RR vs RCB IPL 2022: ओव्हरस्मार्ट Riyan parag ने रजत पाटीदारचा सोपा झेल सोडला, पहा VIDEO
RR vs RCB IPL 2022: रियान पराग रनआऊट झाल्यानंतर अश्विनवर वैतागला. आपल्या रनआऊट होण्याला अश्विन जबाबदार आहे, असं त्याचं म्हणणं होतं. रियान परागची ही कृती अनेकांना आवडलेली नव्हती.
मुंबई: IPL 2022 चा दुसरा क्वालिफायर सामना सुरु आहे. राजस्थान रॉयल्स आणि रॉयल चॅलेंजर्स बँगलोरमध्ये (RR vs RCB) हे दोन संघ आमने-सामने आहेत. अहमदाबादच्या नरेंद्र मोदी स्टेडियमवर (Narendra modi Stadium) सामना सुरु आहे. राजस्थानचा कॅप्टन संजू सॅमसनने टॉस जिंकून पहिली गोलंदाजी करण्याचा निर्णय घेतला. त्यामुळे RCB ची पहिली फलंदाजी सुरु आहे. सलामीवीर विराट कोहली आज स्वस्तात बाद झाला. विराट कोहलीने पहिल्याच ओव्हरमध्ये बोल्टच्या चेंडूवर षटकार मारला. पण दुसऱ्याच षटकात तो स्वस्तात आऊट झाला. प्रसिद्ध कृष्णाने त्याला सात धावांवर विकेटकीपर संजू सॅमसनकरवी (Sanju Samson) झेलबाद केलं. त्यानंतर मागच्या सामन्यातील शतकवीर रजत पाटीदार फलंदाजीसाठी मैदानात आला. विराट बाद झाल्यानंतर पाटीदार आणि कॅप्टन फाफ डू प्लेसिसने डाव सावरला.
रजत पाटीदारने प्रसिद्ध कृष्णाला कव्हर्समध्ये लागोपाठ दोन क्लासिक चौकार मारले, ते इथे क्लिक करुन बघा
रियान परागने पाटीदारला जीवदान दिलं
पावरप्लेच्या सहा षटकात RCB च्या एक बाद 46 धावा झाल्या आहेत. प्रसिद्ध कृष्णाने सहावी ओव्हर टाकली. या षटकात पाटीदारने कव्हर्समध्ये दोन सुंदर चौकार मारले. पण या ओव्हरमध्ये रियान परागने पाटीदारला जीवदान दिलं. रियान परागने पाटीदारचा सोपा झेल सोडला. खरंतर रियान पराग या सीजनमध्ये आपल्या वर्तनामुळे जास्त चर्चेत राहिला आहे. सोशल मीडियावर त्याला मोठ्या प्रमाणात ट्रोल करण्यात आलं आहे. क्वालिफायर 1 च्या सामन्यात त्याने अश्विन बरोबर वाद घातला होता.
The only reason rr are playing Riyan Parag is his fielding and he bottled in that field also#RCBvRR pic.twitter.com/SEgqFZL927
— frozen? (@ein_scofield) May 27, 2022
काय झालं होतं या सामन्यात
गुजरात टायटन्स विरुद्ध राजस्थानच्या डावाचा शेवट खूप विचित्र झाला होता. शेवटचा चेंडू टाकण्याआधी दोन रनआऊट झाले. आधी जोस बटलर रनआऊट झाला. त्यानंतर रियान पराग. शेवटच्या चेंडूआधी ड्रामा पहायला मिळाला. रियान पराग रनआऊट झाल्यानंतर अश्विनवर वैतागला. आपल्या रनआऊट होण्याला अश्विन जबाबदार आहे, असं त्याचं म्हणणं होतं. रियान परागची ही कृती अनेकांना आवडलेली नव्हती.
Karma always gets you, Riyan Parag ?#RCBvRR pic.twitter.com/JjGGMLGaHJ
— Utsav (@utsav__45) May 27, 2022
काहींनी रियान परागला मूर्ख म्हटलं
त्याआधी लखनौ सुपर जायंट्स विरुद्धच्या सामन्यात प्रसिद्ध कृष्णाने मार्कस स्टॉयनिसला चेंडू टाकला. स्टॉयनिसने फटका खेळल्यानंतर चेंडू हवेत उंच उडाला. रियान परागने झेल घेण्यात कुठलीही चूक केली नाही. पण त्यानंतर मनातला राग दाखवण्यासाठी त्याने चेंडू मैदानावर घासला, त्यावरुन सर्व वाद निर्माण झाला. सोशल मीडियाने रियान परागच्या या कृतीचा खास समाचार घेतला. काहींनी रियान परागला मूर्ख म्हटलं. काहींनी त्याला आयपीएलमधून हटवण्याची मागणी केली.