IPL 2021: आरसीबीचा संघ कर्णधार विराट शिवाय युएईला रवाना, संघामध्ये काही महत्त्वाचे बदल
आरसीबी संघाने सर्वात मोठा बदल म्हणजे श्रीलंका दौऱ्यात भारतीय संघाची डोकेदुखी वाढवणाऱ्या श्रीलंकेचा अष्टपैलू खेळाडू वनिंदू हसरंगा याला करारबद्ध केलं आहे.
दुबई : कोरोनाच्या संकटामुळे उर्वरीत आयपीएल (IPL 2021) ही युएई (UAE) होणार आहे. 19 सप्टेंबरपासून सुरु होणाऱ्या आयपीएलसाठी सर्व संघ हळू हळू युएईला पोहोचत आहेत. सर्वात आधी चेन्नई सुपरकिंग्स, त्यानंतर मुंबई इंडियन्स, केकेआर आणि मग दिल्ली कॅपिटल्स हे संघ युएईला पोहोचले आहेत. त्यानंतर आता रॉयल चॅलेंजर्स बंगळुरुचा संघही (RCB) युएईला रवाना झाला आहे. दरम्यान कर्णधार विराट कोहली सध्या इंग्लंडमध्ये कसोटी सामना खेळत असल्याने त्याच्या शिवाय संघ युएईला रवाना झाला आहे.
आरसीबीने त्यांच्या ट्विटर हँडलवर संघाचा विमातळावरील फोटो शेअर केला आहे. यामध्ये खेळाडूंसह, प्रशिक्षक आणि सपोर्ट स्टाफही दिसत आहे. युएईला रवाना होण्यापूर्वी सर्वांनी एकत्र उभा राहत विमानतळावर फोटो काढला आहे. या फोटोला दिलेल्या कॅप्शनमध्ये लिहिलं आहे की,‘आरसीबी कुटुंब युएईला रवाना.’
The RCB family en route UAE! ✈️ ??
Bring on #IPL2021 ??. #PlayBold #WeAreChallengers #TravelDay pic.twitter.com/Is3Ve3M2Pr
— Royal Challengers Bangalore (@RCBTweets) August 29, 2021
आरसीबी संघात चार नवे बदल
आरसीबी संघाने सर्वात मोठा बदल म्हणजे श्रीलंका दौऱ्यात भारतीय संघाची डोकेदुखी वाढवणाऱ्या श्रीलंकेचा अष्टपैलू खेळाडू वनिंदू हसरंगा याला करारबद्ध केलं आहे. ऑस्ट्रेलियाचा गोलंदाज अॅडम झाम्पाच्या जागी हसरंगाला घेण्यात आलं आहे. हसरंगासह श्रीलंकेचा आणखी एक खेळाडू यासह दुष्मंथा चमिरा यालादेखील आरसीबीने संघात घेतलं आहे. तो केन रिचर्डसनच्या बदली खेळणार आहे. तर टीम डेव्हिड हा फिन एलनला रिप्लेस करणार आहे. तर केन रिचर्डसनला जिओर्जी गार्टोन बदली खेळाडू म्हणून खेळणार आहे.
इतर बातम्या
IPL 2021: UAE मध्ये मुंबई आणि चेन्नई संघाची धमाल, कोणी खेळतंय फुटबॉल तर कोणी वॉलीबॉल, पाहा VIDEO
तब्बल 65 दिवसांनी पत्नीला भेटल्यानंतर सूर्यकुमार खुश, VIDEO शेअर करत व्यक्त केला आनंद
VIDEO : कॅप्टन कूल धोनी बनला रॉकस्टार, उर्वरीत IPL ची दणकेबाज घोषणा, म्हणतो ‘पिक्चर अभी बाकी है’
(Royal challengers banglore team leave for uae on sunday without captain virat kohli see pics)