RR vs MI Score, आयपीएल 2024 : राजस्थानचा मुंबईवर 9 विकेट्सने अफलातून विजय, यशस्वीचं कडक शतक
Rajasthan Royals vs Mumbai Indians IPL 2024 Highlights and Score in Marathi : राजस्थान विरुद्ध मुंबई इंडियन्स या दोन्ही संघांचा आयपीएलच्या 17 व्या मोसमातील हा एकूण आठवा सामना होता. या सामन्यात राजस्थानने मुंबईवर मात केली.

आयपीएलच्या 17 व्या मोसमातील 38 व्या सामन्यात राजस्थान रॉयल्सने मुंबई इंडियन्सवर 9 विकेट्सने विजय मिळवला. या सामन्याचं आयोजन हे जयपूरमधील सवाई मानसिंह स्टेडियममध्ये करण्यात आलं होतं. राजस्थान रॉयल्सला मुंबई इंडियन्सने विजयासाठी 180 धावांचं आव्हान दिलं होतं. राजस्थानने हे आव्हान 18.4 ओव्हरमध्ये पूर्ण केलं. यशस्वी जयस्वाल राजस्थानच्या विजयाचा हिरो ठरला. यशस्वीने नाबाद 104 धावा केल्या. तर जॉस बटलरने 35 आणि कॅप्टन संजू सॅमसनने नाबाद 38 धावा केल्या. मुंबई विरुद्ध 5 विकेट्स घेणारा संदीप शर्मा मॅन ऑफ द मॅच ठरला. राजस्थानचा हा या मोसमातील सातवा विजय ठरला. तर मुंबईचा पाचवा पराभव ठरला.
LIVE NEWS & UPDATES
-
RR vs MI Live Score : राजस्थानचा 9 विकेट्सने विजय
राजस्थान रॉयल्सने मुंबई इंडियन्सवर 9 विकेट्सने दणदणीत विजय मिळवला आहे. राजस्थाने मुंबईकडून मिळालेलं 180 धावांचं आव्हान 1 विकेट गमावून 18.4 ओव्हरमध्ये पूर्ण केलं. राजस्थानकडून यशस्वी जयस्वाल याने 104*, कॅप्टन संजू सॅमसन 38* आणि जॉस बटलर याने 34 धावा केल्या. तर पीयूष चावलाने 1 विकेट घेतली.
-
RR vs MI Live Score : राजस्थानला 30 बॉलमध्ये 29 धावांची गरज
राजस्थानला विजयासाठी 5 ओव्हरमध्ये 29 धावांची गरज आहे. राजस्थानने 15 ओव्हरमध्ये 1 विकेट गमावून 151 धावा केल्या आहेत. यशस्वी आणि कॅप्टन संजू सॅमसन ही जोडी मैदानात खेळत आहे. मुंबईने राजस्थानला विजयासाठी 180 धावांचं आव्हान दिलं आहे.
-
-
RR vs MI Live Score : यशस्वीचं 31 बॉलमध्ये अर्धशतक
यशस्वी जयस्वाल याने आयपीएलच्या 17 व्या मोसमातील पहिलंवहिलं अर्धशतक हे मुंबई इंडियन्स विरुद्ध ठोकलं आहे. यशस्वीने 31 बॉलमध्ये 7 चौकार आणि 2 सिक्ससह 161.29 च्या स्ट्राईक रेटने हे अर्धशतक ठोकलं.
-
RR vs MI Live Score : राजस्थानला पहिला धक्का
पीयूष चावलाने राजस्थानला 74 धावांवर पहिला झटका दिला आहे. चावलाने जॉस बटलरला 35 धावांवर क्लिन बोल्ड केलं. बटलरने यशस्वी जयस्वाल याच्यासह 74 धावांची सलामी भागीदारी केली.
-
RR vs MI Live Score : पावसाच्या विश्रांतीनंतर सामन्याला सुरुवात
पावसाच्या विश्रांतीनंतर सामन्याला 10 वाजून 45 मिनिटांनी सुरुवात झाली आहे. राजस्थानच्या डावातील 6 ओव्हरनंतर पावसाने एन्ट्री घेतली होती. त्यानंतर काही मिनिटांचा खेळ वाया गेला. मात्र त्यानंतर अखेर पावसाच्या विश्रांतीनंतर सामन्याला सुरुवात झाली आहे.
