RR vs MI Live Score, IPL 2021 : मुंबईचा दमदार विजय, 8 गडी राखून राजस्थानला लोळवलं!
RR vs MI Live Score in Marathi: इंडियन प्रिमीयर लीगच्या 14 व्या हंगामात प्लेऑफमध्ये चेन्नई, आरसीबी आणि दिल्ली हे तीन संघ पोहोचले असून चौथ्या स्थानासाठीच्या दृष्टीने मुंबई आणि राजस्थान यांच्यातील सामना महत्त्वाचा होता.

आयपीएलच्या अंतिम सामन्याला अवघे काही दिवस उरले असून अद्यापर्यंत प्लेऑफमध्ये खेळणारा चौथा संघ कोण? हे समोर आलेले नाही. आतापर्यंत चेन्नई सुपरकिंग्स, दिल्ली कॅपिटल्स आणि रॉयल चँलेजर्स बंगळुरू हे संघ प्लेऑफमध्ये पोहोचले असून चौथ्या स्थानासाठी हैद्राबाद सोडता इतर संघामध्ये चुरशीची शर्यत आहे. याच दृष्टीने आज होणारा राजस्थान रॉयल्स आणि मुंबई इंडियन्स या दोन संघामधील सामना अत्यंत महत्त्वाचा होता.
सामन्यात नाणेफेक जिंकत मुंबई इंडियन्सचा कर्णधार रोहित शर्माने गोलंदाजी निवडली. हा निर्णय मुंबईसाठी 100% बरोबर ठरला. मुंबईच्या गोलंदाजानी भेदक गोलंदाजी करत राजस्थानच्या संघाला अवघ्या 90 धावांवर रोखलं. ज्यामुळे आता मुंबईसमोर केवळ 91 धावांचे सोपे लक्ष्य होते. जे केवळ दोन विकेट्सच्या बदल्यात पूर्ण करत मुंबईने 8 विकेट्सने राजस्थानवर विजय मिळवला.
LIVE NEWS & UPDATES
-
RR vs MI: मुंबई 8 विकेट्सनी विजयी
मुंबईसमोर केवळ 91 धावांचे सोपे लक्ष्य होते. जे केवळ दोन विकेट्सच्या बदल्यात पूर्ण करत मुंबईने 8 विकेट्सने राजस्थानवर विजय मिळवला. इशानने यावेळी धमाकेदार खेळी करत अर्धशतकही झळकावलं. त्याने 25 चेंडूत नाबाद 50 धावा केल्या
-
RR vs MI: सूर्यकुमार यादव आऊट!
सूर्यकुमार यादव 13 धावा करुन बाद झाला आहे. मुस्तफिजूरने त्याची विकेट घेतली आहे.
-
-
RR vs MI: मुंबईचा कर्णधार रोहित शर्मा बाद
91 धावांचा पाठलाग करणाऱ्या मुंबईचा कर्णधार रोहित शर्मा 22 धावा करुन बाद झाला आहे. चेतन सकारियाने त्याची विकेट घेतली आहे.
-
RR vs MI: मुंबईचे सलामीवीर मैदानात
91 धावांच्या सोप्या आव्हानाचा पाठलाग करण्यासाठी मुंबईचे सलामीवीर मैदानात उतरले आहेत. रोहित शर्मासह इशान किशन फलंदाजीसाठी आलेले आहेत.
-
RR vs MI: 90 धावांवर आटोपला राजस्थानचा डाव
सुरुवातीपासून ढासळलेल्या फलंदाजीमुळे राजस्थानचा संघ केवळ 90 धावांपर्यंतच मजल मारु शकला आहे. ज्यामुळे मुंबईसमोर आता केवळ 91 धावांचे सोपे लक्ष्य आहे.
-
-
RR vs MI: डेविड मिलरही बाद
राजस्थान संघाकडून आजच्या सामन्यात एकाबाजूने टिकून खेळणारा डेविड मिलरही 15 धावा करुन बाद झाला आहे. कुल्टर नाईलने त्याला बाद केलं आहे.
-
RR vs MI: श्रेयस गोपाल शून्यावर बाद
राजस्थानचा श्रेयस गोपाल खाते न खोलताच बाद झाला आहे. बुमराहच्या चेंडूवर इशानने त्याचा झेल घेतला आहे.
-
RR vs MI: तेवतियाही बाद
राजस्थानचा डाव काहीसा सावरत असणारा राहुल तेवतियाही 12 धावा करुन बाद झाला आहे. नीशामनेच त्याचीही विकेट घेतली आहे.
-
RR vs MI: राजस्थानचा निम्मा संघ तंबूत
कर्णधार संजू बाद होताच काही वेळातच शिवम दुबे आणि ग्लेन फिलिप्स हेही बाद झाले आहेत. दोघांच्या विकेट अनुक्रमे निशाम आणि कुल्टर नाईल यांनी घेतल्या असून 9.4 ओव्हरनंतर राजस्थानची अवस्था 5० धावांवर 5 बाद झाली आहे.
-
RR vs MI: कर्णधार संजू सॅमसन बाद
राजस्थान रॉयल्स संघाची अवस्था बिकट होत असून कर्णधार संजूही अवघ्या 3 धावा करुन बाद झाला आहे. निशामच्या चेंडूवर जयंत यादवने त्याचा झेल घेतला आहे.
-
RR vs MI: राजस्थानचा दुसरा सलामीवीरही बाद
यशस्वी पाठोपाठ एविन लुईसही बाद झाला आहे. पण त्याने 19 चेंडूत 24 धावा ठोकत संघाला एक चांगली सुरुवात करुन दिली.
-
RR vs MI: यशस्वी जैस्वाल बाद
राजस्थानचा सलामीवीर यशस्वी ज्याने नुकतंच चेन्नईविरुद्ध धमाकेदार अर्धशतक ठोकलं होतं. तो आज लवकर बाद झाला आहे. 12 धावांवर खेळत असताना नाथनच्या चेंडूवर यष्टीरक्षक इशानने त्याची कॅच घेतली आहे.
-
RR vs MI: राजस्थानचे सलामीवीर मैदानात
मागील काही सामन्यांत दमदार फॉर्ममध्ये असणारे राजस्थान रॉयल्स संघाचे सलामीवीर यशस्वी जैस्वाल आणि एविन लुईस फलंदाजीसाठी मैदानात आले आहेत.
-
RR अंतिम 11
संजू सॅमसन (कर्णधार आणि यष्टीरक्षक), एविन लुईस, यशस्वी जैसवाल, डेविड मिलर, शिवम दुबे, ग्लेन फिलीप्स, राहुल तेवतिया, श्रेयस गोपाल, कुलदीप यादव, मुस्तफिजूर रेहमान, चेतन सकारीया
-
MI अंतिम 11
रोहित शर्मा (कर्णधार) सौरभ तिवारी, ईशान किशन(यष्टीरक्षक), सूर्यकुमार यादव, हार्दिक पंड्या, कायरन पोलार्ड, जेम्स नीशम, नॅथन कुल्टर-नाईल, जसप्रीत बुमराह, जयंत यादव, ट्रेंट बोल्ट.
-
राजस्थानकडे प्रथम फलंदाजी
मुंबई इंडियन्सचा कर्णधार रोहित शर्माने नाणेफेक जिंकत गोलंदाजी निवडली आहे. त्यामुळे राजस्थानचे खेळाडू प्रथम फलंदाजीसाठी मैदानात उतरतील.
Published On - Oct 05,2021 7:02 PM





