IPL 2024 Auction | तिघांमध्ये स्पर्धा, अखेरीस RCB ची बाजी, वेस्ट इंडिजच्या एका प्लेयरसाठी मोजले 11.5 कोटी
IPL 2024 Auction | आयपीएल 2024 च्या ऑक्शनमध्ये चुरस दिसून येतेय. वेस्ट इंडिजच्या एका प्लेयरसाठी तीन फ्रेंचायजींमध्ये स्पर्धा रंगली होती. अखेर RCB ने बाजी मारली. हा प्लेयर इतका महत्त्वाचा का आहे?.
IPL 2024 Auction | आयपीएल 2024 साठी दुबईत लिलाव सुरु आहे. यामध्ये अनेक खेळाडूंच नशीब फळफळलय. प्रतिभावान खेळाडूंवर पैशांचा पाऊस पडतोय. चांगल्या खेळाडूंना आपल्या टीममध्ये घेण्यासाठी फ्रेंचायजींमध्ये चुरस दिसून येतेय. यात खेळाडू मालामाल होतायत. आयपीएलमध्ये सर्वच टीम्स नव्याने बांधणी करतायत. पुढच्यावर्षीच्या आयपीएलमध्ये तुम्हाला टीम कॉम्बिनेशन मोठ्या प्रमाणात बदलेलं दिसेल. आयपीएलमध्ये नेहमीच वेस्ट इंडिजच्या खेळाडूंना चांगला भाव मिळतो. आताही तसच झालय. वेस्ट इंडिजच्या एका खेळाडूला आपल्या ताफ्यात घेण्यासाठी तीन फ्रेंचायजींमध्ये चुरस दिसून आली. अखेरीस विराट कोहलीच्या रॉयल चॅलेंजर्सने बँगलोरने बाजी मारली.
त्यांनी या खेळाडूसाठी आपल्या पैशाची पोतडी रिकामी केली. या खेळाडूला विकत घेण्यासाठी फ्रेंचायजींमध्ये तीव्र चुरस दिसून आली. अखेरीस RCB ने अल्झारी जोसेफला 11.5 कोटी रुपयांना विकत घेतलं. दिल्ली कॅपिटल्सने बोली लावून सुरुवात केली. त्यानंतर लखनऊ सुपर जायंट्स आणि रॉयल चॅलेंजर्स बँगलोरमध्ये स्पर्धा रंगली. अखेरपर्यंत बोलीचा आकडा वाढत होता. पण RCB नो 11.5 कोटी रुपये मोजून अल्झारी जोसेफला विकत घेतलं. पॅट कमिन्स हातून गेल्याची लागलेली चुटपूट त्यांनी भरुन काढली.
आयपीएलमधली त्याची कामगिरी कशी आहे?
अल्झारी जोसेफने 19 T20 सामन्यात 32 विकेट घेतल्या आहेत. 5/40 ही त्याची सर्वोत्तम कामगिरी आहे. वेस्ट इंडिजच्या या खेळाडूने 101 T20 सामन्यात 121 विकेट घेतल्या आहेत. 6/12 ही त्याची सर्वोत्तम गोलंदाजी आहे. 6/12 ही आयपीएलमधली त्याची सर्वोत्तम कामगिरी आहे. 2019 साली मुंबई इंडियन्सकडून खेळतान सनरायजर्स हैदराबाद विरुद्ध त्याने ही कामगिरी केलेली. मागचे दोन सीजन तो गुजरात टायटन्सकडून खेळला. तिथे त्याने 19 सामन्यात 20 विकेट घेतले.