-
-
RR vs MI Live Score : राजस्थान-मुंबई सामन्यात पावसाची बॅटिंग, खेळ थांबला
राजस्थान रॉयल्स विरुद्ध मुंबई इंडियन्स सामन्यात पावसाच्या एन्ट्रीमुळे खेळ थांबला आहे. खेळपट्टी कव्हरने झाकण्यात आली आहे. पाऊस येण्याआधी राजस्थानने 180 या विजयी धावांचा पाठलाग करताना 6 ओव्हरमध्ये बिनाबाद 61 धावा केल्या आहेत. यशस्वी जयस्वाल 31 आणि जॉस बटलर 28 धावांवर नाबाद खेळत आहेत.
-
RR vs MI Live Score : राजस्थानच्या पावर प्लेमध्ये 61 धावा
राजस्थानच्या जॉस बटलर आणि यशस्वी जयस्वाल या सलामी जोडीने पावरप्लेच्या 6 ओव्हरमध्ये 61 धावा केल्या आहेत. यशस्वी 31 आणि बटलर 28 धावांवर नाबाद खेळत आहे. मुंबईने राजस्थानला विजयासाठी 180 धावांचं आव्हान दिलं आहे.
-
RR vs MI Live Score : यशस्वी-बटलर सलामी जोडी मैदानात
राजस्थानच्या बॅटिंगला सुरुवात झाली आहे. यशस्वी जयस्वाल आणि जॉस बटलर सलामी जोडी मैदानात आली आहे. मुंबईने राजस्थानला विजयासाठी 180 धावांंचं आव्हान दिलं आहे.
-
RR vs MI Live Score : राजस्थानसमोर 180 धावांचं आव्हान
मुंबईने राजस्थानला विजयासाठी 180 धावांचं आव्हान दिलं आहे. मुंबईने 20 ओव्हरमध्ये 9 विकेट्स गमावून 179 धावा केल्या आहेत. मुंबईकडून तिलक वर्मा याने 65 आणि नेहल वढेरा याने 49 धावा केल्या. तर राजस्थानकडून संदीप शर्मा याने सर्वाधिक 5 विकेट्स घेतल्या.
-
RR vs MI Live Score : तिलक वर्मा आऊट, मुंबईला सातवा झटका
मुंबईने सातवी विकेट गमावली आहे. तिलक वर्मा याने 45 बॉलमध्ये 65 धावांची झुंजार खेळी केली.
-
RR vs MI Live Score : कॅप्टन हार्दिक पंड्या आऊट
मुंबईने सहावी विकेट गमावली आहे. कॅप्टन हार्दिक पंड्या एलबीडब्ल्यू आऊट झाला आहे. हार्दिकने 10 धावा केल्या.
-
RR vs MI Live Score : नेहल वढेरा आऊट
मुंबईने पाचवी विकेट गमावली आहे. नेहल वढेरा 24 बॉलमध्ये 49 धावा करुन आउट झाला आहे. मुंबईचा स्कोअर 16.1 ओव्हरमध्ये 5 बाद 151 असा झाला आहे.
-
RR vs MI Live Score : मुंबईच्या 15 ओव्हरनंतर 131 धावा
मुंबई इंडियन्सने 15 ओव्हरमध्ये 4 विकेट्स गमावून 131 धावा केल्या आहेत. तिलक वर्मा 49 आणि नेहल वढेरा 36 धावांवर नाबाद खेळत आहेत.
-
RR vs MI Live Score : वर्मा-वढेरात अर्धशतकी भागीदारी, मुंबईचा डाव सावरला
मुंबईने राजस्थान विरुद्ध 14 ओव्हरमध्ये 4 विकेट्स गमावून 120 धावा केल्या आहेत. तिलक वर्मा 43 आणि नेहल वढेरा 31 धावांवर नाबाद खेळत आहेत. तिलक आणि नेहल या दोघांनी आतापर्यंत नाबाद 68 धावांची भागीदारी केली आहे.
-
RR vs MI Live Score : युझवेंद्र चहलची ऐतिहासिक कामगिरी, आयपीएलमध्ये विकेट्सचं द्विशतक पूर्ण
युझवेंद्र चहल याने इतिहास रचला आहे. चहलने आयपीएलच्या 17 व्या मोसमात मुंबई इंडियन्स विरुद्ध विकेट्सचं द्विशतक पूर्ण केलं आहे. चहलने मोहम्मद नबी याला आपल्या बॉलिंगवर कॅच आऊट केलं. चहलने यासह 200 विकेट्सचा टप्पा गाठला. चहल अशी कामगिरी करणारा पहिला फलंदाज ठरला.
