RR vs SRH IPL 2023 : राजस्थान रॉयल्स टीममधून आज जागतिक क्रिकेटमधील मोठा खेळाडू डेब्यु करणार?

RR vs SRH IPL 2023 : डेब्यु करणाऱ्या प्लेयरच्या जागी दुसरा मोठा खेळाडू जोस बटलरचा पत्ता कट होऊ शकतो. रियान परागला सुद्धा बाहेर बसवलं जाऊ शकतं. कारण राजस्थान रॉयल्सला आता विजय आवश्यक आहे.

RR vs SRH IPL 2023 : राजस्थान रॉयल्स टीममधून आज जागतिक क्रिकेटमधील मोठा खेळाडू डेब्यु करणार?
IPL 2023 RR : कोट्यवधींना घेतलं तरी अजून किती दिवस सहन करणार? संजू सॅमसन या खेळाडूला दाखवणार जागा!Image Credit source: BCCI/IPL
Follow us
| Updated on: May 07, 2023 | 3:16 PM

जयपूर : संजू सॅमसनच्या राजस्थान रॉयल्सचा एडन मार्करामच्या सनरायजर्स हैदराबाद विरुद्ध सामना होणार आहे. आयपीएलमधील हा 52 वा सामना आहे. रविवारी दुसरा सामना राजस्थान आणि हैदराबादमध्ये होईल. जयपूरच्या सवाई मानसिंह स्टेडियममध्ये ही मॅच होईल. 10 पॉइंट्ससह राजस्थानची टीम चौथ्या स्थानावर आहे. सलग दोन सामने गमावल्यानंतर आजची मॅच जिंकून पुन्हा विजयी मार्गावर परतण्याचा राजस्थानचा प्रयत्न असेल.

आयपीएलमधील प्लेऑफचा मार्ग सोपा करण्यासाठी राजस्थानला हैदराबाद विरुद्ध सामना जिंकावा लागेल. चालू आयपीएल सीजनमध्ये राजस्थान रॉयल्सकडे एक संतुलित संघ आहे. मधल्या फळीतील फलंदाजांच्या खराब कामगिरीचा राजस्थान टीमला मागच्या दोन सामन्यात फटका बसलाय.

बटलरला काय झालय?

जोस बटलर हा राजस्थानचा मुख्य खेळाडू आहे. मागच्या सहा सामन्यात तो दोनवेळा डकवर आऊट झालाय. राजस्थानची टीम बटलरला एक-दोन सामन्यांसाठी ब्रेक देऊ शकते. मागच्या सीजनमध्ये जोस बटलरला सर्वाधिक धावांसाठी दिली जाणारी ऑरेंज कॅप मिळाली होती. जोस बटलरला विश्रांती दिली, तर त्याच्याजागी इंग्लंडच्याच ज्यो रुटला आयपीएल डेब्युची संधी मिळू शकते.

मोठ्या खेळाडूला डेब्युची संधी

ज्यो रुट एक महान खेळाडू आहे. क्लासिकल बॅट्समनमध्ये त्याची गणना होते. तो रविवारी राजस्थान रॉयल्सकडून डेब्यु करु शकतो. प्लेऑफची शर्यत जिंकण्यासाठी राजस्थान रॉयल्सला सनरायजर्स हैदराबाद विरुद्ध विजय आवश्यक आहे.

रियान परागचा पत्ता कट?

चालू सीजनमध्ये राजस्थान रॉयल्सने चांगली सुरुवात केली होती. पण मागच्या काही सामन्यातील पराभवामुळे टीमची घडी विस्कटली आहे, असं वाटतय. आसामच्या रियान परागचा सुद्धा टीममधून पत्ता कट होऊ शकतो. आयपीएल 2023 मध्ये 6 सामन्यात त्याने फक्त 58 धावा केल्या आहेत. राजस्थानची संभाव्य प्लेइंग 11

यशस्वी जैस्वाल, देवदत्त पडिक्कल, संजू सॅमसन (कॅप्टन), ज्यो रुट/जोस बटलर, शिमरॉन हेटमायर, ध्रुव झुरेल, आर. अश्विन, ट्रेन्ट बोल्ट, संदीप शर्मा, एडम झम्पा/ओबेड मेकॉय, युजवेंद्र चहल,

खातेवाटपानंतर मंत्र्यांना बंगल्यांचे वाटप, बघा कोणाला कोणता बंगला?
खातेवाटपानंतर मंत्र्यांना बंगल्यांचे वाटप, बघा कोणाला कोणता बंगला?.
...म्हणून सोमनाथ सूर्यवंशीची हत्या, राहुल गांधींचा मोठा आरोप काय?
...म्हणून सोमनाथ सूर्यवंशीची हत्या, राहुल गांधींचा मोठा आरोप काय?.
'साहेब म्हणतील ते तोरण अन् साहेब...', भुजबळांच्या समर्थनार्थ बॅनर
'साहेब म्हणतील ते तोरण अन् साहेब...', भुजबळांच्या समर्थनार्थ बॅनर.
म्हणून भुजबळ फडणवीसांकडे गेले? भाजपच्या बड्या नेत्यानं स्पष्टच सांगितल
म्हणून भुजबळ फडणवीसांकडे गेले? भाजपच्या बड्या नेत्यानं स्पष्टच सांगितल.
काँग्रेसच्या बड्या नेत्यानं काढली अशोक चव्हाण यांची लायकी, काय म्हणाले
काँग्रेसच्या बड्या नेत्यानं काढली अशोक चव्हाण यांची लायकी, काय म्हणाले.
भुजबळांच्या नाराजीवर अखेर अजित पवार बोलले, 8 दिवसांनी घेतली दखल अन्...
भुजबळांच्या नाराजीवर अखेर अजित पवार बोलले, 8 दिवसांनी घेतली दखल अन्....
दादांना सोडून भाजपमध्ये जाणार? फडणवीसांच्या भेटीनंतर भुजबळांचे खुलासे
दादांना सोडून भाजपमध्ये जाणार? फडणवीसांच्या भेटीनंतर भुजबळांचे खुलासे.
सनी लिओनी घेतेय सरकारी योजनेचा लाभ, दर महिन्याला खात्यात 'इतके' रूपये
सनी लिओनी घेतेय सरकारी योजनेचा लाभ, दर महिन्याला खात्यात 'इतके' रूपये.
लाथा-बुक्के अन् दगडानं मारहाण, भाजपच्या ज्येष्ठ नेत्यावर जीवघेणा हल्ला
लाथा-बुक्के अन् दगडानं मारहाण, भाजपच्या ज्येष्ठ नेत्यावर जीवघेणा हल्ला.
सबसे कातील गौतमी पाटील नव्या वर्षात चाहत्यांना देणार मोठं सरप्राईज
सबसे कातील गौतमी पाटील नव्या वर्षात चाहत्यांना देणार मोठं सरप्राईज.