केले. त्याला आठ चेंडूत केवळ चार धावा करता आल्या. गावसकर म्हणाले, “मला माहित नाही की ही अपयशाची भीती होती की अजून काहीतरी, पण त्यांनी फलंदाजीत केलेले बदल कामी आले नाहीत. रोहित शर्मा हा दिग्गज फलंदाज असून त्याला तिसऱ्या क्रमांकावर पाठवण्यात आले. कोहली स्वतः चौथ्या क्रमांकावर आला. किशनसारख्या युवा खेळाडूवर सलामीची जबाबदारी देण्यात आली.

किशनला चौथ्या-पाचव्या क्रमांकावर संधी द्यायला हवी होती

किशनने चौथ्या किंवा पाचव्या क्रमांकावर फलंदाजी करायला हवी होती, असे गावस्कर यांनी म्हटले आहे. गावस्कर म्हणाले की, “इशान किशन हिट किंवा मिस खेळाडू आहे. त्याच्यासारखा फलंदाज चौथ्या किंवा पाचव्या क्रमांकावर आला असता तर बरे झाले असते. त्यानंतर परिस्थितीनुसार तो खेळू शकला. आता काय झाले की, रोहित शर्माला सांगण्यात आले की, तू डावखुरा वेगवान गोलंदाज ट्रेट बोल्टविरोधात खेळू शकशील यावर आमचा तुझ्यावर विश्वास नाही. त्या क्रमांकावर दीर्घकाळ खेळणाऱ्या खेळाडूला तुम्ही असे बोलत असाल तर तो स्वत:च समजेल की, त्याच्यात कमतरता आहे. जर किशनने 70 धावा केल्या असत्या तर आम्ही त्याचे आणि या निर्णयाचे कौतुक केले असते पण जेव्हा रणनीती काम करत नाही तेव्हा तुम्हाला टीकेला सामोरे जावे लागते.

भारताचा दारुण पराभव

यंदाचा टी20 विश्वचषक (T20 World Cup) भारतासाठी अतिशय निराशाजनक सुरु आहे. सलग दुसऱ्या सामन्यातही भारतीय खेळाडूंना पराभवाचा सामना करावा लागला आहे. पहिल्या सामन्यात पाकिस्तानने 10 विकेट्सनी मात दिल्यानंतर आता न्यूझीलंडने 8 विकेट्सनी नमवत भारताचं पुढील फेरीचं स्वप्नही जवळपास धुळीस मिळवलं आहे. सलग दोन पराभवांमुळे भारतीय संघ गुणतालिकेत पाचव्या स्थानी पोहचला आहे. त्यामुळे पहिल्या आणि दुसऱ्या स्थानी असणाऱ्या पाकिस्तान आणि अफगाणिस्तान संघापासून भारत फार दूर असल्याने पुढील फेरीत पोहचणं अवघड झालं आहे. सामन्यात प्रथम फलंदाजी करत भारताने केवळ 110 धावा केल्या. ज्या पूर्ण करताना न्यूझीलंडला अधिक मेहनत घ्यावी लागील नाही. त्यांनी केवळ 2 विकेट्स गमावत 14.3 ओव्हरमध्ये या धावा पूर्ण करत 8 विकेट्सनी विजय मिळवला. सामन्यात भारतीय फलंदाजांचा खराब फॉर्म पुन्हा एकदा दिसून आला.

सेमीफायनलमध्ये पोहचणं अवघड

भारत असलेल्या ग्रुपमध्ये पाकिस्तानने 3 पैकी 3 सामने जिंकत गुणतालिकेत पहिलं स्थान मिळवलं आहे. तर अफगाणिस्तानने 3 पैकी 2 सामने जिंकत दुसरं स्थान मिळवलं आहे. तर न्यूझीलंड आणि नामिबिया एक एक विजय मिळवत तिसऱ्या आणि चौथ्या स्थानी आहेत. ज्यानंतर भारत आणि स्कॉटलंड पाचव्या आणि सहाव्या स्थानावर आहेत. दरम्यान भारत पाचव्या स्थानावर दोन पराभवांसह असून इतर सर्व सामने जिंकला तरी पाक आणि अफगाणिस्तानला मागे टाकणं अवघड आहे. तसंच न्यूझीलंडचा संघही आजच्या विजयानंतर गिअर अप करुन अफगाणिस्तानला मागे टाकून पुढे जाऊ शकतो.

