IND vs SA | Virat Kohli मुळे ‘या’ प्लेयरच करिअर उद्धवस्त झालं का? हर्षा भोगलेच्या टि्वटनंतर वाद

IND vs SA 3rd ODI | हर्षा भोगले यांच्या टि्वटनंतर सोशल मीडियावर वाद सुरु झाला आहे. विराट कोहलीचे फॅन्स चांगलेच खवळले आहेत. टीम इंडियाने काल दक्षिण आफ्रिकेविरुद्धची वनडे सीरीज 2-1 ने जिंकली. या सीरीजमध्ये दक्षिण आफ्रिकेविरुद्ध टीम इंडियाचा युवा संघ मैदानात उतरला होता.

IND vs SA | Virat Kohli मुळे 'या' प्लेयरच करिअर उद्धवस्त झालं का? हर्षा भोगलेच्या टि्वटनंतर वाद
Virat Kohli Image Credit source: PTI
Follow us
| Updated on: Dec 22, 2023 | 10:29 AM

IND vs SA 3rd ODI | दक्षिण आफ्रिकेविरुद्ध तिसऱ्या वनडे सामन्यात विकेटकीपर फलंदाज संजू सॅमसनने शानदार शतक झळकावलं. टीम इंडियाने हा सामना जिंकला. संजू सॅमसन बऱ्याच काळापासून टीम इंडियामध्ये आपल स्थान पक्क करण्यासाठी संघर्ष करत आहे. अनेकदा चांगला परफॉर्मंन्स करुनही संजूला टीममध्ये स्थान मिळालं नाही. संजूच्या सेंच्युरीनंतर फॅन्स खूप खूश आहेत. संजूच स्थान टीममध्ये टिकून राहील का? यावरुन आता वादविवाद सुरु आहेत. या दरम्यान कॉमेंटेटर हर्षा भोगले यांनी एक टि्वट केलय. त्यावरुन फॅन्स आपसात भिडले आहेत.

तिसऱ्या वनडे मॅचबद्दल बोलायच झाल्यास टीम इंडियाने पहिली बॅटिंग केली. 296 धावा केल्या. तिसऱ्या नंबरवर फलंदाजीला आलेल्या संजू सॅमसनने या मॅचमध्ये 108 धावांची शतकी खेळी साकारली. संजूने 114 चेंडूत 6 फोर आणि 3 सिक्स मारले. संजूच्या दमदार फलंदाजीमुळे टीम इंडियाला मोठी धावसंख्या उभारता आली. टीम इंडियाने हा सामना 78 धावांनी जिंकला.

फॅन्स भडकले, त्यांचं काय म्हणणं?

या इनिंगनंतर संजूच सर्वत्र कौतुक सुरु झालय. कॉमेंटेटर हर्षा भोगले यांनी सुद्धा टि्वट केलय. संजू तिथेच फलंदाजी करतोय, जिथे त्याने केली पाहिजे. हर्षा संजूच्या नंबर 3 वर फलंदाजीबद्दल बोलत होते. पण यावरुन फॅन्स भडकले. कारण वनडेमध्ये नंबर 3 वर विराट कोहली बॅटिग करतो. विराटला नंबर 3 वरुन हटवाव असं तुमच म्हणण आहे का? असं फॅन्सनी म्हटलय. त्यावरुन वादविवाद वाढत चाललाय.

हर्षा भोगले यांनी काय स्पष्टीकरण दिलं?

हर्षा भोगले यांनी त्यावर टि्वट करुन स्पष्टीकरण दिलय. “नंबर 3 च्या पोजिशनवर जो फलंदाज खेळतोय, तो आतापर्यंतच महान फलंदाज आहे. संजू सॅमसनला कुठला नंबर सूट होतो? त्या बद्दल मी बोलत होतो. टीम इंडियासाठी नंबर 3 वर कोणी बॅटिंग केली पाहिजे, हे मी म्हटलेलं नाही. कारण जो पर्यंत विराट कोहली आहे, हा नंबर त्याचाच आहे” असं हर्षा भोगले यांनी म्हटलय.

'एक खून करून पोट भरलं नाही?', जरांगे पाटलांचा थेट मुंडेंवर आरोप
'एक खून करून पोट भरलं नाही?', जरांगे पाटलांचा थेट मुंडेंवर आरोप.
'कोल्हेंच्या वक्तव्याची कीव, त्यांनीही...'; मित्रपक्षांकडून टीकास्त्र
'कोल्हेंच्या वक्तव्याची कीव, त्यांनीही...'; मित्रपक्षांकडून टीकास्त्र.
शरद पवार गटात अलबेल नाही? सत्तेत सहभागी होण्यासाठी 2 मतप्रवाह?
शरद पवार गटात अलबेल नाही? सत्तेत सहभागी होण्यासाठी 2 मतप्रवाह?.
वाल्मिक कराड लाडकी बहीण योजनेचा अध्यक्ष, बावनकुळेंचं समर्थन? म्हणाले..
वाल्मिक कराड लाडकी बहीण योजनेचा अध्यक्ष, बावनकुळेंचं समर्थन? म्हणाले...
'मुन्नीचं लय प्रेम पण ती बोलना, बोलली तर मुन्नीचे कपडे टराटरा...'
'मुन्नीचं लय प्रेम पण ती बोलना, बोलली तर मुन्नीचे कपडे टराटरा...'.
'EVM म्हणजे एव्हरी व्होट अगेन्स्ट मुल्ला',भाजपचा बडा नेता काय म्हणाला?
'EVM म्हणजे एव्हरी व्होट अगेन्स्ट मुल्ला',भाजपचा बडा नेता काय म्हणाला?.
'ठाकरे गट झोपेत, काँग्रेसची मोडलेली पाठ..',कोल्हेंच्या वक्तव्यानं खळबळ
'ठाकरे गट झोपेत, काँग्रेसची मोडलेली पाठ..',कोल्हेंच्या वक्तव्यानं खळबळ.
वडेट्टीवारांचा गंभीर आरोप, 'मविआ'ला फटका बसण्याचं सांगितलं कारण
वडेट्टीवारांचा गंभीर आरोप, 'मविआ'ला फटका बसण्याचं सांगितलं कारण.
...म्हणून शरद पवार महाविकास आघाडीत नाराज, मोठी माहिती समोर
...म्हणून शरद पवार महाविकास आघाडीत नाराज, मोठी माहिती समोर.
काँट्रॅक्ट द्यायचं असेल तर कराडशी संपर्क साधा.', आव्हाडांचं गंभीर आरोप
काँट्रॅक्ट द्यायचं असेल तर कराडशी संपर्क साधा.', आव्हाडांचं गंभीर आरोप.