RR vs RCB ipl 2023 High lights | रॉयल चॅलेंजर्स बँगलोरने राजस्थानचा उडवला धुव्वा

| Updated on: May 14, 2023 | 6:49 PM

RR vs RCB ipl 2023 live score In Marathi | आयपीएल 16 व्या मोसमातील 60 व्या सामन्यात राजस्थान रॉयल्स आणि रॉयल चॅलेंजर्स बँगलोर या दोन टीम्स आमने-सामने आहेत.

RR vs RCB  ipl 2023 High lights | रॉयल चॅलेंजर्स बँगलोरने राजस्थानचा उडवला धुव्वा
RR vs RCB IPL 2023

जयपूर : इंडियन प्रीमियर लीग स्पर्धा आता अंतिम टप्प्यात आली आहे. प्लेऑफमध्ये दाखल होण्यासाठी प्रत्येक टीमचा संघर्ष सुरु आहे. आता प्रत्येक मॅच ‘करो या मरो’ आहे. आयपीएल टुर्नामेंट निर्णायक टप्प्यावर आहे. कुठल्याही टीमला पराभव परडवणारा नाहीय. पॉइंट्स टेबलमध्ये पहिल्या चार स्थानांसाठी स्पर्धा आहे. आज IPL 2023 मध्ये राजस्थान रॉयल्स आणि रॉयल्स चॅलेंजर्स बँगलोरमध्ये सामना झाला. आयपीयएलमधील हा 60 सामना होता.

प्लेऑफचा विचार करता, दोन्ही टीम्ससाठी हा सामना खूप महत्वाच होता. RCB ने ही मॅच 112 धावांनी जिंकली आहे. आरसीबीच्या 172 धावांच्या लक्ष्याचा पाठलाग करताना राजस्थाची टीम 59 रन्सवर ऑलआऊट झाली. आयपीएलच्या इतिहासातील राजस्थान टीमने नोंदवलेली ही तिसरी नीचांकी टोटल आहे.

LIVE NEWS & UPDATES

The liveblog has ended.
  • 14 May 2023 06:24 PM (IST)

    RR vs RCB Live Score : RCB चा राजस्थानवर मोठा विजय

    रॉयल चॅलेंजर्स बँगोलरने राजस्थान रॉयल्सचा धुव्वा उडवला आहे. RCB ने ही मॅच 112 धावांनी जिंकली आहे. आरसीबीच्या 172 धावांच्या लक्ष्याचा पाठलाग करताना राजस्थाची टीम 59 रन्सवर ऑलआऊट झाली.

  • 14 May 2023 06:20 PM (IST)

    RR vs RCB Live Score : फटकेबाजी करणारा हेटमायर OUT

    फटकेबाजी करणारा हेटमायर आऊट झाला आहे. त्याने 19 चेंडूत 35 धावा करताना 1 फोर आणि 4 सिक्स मारले. मॅक्सवेलच्या गोलंदाजीवर ब्रेसवेलने हेटमायरची कॅच पकडली. 10 ओव्हर अखेरीस राजस्थानच्या 8 बाद 59 धावा झाल्या आहेत.

  • 14 May 2023 06:10 PM (IST)

    RR vs RCB Live Score : शिमरॉन हेटमायरचे 3 बॉल 3 सिक्स

    करण शर्माने 8 वी ओव्हर टाकली. त्याच्या ओव्हरमध्ये शिमरॉ़न हेटमायरने 3 बॉलमध्ये 3 सिक्स मारले. त्यामुळे राजस्थानची धावसंख्या 50 पर्यंत पोहोचली. पण याच ओव्हरमध्ये आर. अश्विन रनआऊट झाला. अश्विन शुन्यावर तंबूत परतला. 8 ओव्हर अखेरीस राजस्थानच्या 7 बाद 50 धावा झाल्या आहेत.

  • 14 May 2023 06:03 PM (IST)

    RR vs RCB Live Score : राजस्थानची सहावी विकेट

    RCB ने राजस्थानला सहावा धक्का दिला आहे. ब्रेसवेलच्या गोलंदाजीवर ध्रुवर जुरेल 1 रन्सवर आऊट झाला. 7 ओव्हर अखेरीस राजस्थानची 6 बाद 31 स्थिती आहे.

  • 14 May 2023 05:59 PM (IST)

    RR vs RCB Live Score : राजस्थानचा निम्मा संघ तंबूत

    RCB ने राजस्थानला पाचवा धक्का दिला आहे. वेन पार्नेलने ज्यो रुटला LBW बाद केलं. रुटने 15 चेंडूत 10 धावा करताना एक चौकार लगावला. पावरप्लेमध्ये राजस्थानची वाट लागली आहे. 6 ओव्हर अखेरीस राजस्थानच्या 5 बाद 28 धावा झाल्या आहेत. वेन पार्नेल भन्नाट बॉलिंग करतोय. त्याने 3 ओव्ह्रर्समध्ये 10 धावा देताना 3 विकेट काढल्या आहेत. मोहम्मद सिराज, ब्रेसवेलने प्रत्येकी एक विकेट काढली.