इतर बातम्या

T20 World Cup 2021: 2 पराभवानंतरही भारताची सेमी-फायनलची आशा शिल्लक, वाचा कशी?

लाईव्ह मॅचदरम्यान विराट कोहलीने मारली पलटी, पाकिस्तानविरुद्धच्या सामन्यात ज्याचं कौतुक केलं त्याचीच उडवली थट्टा

T20 World Cup 2021 : निवृत्तीआधी असगर अफगाणचा मोठा कारनामा, T20I मध्ये धोनीसह 3 दिग्गजांना पछाडलं

(Rohit Sharma was told we don’t trust you to face Trent Boult: Sunil Gavaskar on changes in India’s batting order against NZ)

'उदय सामंत यांना पालकमंत्रीपद मिळालं तर...', योगेश कदम काय म्हणाले?
'उदय सामंत यांना पालकमंत्रीपद मिळालं तर...', योगेश कदम काय म्हणाले?.
शहापुरात गोळीबार, महालक्ष्मी ज्वेलर्सबाहेर खळबळ, एकाचा मृत्यू अन्...
शहापुरात गोळीबार, महालक्ष्मी ज्वेलर्सबाहेर खळबळ, एकाचा मृत्यू अन्....
मंत्री बनताच शिवसेनेचा बडा नेता अ‍ॅक्शन मोडवर,सत्तारांवर कारवाई करणार?
मंत्री बनताच शिवसेनेचा बडा नेता अ‍ॅक्शन मोडवर,सत्तारांवर कारवाई करणार?.
‘जर्सी क्रमांक 99 मिस..’; आर अश्विनच्या निवृत्तीवर मोदींचं भावनिक पत्र
‘जर्सी क्रमांक 99 मिस..’; आर अश्विनच्या निवृत्तीवर मोदींचं भावनिक पत्र.
'त्यांनी पंतपप्रधान व्हावं', सरकारमधील मंत्र्यांच्या भुजबळांना टोला
'त्यांनी पंतपप्रधान व्हावं', सरकारमधील मंत्र्यांच्या भुजबळांना टोला.
जरांगेंचं पुन्हा उपोषणाचं शस्त्र, सरकारमधील मंत्र्यानं केली एकच विनंती
जरांगेंचं पुन्हा उपोषणाचं शस्त्र, सरकारमधील मंत्र्यानं केली एकच विनंती.
भाच्याच्या लग्नात ठाकरे बंधू एकत्र, लग्नात राज-उद्धव ठाकरेंमध्ये संवाद
भाच्याच्या लग्नात ठाकरे बंधू एकत्र, लग्नात राज-उद्धव ठाकरेंमध्ये संवाद.
पुण्यातून शरद पवार यांचा देवेंद्र फडणवीसांना फोन, कारण नेमकं काय?
पुण्यातून शरद पवार यांचा देवेंद्र फडणवीसांना फोन, कारण नेमकं काय?.
एकनाथ शिंदेंना ठाण्याचं पालकमंत्रीपद मिळणार की...? महायुतीत रस्सीखेच
एकनाथ शिंदेंना ठाण्याचं पालकमंत्रीपद मिळणार की...? महायुतीत रस्सीखेच.
दाटले रेशमी धुके.. मुंबई-गोवा महामार्गावर धुक्याची चादर वाहतूक मंदावली
दाटले रेशमी धुके.. मुंबई-गोवा महामार्गावर धुक्याची चादर वाहतूक मंदावली.