-
RR vs MI Live Score : सूर्यकुमार आऊट, मुंबईला तिसरा धक्का
रोहित-ईशान सलामी जोडीनंतर सूर्यकुमार यादवही आऊट झाला आहे. मोठा फटका मारण्यच्या नादात सूर्यकुमार यादव कॅच आऊट झाला. रोवमॅन पॉवेल याने सूर्याचा कॅच घेतला. संदीप शर्मा याची ही दुसरी विकेट ठरली.
-
RR vs MI Live Score : मुंबईची सलामी जोडी माघारी
मुंबईची राजस्थान विरुद्ध निराशाजनक सुरुवात झाली आहे. ट्रेंट बोल्टने आधी रोहित शर्माला 6 धावांवर आऊट करत पलटणला पहिला झटका दिला. त्यानंतर दुसऱ्याच ओव्हरमध्ये संदीप शर्मा याने ईशान किशनला झिरोवर कॅच आऊट केलं. त्यामुळे मुंबईची फ्लॉप सुरुवात झाली आहे.
-
RR vs MI Live Score : रोहित शर्मा आऊट
मुंबई इंडियन्सची निराशाजनक सुरुवात झाली आहे. ट्रेंट बोल्टने मुंबईला पहिला झटका दिला आहे. ट्रेंटने रोहितला विकेटकीपर संजू सॅमसन याच्या हाती कॅच आऊट केलं आहे. रोहितने 6 धावा केल्या.
-
RR vs MI Live Score : राजस्थानची प्लेईंग ईलेव्हन
राजस्थान रॉयल्स प्लेइंग ईलेव्हन : संजू सॅमसन (कॅप्टन आणि विकेटकीपर), यशस्वी जयस्वाल, संजू सॅमसन रियान पराग, ध्रुव जुरेल, शिमरॉन हेटमायर, रोवमन पॉवेल, रविचंद्रन अश्विन, ट्रेंट बोल्ट, आवेश खान, संदीप शर्मा आणि युझवेंद्र चहल.
-
RR vs MI Live Score : मुंबईची प्लेईंग ईलेव्हन
मुंबई इंडियन्स प्लेइंग ईलेव्हन : हार्दिक पांड्या (कर्णधार), इशान किशन (विकेटकीपर), रोहित शर्मा, सूर्यकुमार यादव, तिलक वर्मा, टिम डेव्हिड, नेहल वढेरा, मोहम्मद नबी, जेराल्ड कोएत्झी, पीयूष चावला आणि जसप्रीत बुमराह.
-
RR vs MI Live Score : नाणफेकीचा कौल मुंबईच्या बाजूने
मुंबई इंडियन्सने राजस्थान रॉयल्स विरुद्ध टॉस जिंकला आहे. कॅप्टन हार्दिक पंडयाने पहिले बॅटिंगचा निर्णय घेतला आहे. त्यामुळे आता मुंबईची पलटण राजस्थानसमोर विजयाासाठी किती धावांचं आव्हान ठेवणार? याकडे क्रिकेट चाहत्यांंचं लक्ष असणार आहे.
-
RR vs MI Live Score : राजस्थान विरुद्ध मुंबई हेड टु हेड रेकॉर्ड्स
राजस्थान रॉयल्स विरुद्ध मुंबई इंडियन्स दोन्ही संघ आयपीएलमध्ये एकूण 29 वेळा आमनेसामने आले आहेत. या 29 पैकी सर्वाधिक सामन्यात मुंबई वरचढ राहिली आहे. मुंबईने 15 सामने जिंकले आहेत. तर राजस्थानला 13 सामन्यात यश आलं आहे.
-
RR vs MI Live Score : राजस्थान-मुंबई दुसऱ्यांदा आमनेसामने
आयपीएलच्या 17 व्या मोसमात 22 एप्रिल रोजी राजस्थान रॉयल्स विरुद्ध मुंबई इंडियन्स आमनेसामने असणार आहेत. या सामन्याला संध्याकाळी साडे सात वाजता सुरुवात होणार आहे. उभयसंघांची या मोसमात आमनेसामने येण्याची ही दुसरी वेळ आहे. याआधी मुंबई विरुद्ध राजस्थान यांच्यात 1 एप्रिल रोजी सामना झाला होता. तेव्हा राजस्थानने मुंबईवर विजय मिळवला होता. त्यामुळे आता मुंबईचा राजस्थानवर मात करुन पराभवाचा वचपा घेण्याचा प्रयत्न असणार आहे.
Published On - Apr 22,2024 6:01 PM





