Sanju Samson IPL 2023 : ‘माफ करा, माझ्याकडे आता….’, राजस्थान रॉयल्सच्या पराभवावर अखेर संजू सॅमसन बोलला

Sanju Samson IPL 2023 : राजस्थान रॉयल्सच्या टीमने सीजनची दिमाखदार सुरुवात केली होती. पण सीजनच्या दुसऱ्या टप्प्यात राजस्थान रॉयल्सचा फॉर्म ढेपाळला. आता या टीमच प्लेऑफमध्ये दाखल होण्याच स्वप्न जवळपास संपुष्टात आलय.

Sanju Samson IPL 2023 : 'माफ करा, माझ्याकडे आता....', राजस्थान रॉयल्सच्या पराभवावर अखेर संजू सॅमसन बोलला
IPL 2023 Sanju samsonImage Credit source: PTI
Follow us
| Updated on: May 15, 2023 | 3:23 PM

जयपूर : IPL 2023 मध्ये काल राजस्थान रॉयल्स आणि रॉयल चॅलेंजर्स बँगलोर टीममध्ये मॅच झाली, सवाई मानसिंह स्टेडियममध्ये झालेल्या सामन्यात राजस्थान रॉयल्सची खूप वाईट स्थिती झाली. बँगलोरने हा सामना एकतर्फी जिंकला. या पराभवामुळे राजस्थान टीमच्या प्लेऑफमध्ये दाखल होण्याच्या आशा जवळपास संपुष्टात आल्या आहेत. राजस्थानचा 112 धावांनी अत्यंत दारुण पराभव झाला. राजस्थानची संपूर्ण टीम फक्त 59 रन्सवर ऑलआऊट झाली.

संजू सॅमसनला इतक्या दारुण पराभवाबद्दल प्रश्न विचारण्यात आला. संजूला इतक्या वाईट फलंदाजीबद्दल प्रश्न विचारण्यात आला. 59 रन्सवर टीम कशी ऑलआऊट झाली? या प्रश्नावर संजून जणू मौन धारण केलं.

संजू सॅमसन काय म्हणाला?

“जेव्हा आमचे फलंदाज एकापाठोपाठ एक बाद होत होते, तेव्हा माझ्या डोक्यात एकच विचार येत होता, अखेर काय चुकतय? माफ करा, पण आता माझ्याकडे या प्रश्नाच उत्तर नाहीय” असं संजू सॅमसन म्हणाला.

पावरप्लेचा योग्य वापर नाही

सामन्यानंतर प्रेझेंटेशनवेळी संजू अजूनही बरच काही बोलला. “पावरप्लेमध्ये आम्ही जस खेळायला पाहिजे होतं, तसं खेळलो नाही. आम्हाला एका अटी-तटीच्या सामन्याची अपेक्षा होती. पण असं झालं नाही. यासाठी RCB च्या बॉलर्सना क्रेडीट द्याव लागेल. त्यांनी ज्या एनर्जी आणि मेहनतीने गोलंदाजी केली, ते कमालीच होतं. आमच्या टॉप थ्री फलंदाजांनी भरपूर धावा केल्या आहेत. पण या मॅचमध्ये ते चालले नाहीत”

59 रन्सवर ऑलआऊट

रॉयल चॅलेंजर्स बँगलोरच्या टीमने पहिली बॅटिंग केली. त्यांनी 20 ओव्हर्समध्ये 171 धावा केल्या. 172 धावांच्या लक्ष्याचा पाठलाग करताना राजस्थानची खराब सुरुवात झाली. फक्त 59 रन्सवर संपूर्ण टीम ऑलआऊट झाली. राजस्थानकडून कोणी जास्त धावा केल्या?

राजस्थानचे दोन्ही ओपनर्स या मॅचमध्ये खातं उघडू शकले नाहीत. कॅप्टन संजू सॅमसनने फक्त 4 धावा केल्या. शिमरॉन हेटमायरने टीमसाठी सर्वाधिक 35 धावा केल्या. त्यानंतर सर्वाधिक धावा करणारा फलंदाज ज्यो रुट होता. त्याने फक्त 10 धावा केल्या. अन्य फलंदाज दोन आकडी धावसंख्येपर्यंतही पोहोचू शकले नाहीत.

भुजबळांची नाराजी,भाजप प्रवेशाचा गेमप्लॅन अन्... दमानिया काय म्हणाल्या?
भुजबळांची नाराजी,भाजप प्रवेशाचा गेमप्लॅन अन्... दमानिया काय म्हणाल्या?.
भिवंडी हादरली....निर्जनस्थळी अल्पवयीन मुलीची हत्या, मृतदेह आढळताच....
भिवंडी हादरली....निर्जनस्थळी अल्पवयीन मुलीची हत्या, मृतदेह आढळताच.....
नातवासोबत एकनाथ शिंदेंचा शेतात फेरफटका, शेतीकामात रमले अन्...
नातवासोबत एकनाथ शिंदेंचा शेतात फेरफटका, शेतीकामात रमले अन्....
शिरसाट मंत्री होताच अॅक्शनमोडवर,कॅमेऱ्यासमोरच महिला अधिकाऱ्यांना झापलं
शिरसाट मंत्री होताच अॅक्शनमोडवर,कॅमेऱ्यासमोरच महिला अधिकाऱ्यांना झापलं.
'तुमचा संतोष देशमुख करू...', तानाजी सावंत यांच्या दोन पुतण्यांना धमकी
'तुमचा संतोष देशमुख करू...', तानाजी सावंत यांच्या दोन पुतण्यांना धमकी.
धनंजय मुंडे अन् वाल्मिक कराडचे संबंध काय? अंजली दमानियांचा हल्लाबोल
धनंजय मुंडे अन् वाल्मिक कराडचे संबंध काय? अंजली दमानियांचा हल्लाबोल.
मुख्यमंत्री किंवा दादांनी बीडच पालकमंत्रिपद स्वीकाराव, कोणी केली मागणी
मुख्यमंत्री किंवा दादांनी बीडच पालकमंत्रिपद स्वीकाराव, कोणी केली मागणी.
हिवाळ्यात पावसाळा? 26-27 डिसेंबरला अवकाळी पाऊस, 'या' ठिकाणी कोसळणार
हिवाळ्यात पावसाळा? 26-27 डिसेंबरला अवकाळी पाऊस, 'या' ठिकाणी कोसळणार.
सिगारेट बट्सपासून 100 कोटींचा व्यवसाय, तरुणाची भन्नाट कल्पना
सिगारेट बट्सपासून 100 कोटींचा व्यवसाय, तरुणाची भन्नाट कल्पना.
बंगल्याच्या वाटपावरून महायुतीत धुसफूस? शिवसेनेच्या मंत्र्यांकडून खंत
बंगल्याच्या वाटपावरून महायुतीत धुसफूस? शिवसेनेच्या मंत्र्यांकडून खंत.