Team India: टीम इंडियामुळे बांग्लादेश क्रिकेटमध्ये घडली मोठी घडामोड
बांग्लादेश क्रिकेट बोर्डाने एक मोठा निर्णय घेतला आहे. त्यामुळे एका व्यक्तीला आपली नोकरी गमवावी लागलीय.
ढाका: नुकताच टीम इंडियाचा बांग्लादेश दौरा आटोपला. बांग्लादेश दौऱ्यात टीम इंडियाने तीन वनडे आणि दोन कसोटी सामने खेळले. वनडे सीरीजमध्ये टीम इंडियाचा पराभव झाला. पण टेस्ट सीरीजमध्ये टीम इंडियाने 2-0 असा विजय मिळवला. टीम इंडियाच्या या प्रदर्शनाची किंमत बांग्लादेशचे कोच रसेल डोमिंगो यांना चुकवावी लागलीय. डोमिंगो यांना बांग्लादेशच्या कोचपदाचा राजीनामा द्यावा लागला. टीम इंडियाने टेस्ट सीरीजमध्ये मिळवलेल्या विजयामुळे डोमिंगो यांना पद सोडाव लागलय.
कधीपर्यंत होता कार्यकाळ?
रसेल डोमिंगो यांनी सप्टेंबर 2019 मध्ये बांग्लादेशच्या हेड कोच पदाची जबाबदारी संभाळली. त्यांच्याआधी स्टीव रोड्स बांग्लादेशचे हेड कोच होते. बांग्लादेशी टीमसोबत डोमिंगो यांचा कार्यकाळ 2023 वनडे वर्ल्ड कपपर्यंत होता. पण त्याआधीच त्यांना राजीनामा द्यावा लागलाय.
बांग्लादेशने काय यश मिळवलं?
डोमिंगो यांनी काल राजीनामा दिला. त्यांचा राजीनामा तात्काळ प्रभावाने स्वीकारण्यात आलाय, असं बांग्लादेश क्रिकेट बोर्डाचे प्रमुख जलाल युनूस यांनी सांगितलं. डोमिंगो यांच्या कार्यकाळात बांग्लादेशच्या टीमने ऑस्ट्रेलिया आणि न्यूझीलंड विरुद्ध टी 20 सीरीज जिंकल्या. न्यूझीलंडमध्ये पहिला कसोटी सामना जिंकणं, ही डोमिंगो यांच्या कार्यकाळातील मोठी कामगिरी आहे. त्याशिवाय दक्षिण आफ्रिका आणि भारताविरुद्ध वनडे मालिका जिंकल्या.
भारताविरुद्ध टेस्ट सीरीज गमावल्याचा परिणाम
डोमिंगो यांनी तडकाफडकी राजीनामा का दिला? त्यामागे काय कारणं आहेत? त्यांचा कार्यकाळ बाकी होता. टीम इंडियाकडून झालेला पराभव हे डोमिंगो यांच्या राजीनाम्यामागे मुख्य कारणं आहे.
टीम इंडियाने बांग्लादेशला त्यांच्याच देशात टेस्ट सीरीजमध्ये 2-0 ने हरवलं. टीम इंडियाने बांग्लादेश विरुद्ध पहिला कसोटी सामना 188 धावांनी जिंकला. दुसऱ्या कसोटी सामन्यात 3 विकेटने विजय मिळवला. याच निकालामुळे रसेल डोमिंगो यांना आपल्या पदाचा राजीनामा द्यावा लागला.