मुलीसोबत होळी खेळत होती रोहित शर्माची पत्नी, हार्दिक पंड्या मागून आला आणि….
रोहित शर्माच्या जागी हार्दिक पांड्याला कर्णधार केल्याने मुंबई इंडियन्सचे चाहते आधीच नाराज आहेत. हार्दिक पांड्याचे वर्तन पाहून लोकं त्याला ट्रोल करत आहेत. नुकताच मुंबई इंडियन्सच्या खेळाडूंनी होळी साजरी केली. या दरम्यानचा एक व्हिडिओ समोर आला आहे.
अहमदाबाद : आयपीएल 2024 च्या लिलावापूर्वी मुंबई इंडियन्सने रोहित शर्माच्या जागी हार्दिक पंड्याला कर्णधार केले आहे. संघाला ५ वेळा चॅम्पियन बनवणाऱ्या रोहित शर्माच्या जागी फ्रेंचायझीने हार्दिक पांड्याला कर्णधार बनवल्याने अनेकांनी त्यावर नाराजी व्यक्त केली. रोहित शर्मा देखील या निर्णयावर खूश नसल्याचे अनेक वेळा दिसून आले. त्याची पत्नी रितिका हिनेही सोशल मीडिया पोस्टवर कमेंट करून आपली नाराजी व्यक्त केली होती. चाहतेही आता हार्दिकला सतत ट्रोल करत आहेत. नरेंद्र मोदी स्टेडियमवर हार्दिक विरोधात जोरदार घोषणाबाजी करण्यात आली.
हार्दिकने रितिकाला मिठी मारली
गुजरात टायटन्सविरुद्धच्या पराभवानंतर दुसऱ्याच दिवशी मुंबई इंडियन्स संघाने मोठ्या उत्साहात होळी खेळली. रोहित शर्मासह संघातील सर्व खेळाडूंनी यात सहभाग घेतला. या घटनेचा एक व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल होत आहे. यामध्ये रोहित शर्माची पत्नी रितिका आपली मुलगी समायरासोबत होळीचा आनंद घेत आहे. तेवढ्यात हार्दिक मागून आला आणि रितिकाच्या खांद्यावर हात ठेवला. मग रितिकाने मागे वळून पाहिले आणि दोघांनी मिठी मारली.
हार्दिक स्टेडियममध्ये प्रचंड ट्रोल
नरेंद्र मोदी स्टेडियमवर गुजरात टायटन्स आणि मुंबई इंडियन्स यांच्यातील सामन्यादरम्यान हार्दिक पांड्याला प्रेक्षकांनी खूप ट्रोल केले होते. नाणेफेकीच्या वेळी हार्दिकच्या विरोधात जोरदार टीका होत होती. आमचा कर्णधार रोहित शर्मा असावा, अशा घोषणाही चाहत्यांनी दिल्या. पॅव्हेलियनच्या दिशेने जाताना चाहत्यांनीही हार्दिकला फटकारले.
Ritika must surely have felt awkward hugging Hardik Pandya! Why can’t he just stay away from them mahn….😭 pic.twitter.com/nBxXtGg2bb
— Sravani࿐ (@pullshotx45) March 25, 2024
हार्दिक गेल्या मोसमापर्यंत गुजरात टायटन्सचा भाग होता. फ्रेंचायझी सोडून तो मुंबई इंडियन्समध्ये आल्याने तिथले चाहतेही हार्दिकवर नाराज आहेत. रोहित शर्माला कर्णधारपदावरून हटवल्याने मुंबईचे चाहते ही संतापले आहेत. आता मुंबई इंडियन्स त्यांच्या घरच्या वानखेडे स्टेडियमवर खेळणार आहे. तिथेही हार्दिकसाठी गोष्टी सोप्या नसणार आहेत.
हार्दिक पांड्याने वर्तन पाहून लोकं त्याला रोहित शर्माकडून धडे घेण्याचा सल्ला देत आहे. नुकतान हार्दिकने रोहित शर्माला फिल्डींग करत असताना मागे जाण्यास सांगितले होते. तेव्हा त्याचे वर्तन पाहून देखील लोकांनी त्याच्यावर टीका केली होती.