IND vs ENG : रोहितचं शतक, शार्दुलची अष्टपैलू कामगिरी, भारताची इंग्लंडवर 157 धावांनी मात, मालिकेत आघाडी

ऐतिहासिक ओव्हलच्या मैदानावर खेळवण्यात आलेल्या भारत आणि इंग्लंड यांच्यातील चौथ्या कसोटी सामन्यात भारताने इंग्लंडचा 157 धावांनी धुव्वा उडवला आहे.

IND vs ENG : रोहितचं शतक, शार्दुलची अष्टपैलू कामगिरी, भारताची इंग्लंडवर 157 धावांनी मात, मालिकेत आघाडी
Follow us
| Updated on: Sep 06, 2021 | 9:39 PM

लंडन : ओव्हलच्या मैदानावर खेळवण्यात आलेल्या भारत आणि इंग्लंड यांच्यातील चौथ्या कसोटी सामन्यात भारताने इंग्लंडचा 157 धावांनी धुव्वा उडवला आहे. या सामन्यात सर्वप्रथम इंग्लंडचा कर्णधार जो रुटने नाणेफेक जिंकत गोलंदाजीचा निर्णय घेतला होता. इंग्लंडच्या गोलंदाजांनी कर्णधाराचा निर्णय सार्थ ठरवत भारताचा पहिला डाव अवघ्या 191 धावांवर संपवला. त्यानंतर इंग्लंडने पहिल्या डावात 290 धावांपर्यंत मजल मारत 99 धावांची आघाडी मिळवली होती. ही आघाडी फोडत भारताने दुसऱ्या डावात 466 धावांचा डोंगर उभा केला आणि इंग्लंडला 368 धावांचं आव्हान दिलं. भारताने दिलेलं हे आव्हान इंग्लंडच्या फलंदाजांना पेलवलं नाही. इंग्लंडचा संघ 210 धावांमध्ये गारद झाला. त्यामुळे भारताने या सामन्यात इंग्लंडवर 157 धावांनी मात करत मालिकेत 2-1 अशी आघाडी मिळवली आहे. (Rohit’s century, Shardul’s all-round performance, India beat England by 157 runs, lead the series)

भारताने इंग्लंडला दुसऱ्या डावात 127 षटकात 368 धावांचं आव्हान दिलं होतं. हे आव्हान घेऊन मैदानात उतरलेल्या इंग्लंडची सुरुवात खूपच आश्वासक होती. इंग्लंडच्या सलामीच्या जोडीने भारतीय गोलंदाजांना जेरीस आणलं होतं. सलामीवीर हसीब हमीद आणि रॉरी बर्न्स या दोघांनी सलामीसाठी शतकी (100) भागीदारी केली. परंतु लार्ड शार्दुल ठाकूरने ही जोडी फोडून भारताला ब्रेकथ्रू मिळवून दिला. त्याने बर्न्सचा 50 धावांवर असताना काटा काढला. त्यानंतर काही वेळाने जाडेजाने हमीदला त्रिफळाचित केलं. त्यानंतर इंग्लंडचा कर्णधार जो रुटव्यतिरिक्त कोणत्याही फलंदाजाला फार वेळ मैदानात टिकता आलं आहे. प्रत्येक फलंदाज ठराविक अंतराने बाद होते गेले. रुट मात्र या डावातही खेळपट्टीला चिकटला होता. मात्र पुन्हा एकदा लॉर्ड शार्दुलने महत्त्वाची जबाबदारी पार पाडली. त्याने रुटला त्रिफळाचित करत भारताचा विजय पक्का केला. भारताकडून या डावात उमेश यादवने सर्वाधिक 3 विकेट घेतल्या. तर शार्दुल ठाकूर, जसप्रीत बुमराह, रवींद्र जाडेजाने प्रत्येकी 2 विकेट घेतल्या.

रोहित शर्माची तुफानी खेळी

चौथ्या कसोटी सामन्याच्या तिसऱ्या दिवशी रोहितने आपल्या कसोटी कारकिर्दीतील आठवे शतक झळकावले. परदेशी भूमीवरचे रोहितचे हे पहिले कसोटी शतक आहे. यापूर्वी त्याने परदेशात कसोटीत शतक झळकावले नव्हते. रोहितची शतक पूर्ण करण्याची शैलीही वेगळी होती. 64 व्या षटकात गोलंदाजी करणाऱ्या मोईन अलीच्या चेंडूवर त्याने शानदार षटकार मारून शतक पूर्ण केले. रोहित नोव्हेंबर 2013 मध्ये कोलकाता येथे पहिला कसोटी सामना खेळला होता, पण त्यानंतर तो कसोटीत परदेशी भूमीवर शतक झळकावू शकला नाही. ही कमतरता रोहितने यावेळी इंग्लंडमध्ये सात वर्षानंतर (2021) मध्ये पूर्ण केली. रोहितने षटकार मारून कसोटीत शतक पूर्ण करण्याची ही तिसरी वेळ आहे.