  • 14 May 2023 05:51 PM (IST)

    RR vs RCB Live Score : राजस्थानला चौथा धक्का

    RCB ने राजस्थानला चौथा धक्का दिला आहे. देवदत्त पडिक्कल ब्रेसवेलच्या बॉलिंगवर मोहम्मद सिराजकरवी कॅचआऊट झाला. त्याने 4 चेंडूत 4 रन्स केले. 4.2 ओव्हर्समध्ये राजस्थानच्या 4 बाद 20 धावा झाल्या आहेत.

  • 14 May 2023 05:36 PM (IST)

    RR vs RCB Live Score : राजस्थानची हालत खराब

    आधी यशस्वी जैस्वाल, त्यानंतर जोस बटलर आणि आता कॅप्टन संजू सॅमसन आऊट झाला आहे. पार्नेलच्या बॉलिंगवर सॅमसनची विकेटकीपर अनुज रावतने कॅच घेतली. संजूने 5 चेंडूत 4 धावा करताना एक चौकार लगावला. राजस्थानने 2 ओव्हरमध्ये 3 विकेट गमावल्या आहेत. 2 ओव्हर अखेरीस राजस्थानच्या 3 बाद 11 धावा झाल्या आहेत.

  • 14 May 2023 05:32 PM (IST)

    RR vs RCB Live Score : राजस्थान रॉयल्सला दुसरा झटका

    यशस्वी जैस्वाल पाठोपाठ राजस्थान रॉयल्सला दुसरा झटका बसला आहे. वेन पार्नेलने जोस बटलरला शुन्यावर आऊट केलं. बटलरला पार्नेलने मोहम्मद सिराजकरवी कॅचआऊट केलं. 1.2 ओव्हर्समध्ये राजस्थानची 2 बाद 6 धावा स्थिती आहे.

  • 14 May 2023 05:29 PM (IST)

    RR vs RCB Live Score : राजस्थान रॉयल्सला मोठा झटका

    राजस्थान रॉयल्सला मोठा झटका बसला आहे. यशस्वी जैस्वाल शुन्यावर OUT झाला आहे. मोहम्मद सिराजने त्याला कोहलीकरवी कॅच आऊट केलं. पहिल्या ओव्हर अखेरीस राजस्थानच्या 1 बाद 5 धावा झाल्या आहेत.

  • 14 May 2023 05:08 PM (IST)

    RR vs RCB Live Score : लास्ट ओव्हरमध्ये 6,6,4,

    20 ओव्हर अखेरीस RCB च्या 5 बाद 171 धावा झाल्या आहेत. रावतने 11 चेंडूत नाबाद (29) आणि ब्रेसवेलने 9 चेंडूत नाबाद (9) धावा केल्या. केएम असीफने लास्ट ओव्हर टाकली. रावतने शेवटच्या तीन चेंडूंवर 6,6,4 धावा वसूल केल्या. त्यामुळे RCB ची टीम 170 च्या पुढे गेली.

  • 14 May 2023 04:57 PM (IST)

    RR vs RCB Live Score : ग्लेन मॅक्सवेल OUT

    मोक्याच्या क्षणी राजस्थानला RCB ची मोठी विकेट मिळाली. हाफ सेंच्युरी झळकवून दमदार फलंदाजी करणाऱ्या ग्लेन मॅक्सवेलला संदीप शर्माने क्लाीन बोल्ड केलं. मॅक्सवेलने 33 चेंडूत 54 धावा केल्या. त्याने 5 फोर, 3 सिक्स मारले. 18 ओव्हर अखेरीस RCB च्या 5 बाद 143 धावा झाल्या आहेत.

  • 14 May 2023 04:47 PM (IST)

    RR vs RCB Live Score : RCB ची रांग लागली, चौथी विकेट

    आधी कॅप्टन फाफ डु प्लेसी, त्यानंतर महीपाल लोमरोर आणि आता दिनेश कार्तिक आऊट झालाय. कार्तिकला भोपळाही फोडता आला नाही. एडम झम्पाने 16 व्या ओव्हरमध्ये 2 विकेट घेऊन RCB ला बॅकफूटवर ढकललं. 16 ओव्हर्समध्ये RCB च्या 4 बाद 123 धावा झाल्या आहेत.

