रोहित शर्मा मुंबई इंडियन्सला ठोकणार रामराम, पुढचा सीजन कोणत्या संघाकडून खेळणार?

मुंबई इंडियन्सकडून खेळणारा माजी कर्णधार रोहित शर्मा पुढच्या सीजनमधून दुसऱ्या संघाकडून खेळणार असल्याची चर्चा आहे. मुंबई इंडियन्सचा सर्वात यशस्वी कर्णधार असताना देखील त्याच्या ऐवजी या सीजनमध्ये हार्दिक पांड्याला कर्णधार केल्याने चाहते देखील नाराज आहेत. त्यातच आता ही नवी चर्चा होत आहे.

रोहित शर्मा मुंबई इंडियन्सला ठोकणार रामराम, पुढचा सीजन कोणत्या संघाकडून खेळणार?
rohit sharma
Follow us
| Updated on: Apr 05, 2024 | 5:54 PM

Rohitm Sharma : मुंबई इंडियन्सचे आयपीएल 2024 मध्ये रोहित शर्माकडून कर्णधारपद काढून हार्दिक पांड्याकडे सोपवले आहे. मुंबई इंडियन्सच्या या निर्णयानंतर चाहत्यांना एकद धक्का बसला होता. चाहत्यांनी या विरोधात टीका देखील केली. सोशल मीडियावर अनेकांनी हा अन्यायकारक निर्णय असल्याचं म्हटलं आहे. कारण रोहित शर्माने पाच वेळा मुंबईला विजेतेपद जिंकवून दिले आहे. या निर्णयानंतर रोहित शर्मा आणि हार्दिक पांड्या यांच्यातील फरक स्पष्ट दिसत आहे. मुंबई इंडियन्सला पहिल्या तीनही सामन्यांमध्ये दारुण पराभवाचा सामना करावा लागला आहे. रोहित शर्माकडे पुन्हा कर्णधारपद सोपवण्याची मागणी चाहते करु लागले आहेत. दरम्यान, रोहित शर्माबाबत एक मोठा खुलासा झाला आहे.

रोहित शर्मा मुंबई इंडियन्स सोडणार

रोहित शर्मा मुंबई इंडियन्ससोबत आता जास्त काळ राहणार नसल्याचं समोर आले आहे. या आयपीएल सीझननंतर रोहित शर्मा मुंबईकडून खेळताना दिसणार नाहीये. समोर आलेल्या माहितीनुसार, रोहित शर्माने पुढच्या सीजनसाठी मुंबईकडून न खेळण्याचा निर्णय घेतल्याचं बोललं जात आहे. त्यामुळे मुंबई इंडियन्सला मोठा धक्का बसणार आहे.

मुंबई इंडियन्सने रोहित शर्माला कर्णधारदावरुन हटवल्यानंतरच खरंतर हा वाद सुरु झाला होता. कारण चाहत्यांना देखील ते आवडले नव्हते. पण आता बातमी अशी समोर आली आहे की, रोहित शर्माने मुंबई इंडियन्सला पुढच्या सीजन त्यांच्याकडून खेळणार नसल्याचं स्पष्ट सांगितले आहे.

हार्दिक पांड्याच्या कर्णधारपदावर आणि त्याच्या निर्णयावर फ्रेंचायजी खूश नसल्याचं बोललं जात आहे. फॅन्स देखील त्याच्यावर नाराज आहेत. दोन खेळाडूंचे मैदानावरील अनेक निर्णयांवर एकमत होत नसल्याने त्याचा थेट परिणाम संघाच्या कामगिरीवर होताना दिसत आहे. त्यामुळे एमआयच्या ड्रेसिंग रूमच्या वातावरणावरही बदल झाला आहे.

हार्दिक पांड्या कर्णधारपद सोडणार?

रिपोर्टनुसार रोहित शर्माला पुन्हा कर्णधार बनवण्याचा विचार केला जात असला तरी हार्दिक पांड्याला अजूनही संधी मिळू शकते. यापूर्वीही अशा अफवा पसरल्या होत्या. त्यामुळे रोहित शर्माला पुन्हा कर्णधारपद मिळण्याची शक्यता फारच कमी दिसत आहे. भविष्यातही हार्दिक मुंबई इंडियन्सची धुरा हार्दिककडेच असेल असे मानले जात आहे.

रोहित शर्मा कोणत्या संघातून खेळणार

रोहित शर्माने जर मुंबई इंडियन्स संघ सोडला तर तो कोणत्या संघाकडून खेळणार अशा चर्चा ही सोशल मीडियावर सुरु झाल्या आहेत. अनेक जण म्हणत आहे की, त्याला कोणतीही फ्रेंचायजी आपल्या संघात घेऊ शकते. कारण तो आयपीएलमधील सर्वात यशस्वी कर्णधार आहे.

धूप-अगरबत्ती लावण्यावरून वाद, मराठी कुटुंबाला बेमद मारहाण, अखेर मुजोर
धूप-अगरबत्ती लावण्यावरून वाद, मराठी कुटुंबाला बेमद मारहाण, अखेर मुजोर.
'तो माझाच माल, त्याला कोणाची काही...', राऊतांवर शिवसेना नेत्याचा टोला
'तो माझाच माल, त्याला कोणाची काही...', राऊतांवर शिवसेना नेत्याचा टोला.
'माझ्यासह पत्नीला वर्षापासून त्रास अन् शिवीगाळ पण आता मराठी...'- आरोपी
'माझ्यासह पत्नीला वर्षापासून त्रास अन् शिवीगाळ पण आता मराठी...'- आरोपी.
परळीत अजितदादा गटाच्या माजी नगरसेविकेच्या मुलानं कर्मचाऱ्याला धुतलं
परळीत अजितदादा गटाच्या माजी नगरसेविकेच्या मुलानं कर्मचाऱ्याला धुतलं.
'निवडणुकीनंतर माज आलाय, पुढे पुन्हा अशी घटना घडली तर...'
'निवडणुकीनंतर माज आलाय, पुढे पुन्हा अशी घटना घडली तर...'.
सकाळी 9.30ला ते दोघे आले, फोटो काढून गेले, राऊतांच्या बंगल्याची रेकी
सकाळी 9.30ला ते दोघे आले, फोटो काढून गेले, राऊतांच्या बंगल्याची रेकी.
D फॉर डॉन अन् तो मंत्रिमंडळात? जितेंद्र आव्हाडांनी दिली हिंट
D फॉर डॉन अन् तो मंत्रिमंडळात? जितेंद्र आव्हाडांनी दिली हिंट.
'हुशार्‍या मारू नका, अडीच वर्षांनंतर..'; सत्तारांचा विरोधकांना इशारा
'हुशार्‍या मारू नका, अडीच वर्षांनंतर..'; सत्तारांचा विरोधकांना इशारा.
शरद पवारांचे 'हे' दोन नेते दादांच्या भेटीला, राजकारणात भूकंप होणार?
शरद पवारांचे 'हे' दोन नेते दादांच्या भेटीला, राजकारणात भूकंप होणार?.
कल्याणात मराठी कुटुंबाला मारहाण,मनसे दिला इशारा,'येत्या २४ तासात जर..'
कल्याणात मराठी कुटुंबाला मारहाण,मनसे दिला इशारा,'येत्या २४ तासात जर..'.