लॉर्ड शार्दुलची अष्टपैलू कामगिरी

इंग्लंडविरुद्ध सुरू ओव्हल कसोटी सामन्यात भारताच्या टॉपच्या फलंदाजांनी नांगी टाकल्यानंतर गोलंदाज शार्दूल ठाकूर पुन्हा एकदा संकटमोचक म्हणून धावून आला. पहिल्या डावात शार्दूलने मैदानावर तळ ठोकून टिच्चून फलंदाजी करत इंग्लंडच्या गोलंदाजांची अक्षरश: पिसे काढली. शार्दूलने 36 चेंडूत 7 चौकार आणि तीन षटकार ठोकत दमदार 57 धावा कुटल्या. त्याच्या या खेळीच्या जोरावर भारताने कशीबशी 191 धावांपर्यंत मजल मारली. दुसऱ्या डावातही भारताचा डाव 350 धावांमध्ये संपुष्टात होईल असे वाटत असताना पुन्हा एकदा शार्दुल टीम इंडियासाठी धावून आला. दुसऱ्या डावात त्याने 72 चेंडूत 60 धावांची खेळी करत भारताला 400 धावांचा टप्पा पार करुन दिला.

फलंदाजीत शार्दुलच चमकलाच, त्यासोबत त्याने गोलंदाजीतही चांगली कामगिरी केली. पहिल्या डावात त्याला केवळ एकच बळी मिळवता आला होता. दुसऱ्या डावात त्याने इंग्लंडचे दोन महत्त्वाचे फलंदाज बाद केले. इंग्लंडच्या सलामीच्या जोडीने भारतीय गोलंदाजांची धुलाई सुरु केली होती. सलामीवीर हसीब हमीद आणि रॉरी बर्न्स या दोघांनी सलामीसाठी शतकी (100) भागीदारी केली. परंतु लार्ड शार्दुल ठाकूरने ही जोडी फोडून भारताला ब्रेकथ्रू मिळवून दिला. त्याने बर्न्सचा 50 धावांवर असताना काटा काढला. त्यानंतर या मालिकेत सातत्याने भारतीय गोलंदाजांची पिसं काढणारा कर्णधार जो रुट मात्र या डावातही खेळपट्टीला चिकटला होता. मात्र पुन्हा एकदा लॉर्ड शार्दुलने महत्त्वाची जबाबदारी पार पाडली. त्याने रुटला त्रिफळाचित करत भारताचा विजय पक्का केला.

इतर बातम्या

IND vs ENG : भारतावर मोठं संकट, चौथी कसोटी सुरु असतानाच दिग्गज खेळाडू सामन्याबाहेर, पाचव्या कसोटीपूर्वी संघ अडचणीत

Special Report : इंग्लंड दौऱ्यातही मोठी खेळी नाहीच, अजिंक्य रहाणेचं करिअर संपलं का?

IND vs ENG : पाचव्या टेस्टमध्ये इंग्लंडचा दिग्गज परतण्याची शक्यता, इंग्लंड संघ व्यवस्थापन मात्र चिंतेत

(Rohit’s century, Shardul’s all-round performance, India beat England by 157 runs, lead the series)

ठाण्यात टीएमटी बसेस बंद, नेमकं झालं काय? कर्मचारी उतरले रस्त्यावर
ठाण्यात टीएमटी बसेस बंद, नेमकं झालं काय? कर्मचारी उतरले रस्त्यावर.
'...नाहीतर फडणवीस जेलमध्ये टाकतील', नाराज भुजबळांना जरांगे यांचा सल्ला
'...नाहीतर फडणवीस जेलमध्ये टाकतील', नाराज भुजबळांना जरांगे यांचा सल्ला.
उद्धव ठाकरे नागपुरात फडणवीसांच्या भेटीला, दोघांत काय झाली चर्चा?
उद्धव ठाकरे नागपुरात फडणवीसांच्या भेटीला, दोघांत काय झाली चर्चा?.
'...पाया पडतो', विधानभवन परिसरात ठाकरे अन् दरेकरांमध्ये मिश्किल संवाद?
'...पाया पडतो', विधानभवन परिसरात ठाकरे अन् दरेकरांमध्ये मिश्किल संवाद?.
'...पण माझी अवहेलना, मंत्रिपद कोणी नाकारलं हे शोधणारच',भुजबळांचा संताप
'...पण माझी अवहेलना, मंत्रिपद कोणी नाकारलं हे शोधणारच',भुजबळांचा संताप.
मस्साजोगमधील सरपंच हत्या प्रकरण : 'त्या' दोघांच्या भेटीचं CCTV व्हायरल
मस्साजोगमधील सरपंच हत्या प्रकरण : 'त्या' दोघांच्या भेटीचं CCTV व्हायरल.
अजित पवार नॉट रिचेबल, भास्कर जाधवांनी कारण देत केला मोठा गौप्यस्फोट
अजित पवार नॉट रिचेबल, भास्कर जाधवांनी कारण देत केला मोठा गौप्यस्फोट.
छगन भुजबळ राज्यपाल होणार? भाजप नेत्याचं मोठं वक्तव्य अन् चर्चांना उधाण
छगन भुजबळ राज्यपाल होणार? भाजप नेत्याचं मोठं वक्तव्य अन् चर्चांना उधाण.
'...तर शिंदे माझे मंत्रिपद काढू शकतात', उदय सामंत यांचं मोठं वक्तव्य
'...तर शिंदे माझे मंत्रिपद काढू शकतात', उदय सामंत यांचं मोठं वक्तव्य.
नाही लाल दिवा, आम्ही जातो आमच्या गावा; मंत्रिपद हुकल्यानं कोण नाराज?
नाही लाल दिवा, आम्ही जातो आमच्या गावा; मंत्रिपद हुकल्यानं कोण नाराज?.