  • 14 May 2023 04:44 PM (IST)

    RR vs RCB Live Score : RCB ला तिसरा झटका

    महीपाल लोमरोरच्या रुपाने आरसीबीला तिसरा झटका बसलाय. अवघ्या 1 रन्सवर झम्पाच्या गोलंदाजीवर जुरेलकडे त्याने कॅच दिली. 15.2 ओव्हर्समध्ये RCB च्या 3 बाद 120 धावा झाल्या आहेत.

  • 14 May 2023 04:41 PM (IST)

    RR vs RCB Live Score : हाफ सेंच्युरीनंतर फाफ डु प्लेसी OUT

    हाफ सेंच्युरी झळकवल्यानंतर ओपनर फाफ डु प्लेसी OUT झाला. असीफच्या गोलंदाजीवर जैस्वालने त्याचा झेल घेतला. डु प्लेसीने 44 चेंडूत 55 धावा केल्या. यात 3 फोर आणि 2 सिक्स आहेत. 15 ओव्हर अखेरीस RCB च्या 2 बाद 120 धावा झाल्या आहेत. ग्लेन मॅक्सवेल 26 चेंडूत 41 रन्सवर खेळतोय. यात 4 फोर आणि 2 सिक्स आहेत.

  • 14 May 2023 04:15 PM (IST)

    RR vs RCB Live Score : 10 ओव्हर्सचा खेळ पूर्ण

    10 ओव्हर अखेरीस RCB च्या 1 बाद 78 धावा झाल्या आहेत. डु प्लेसी 30 चेंडूत (37) आणि मॅक्सवेल 11 चेंडूत (20) रन्सवर खेळतोय.

  • 14 May 2023 04:10 PM (IST)

    RR vs RCB Live Score : डुप्लेसी-मॅक्सवेलची जोडी मैदानात

    9 ओव्हर अखेरीस RCB च्या 1 बाद 71 धावा झाल्या आहेत. डु प्लेसी (35) आणि मॅक्सवेल (15) रन्सवर खेळतोय.

  • 14 May 2023 04:04 PM (IST)

    RR vs RCB Live Score : विराट कोहली आऊट

    RCB ची हाफ सेंच्युरी होताच विराट कोहली OUT झाला. केएम असिफच्या गोलंदाजीवर यशस्वी जैस्वालने त्याचा झेल घेतला. विराटने 19 चेंडूत 18 धावा करताना एक चौकार लगावला. विराटला आज राजस्थानच्या गोलंदाजांनी मुक्तपणे फलंदाजी करु दिली नाही. 8 ओव्हर अखेरीस RCB च्या 1 बाद 61 धावा झाल्या आहेत.

  • 14 May 2023 03:55 PM (IST)

    RR vs RCB Live Score : पावरप्ले समाप्त

    6 ओव्हर्सचा पावरप्ले संपला आहे. बँगलोरने बिनबाद 42 धावा केल्या आहेत. कॅप्टन फाफ डु प्लेसी (23) आणि विराट कोहली (17) धावांवर खेळतोय.

  • 14 May 2023 03:47 PM (IST)

    RR vs RCB Live Score : डु प्लेसी-विराटची सावध सुरुवात

    4 ओव्हर अखेरीस आरसीबीच्या बिनबाद 29 धावा झाल्या आहेत. कॅप्टन फाफ डु प्लेसी (16) आणि विराट कोहली (12) धावांवर खेळतोय.

  • 14 May 2023 03:43 PM (IST)

    RR vs RCB Live Score : 3 ओव्हर्सचा खेळ पूर्ण

    3 ओव्हर अखेरीस आरसीबीच्या बिनबाद 17 धावा झाल्या आहेत. कॅप्टन फाफ डु प्लेसी आणि विराट कोहलीची जोडी मैदानात आहे.

  • 14 May 2023 03:38 PM (IST)

    RR vs RCB Live Score : दुसऱ्याच ओव्हरमध्ये स्पिनरचा वापर

    राजस्थानचा कॅप्टन संजू सॅमसनने दुसऱ्याच ओव्हरमध्ये एडम झम्पा या स्पिनरला बॉलिंगसाठी आणलं. 2 ओव्हर अखेरीस RCB च्या बिनबाद 12 धावा झाल्या आहेत.

  • 14 May 2023 03:34 PM (IST)

    RR vs RCB Live Score : राजस्थान विरुद्ध बँगलोर सामन्याला सुरुवात

    राजस्थान विरुद्ध बँगलोर सामन्याला सुरुवात झाली आहे. विराट कोहली आणि डुप्लेसी ही बँगलोरची सलामीची जोडी मैदानात आहे. राजस्थानकडून संदीप शर्माने पहिली ओव्हर टाकली. RCB च्या बिनबाद 9 धावा झाल्या आहेत.

