IND VS NZ: रोहित शर्माची हॅट्ट्रिक, विराट कोहली ट्रोल, सोशल मीडियावर मीम्सचा पाऊस

न्यूझीलंडविरुद्धच्या टी-20 मालिकेतील शेवटच्या सामन्यात रोहित शर्माने हॅटट्रिक घेतली. आश्चर्यचकित होऊ नका, ही विकेटची हॅटट्रिक नसून नाणेफेक जिंकण्याची हॅटट्रिक आहे.

IND VS NZ: रोहित शर्माची हॅट्ट्रिक, विराट कोहली ट्रोल, सोशल मीडियावर मीम्सचा पाऊस
रोहीत शर्माच्या निवडीवर दिलीप वेंगसरकर यांनी सकारात्मक प्रतिक्रिया दिलीय
Follow us
| Updated on: Nov 21, 2021 | 11:10 PM

कोलकाता : न्यूझीलंडविरुद्धच्या टी-20 मालिकेतील शेवटच्या सामन्यात रोहित शर्माने हॅटट्रिक घेतली. आश्चर्यचकित होऊ नका, ही विकेटची हॅटट्रिक नसून नाणेफेक जिंकण्याची हॅटट्रिक आहे. जयपूर, रांची T20 मध्ये नाणेफेक जिंकल्यानंतर रोहित शर्माने कोलकातामध्ये (IND VS NZ, 3rd T20I) नाणेफेक जिंकली. सलग तीन टॉस जिंकल्यानंतर अचानक रोहित शर्माचा सोशल मीडियावर बोलबाला झाला आणि यादरम्यान विराट कोहली ट्रोल होऊ लागला आहे. टी-20 वर्ल्ड कपमध्ये विराट कोहलीने पहिल्या तीन सामन्यांमध्ये नाणेफेक गमावली होती. याचा फटका टीम इंडियाला सहन करावा लागला होता. (Rohit Sharma Won the Toss Against New Zealand thrice in row, Virat Kohli got Trolled)

पाकिस्तान आणि न्यूझीलंडकडूनच सामना हरल्याने भारतीय संघ उपांत्य फेरीच्या शर्यतीतून बाहेर पडला. नाणेफेक गमावल्यामुळे भारताला प्रथम फलंदाजी करावी लागली आणि संघाला मोठी धावसंख्या करता आली नाही, परिणामी भारतीय संघाचा पराभव झाला. रोहित शर्माची T20 संघाचा पूर्णवेळ कर्णधार म्हणून नियुक्ती झाल्यापासून त्याने तीन सामन्यांमध्ये भारताचं नेतृत्व केलं आहे, आणि या तिन्ही सामन्यांमध्ये त्याने नाणेफेक जिंकली आहे. त्यामुळे चाहते विराट कोहलीला टोमणे मारुल लागले आहेत.

भारताची न्यूझीलंडवर 73 धावांनी मात, मालिकेवर कब्जा

भारत आणि न्यूझीलंड (India vs New Zealand) यांच्यातील तीन टी-20 सामन्यांची मालिका 3-0 ने जिंकत भारताने न्यूझीलंडला व्हाईटवॉश दिला आहे. मालिकेतील तिसरा आणि शेवटचा सामना आज कोलकाता येथील ऐतिहासिक स्टेडियम ईडन गार्डन्सवर खेळवण्यात आला. या सामन्यात भारताचा कर्णधार रोहित शर्माने नाणेफेक जिंकून प्रथम फलंदाजी करण्याचा निर्णय घेतला घेतला होता. प्रथम फलंदाजी करत भारताने 184 धावांचा डोंगर उभा केला होता. त्या प्रत्युत्तरात खेळणाऱ्या न्यूझीलंला केवळ 111 धावांपर्यंत मजल मारला आली. त्यामुळे भारताना हा सामना 73 धावांनी जिंकला आहे. या विजयासह भारताने मालिका खिशात घातली आहे.

इतर बातम्या

रोहितचं अर्धशतक, हर्षल-अक्सरची उत्कृष्ट गोलंदाजी, भारताची न्यूझीलंडवर 73 धावांनी मात, मालिकेवर कब्जा

हार्दिक पंड्यासाठी टीम इंडियाचे दरवाजे खुले, मात्र दक्षिण आफ्रिका दौऱ्यापूर्वी एक अट पूर्ण करावी लागणार

महेंद्रसिंह धोनी शेवटचा सामना चेन्नईमध्ये खेळणार ? कार्यक्रमात बोलताना म्हणाला…

(Rohit Sharma Won the Toss Against New Zealand thrice in row, Virat Kohli got Trolled)

Non Stop LIVE Update
धारावीची जमीन अदानीला देण्यासाठी महाराष्ट्र सरकार पाडले - राहुल गांधी
धारावीची जमीन अदानीला देण्यासाठी महाराष्ट्र सरकार पाडले - राहुल गांधी.
१५०० देत आहेत पण तुमच्याकडून घेत किती आहेत?, प्रियंका गांधी यांचा सवाल
१५०० देत आहेत पण तुमच्याकडून घेत किती आहेत?, प्रियंका गांधी यांचा सवाल.
नरेंद्र मोदी जातीय जनगणनेविरोधात, राहुल गांधी यांचा आरोप
नरेंद्र मोदी जातीय जनगणनेविरोधात, राहुल गांधी यांचा आरोप.
पाशा पटेल यांचे जाहीर सभेत अश्लील हातवारे, रोहित पवारांची तक्रार
पाशा पटेल यांचे जाहीर सभेत अश्लील हातवारे, रोहित पवारांची तक्रार.
युपीतील रुग्णालयाला लागलेल्या आगीत 10 नवजात बालकांच्या मृत्यूने हळहळ
युपीतील रुग्णालयाला लागलेल्या आगीत 10 नवजात बालकांच्या मृत्यूने हळहळ.
कोणी म्हणत असेल मीच देशाचा प्रमुख, तर म्हण बाबा पण...काय म्हणाले पवार
कोणी म्हणत असेल मीच देशाचा प्रमुख, तर म्हण बाबा पण...काय म्हणाले पवार.
सुप्रिया सुळे मुख्यमंत्रीपदाचा चेहरा? शरद पवार त्यांना CM करणार?
सुप्रिया सुळे मुख्यमंत्रीपदाचा चेहरा? शरद पवार त्यांना CM करणार?.
लाडकी बहीणचा महायुतीला फायदा होणार? पवार म्हणाले, 'नाव गोंडस पण...'
लाडकी बहीणचा महायुतीला फायदा होणार? पवार म्हणाले, 'नाव गोंडस पण...'.
इचलकरंजीत 2019च्या सभेची पुनरावृत्ती,भर पावसात पुन्हा शरद पवारांची सभा
इचलकरंजीत 2019च्या सभेची पुनरावृत्ती,भर पावसात पुन्हा शरद पवारांची सभा.
'एकदा या गद्दाराला पाडा...', उद्धव ठाकरेंचा अब्दुल सत्तारांवर हल्लाबोल
'एकदा या गद्दाराला पाडा...', उद्धव ठाकरेंचा अब्दुल सत्तारांवर हल्लाबोल.