WI vs IND : वेस्ट इंडिजमंध्ये Yashasvi Jaiswal ची दमदार सुरुवात, पहिल्याच मॅचमध्ये ठोकली हाफ सेंच्युरी
WI vs IND : वेस्ट इंडिज दौऱ्यापासून कसोटी क्रिकेटमध्ये टीम इंडियाला नवीन सलामीची जोडी मिळू शकते. वर्कलोड मॅनेजमेंटअंतर्गत काही नवीन बदल टीम इंडियाला वेस्ट इंडिज दौऱ्यात करण्याची संधी आहे.
नवी दिल्ली : टीम इंडिया सध्या वेस्ट इंडिजमध्ये आहे. येत्या 12 जुलैपासून कसोटी सामन्याने वेस्ट इंडिज विरुद्धच्या सीरीजला सुरुवात होईल. सध्या टीम इंडिया वेस्ट इंडिजमध्ये सराव सामना खेळतेय. वेस्ट इंडिजमधील हवामान, खेळपट्ट्यांशी जुळवून घेण्यासाठी हा सराव सामना महत्वाचा आहे. वेस्ट इंडिज दौऱ्यापासून कसोटी क्रिकेटमध्ये टीम इंडियाला नवीन सलामीची जोडी मिळू शकते. यशस्वी जैस्वाल आणि कॅप्टन रोहित शर्मा दोघे ओपनिंगला येऊ शकतात.
चेतेश्वर पुजारा वेस्ट इंडिज सीरीजसाठी टीममधून ड्रॉप करण्यात आलय. त्यामुळे त्याच्याजागी शुभमन गिलला नंबर 3 च्या स्थानावर बॅटिंगसाठी पाठवलं जाऊ शकतं. यामुळे युवा यशस्वी जैस्वालला आपलं टॅलेंट दाखवण्याची संधी मिळेल.
टीम इंडियाकडे दोन ऑप्शन
शुभमन गिल सर्व फॉर्मेटमध्ये टीम इंडियासाठी ओपनिंग करतो. पण T20 आणि वनडे सोडल्यास टेस्टमध्ये शुभमन गिलला तितक यश मिळालेलं नाही. त्यामुळे कसोटी क्रिकेटमध्ये यशस्वी जैस्वालच्या रुपाने चाचपणी करण्याची संधी आहे. शुभमन गिल तीन नंबरवर बॅटिंगसाठी येणार असेल, तर ओपनिंगसाठी दोन पर्याय टीम इंडियाकडे आहेत.
मग 4-5 व्या नंबरवर कोण येणार?
यशस्वी जैस्वाल आणि ऋतुराज गायकवाड या दोघांची कसोटी मालिकेसाठी टीम इंडियात निवड झालीय. शुभमन गिल चेतेश्वर पुजाराची जागा घेईल. विराट कोहली आणि अजिंक्य रहाणे 4-5 नंबरवर बॅटिंगला येतील.
चार-पाच खेळाडूंबद्दल प्रश्न
वर्कलोड मॅनेजमेंटअंतर्गत काही नवीन बदल टीम इंडियाला वेस्ट इंडिज दौऱ्यात करण्याची संधी आहे. राहुल द्रविड आणि रोहित शर्मा यांना अनेक नवीन प्रयोग करता येतील. इशान किशन आणि केएस भरत या दोघांपैकी कोणाला संधी द्यायची? हा सुद्धा प्रश्न आहेच. दोघेही विकेटकीपर फलंदाज आहेत. इशान किशनने अजून टेस्टमध्ये डेब्यु केलेला नाहीय. अक्षर पटेल आणि शार्दुल ठाकूर दोघांपैकी प्लेइंग इलेव्हनमध्ये कोणाला खेळवायचा हा निर्णय सुद्धा डॉमिनिकाचा पीच पाहून केला जाईल. यशस्वीची हाफ सेंच्युरी
सध्या वेस्ट इंडिजमध्ये टीम इंडिया दोन दिवसीय सराव सामना खेळतेय. काल विराट कोहली स्वस्तात 3 रन्सवर बाद झाला. पण रोहित शर्मा आणि यशस्वी जैस्वालने हाफ सेंच्युरी झळकवल्या. रोहित शर्मा चांगल्या फॉर्ममध्ये दिसतोय. हाफ सेंच्युरी झळकवल्यानंतर तो पॅव्हेलियनमध्ये परतला.