  • 14 May 2023 03:05 PM (IST)

    RR vs RCB Live Score : बँगलोरला महाविजयाची गरज

    राजस्थानचे 12 सामन्यात 12 पॉइंट्स आहेत. रॉयल चॅलेंजर्स बँगलोरचे 11 सामन्यात 10 पॉइंट्स आहेत. राजस्थानसाठी प्लस पॉइंट हा आहे की, त्यांचा रनरेट चांगला आहे. म्हणजे फक्त त्यांना जिंकायच आहे. तेच RCB ला फक्त विजय नकोय, तर महाविजयाची गरज आहे. म्हणजेच त्यांना रनरेटचा विचार करावा लागेल.

  • 14 May 2023 03:03 PM (IST)

    RR vs RCB Live Score : रॉयल चॅलेंजर्स बँगलोरने जिंकला टॉस

    रॉयल चॅलेंजर्स बँगलोरचा कॅप्टन फाफ डु प्लेसीने टॉस जिंकून पहिली बॅटिंग करण्याचा निर्णय घेतला आहे. राजस्थान रॉयल्सची टीम गोलंदाजी करणार आहे.

  • 14 May 2023 02:52 PM (IST)

    RR vs RCB Live Score : आज RCB ला इतिहासाची पुनरावृत्ती करावी लागेल

    जयपूरमध्ये रॉयल चॅलेंजर्स बँगलोरने राजस्थान रॉयल्सला 2012 मध्ये शेवटच हरवलं होतं. IPL 2023 मध्ये बँगलोरला त्याच कामगिरीची पुनरावृत्ती करावी लागेल.

  • 14 May 2023 02:50 PM (IST)

    RR vs RCB Live Score : राजस्थान विरुद्ध आरसीबी कोणाची बाजू वरचढ?

    राजस्थान आणि बँगलोरच्या टीममध्ये याआधी 29 सामने झाले आहेत. बँगलोरची टीम 14 वेळा अजिंक्य ठरली आहे. राजस्थान 12 वेळा जिंकली आहे. मागच्या 5 सामन्यांचा विचार केल्यास 3-2 ने RCB ची बाजू वरचढ आहे.

Published On - May 14,2023 2:47 PM

Follow us
देवेंद्रजी पर्यटन म्हणून तरी बीडला जा, अंजली दमानिया यांचे आवाहन
देवेंद्रजी पर्यटन म्हणून तरी बीडला जा, अंजली दमानिया यांचे आवाहन.
सदावर्तेंमुळे एसटी बँकेचे वाटोळे, कर्मचाऱ्यांचे या तारखेला आंदोलन
सदावर्तेंमुळे एसटी बँकेचे वाटोळे, कर्मचाऱ्यांचे या तारखेला आंदोलन.
सोलापूरात कृषी उत्पन्न बाजार समितीत लसणाचे दर काय ? पाहा
सोलापूरात कृषी उत्पन्न बाजार समितीत लसणाचे दर काय ? पाहा.
विनोद कांबळी याच्या उपचाराची जबाबदारी आमची, काय म्हणाले परिवहनमंत्री?
विनोद कांबळी याच्या उपचाराची जबाबदारी आमची, काय म्हणाले परिवहनमंत्री?.
Beed चा खरा तपास करायचा आहे, तर या लोकांचे CDR काढा, खासदाराची मागणी
Beed चा खरा तपास करायचा आहे, तर या लोकांचे CDR काढा, खासदाराची मागणी.
मला या जिल्ह्याचं पालकमंत्री व्हायला आवडेल,काय म्हणाले देवेंद फडणवीस ?
मला या जिल्ह्याचं पालकमंत्री व्हायला आवडेल,काय म्हणाले देवेंद फडणवीस ?.
'विरोधकांनी बीडमध्ये जरुर जावे, पण...,' काय म्हणाले देवेंद्र फडणवीस
'विरोधकांनी बीडमध्ये जरुर जावे, पण...,' काय म्हणाले देवेंद्र फडणवीस.
एका कार्डवर शेतकऱ्यांची सर्व कामं; काय आहे Farmer Digital ID?
एका कार्डवर शेतकऱ्यांची सर्व कामं; काय आहे Farmer Digital ID?.
पूजा खेडकरचा जामीन अर्ज दिल्ली हायकोर्टाने फेटाळला
पूजा खेडकरचा जामीन अर्ज दिल्ली हायकोर्टाने फेटाळला.
संतोष देशमुखांना टॉर्चर करून करून मारलं - बजरंग सोनावणे
संतोष देशमुखांना टॉर्चर करून करून मारलं - बजरंग सोनावणे.