Vijay Hazare ट्रॉफीच्या फायनलमध्येही Ruturaj Gaikwad चा जलवा, पुन्हा करुन दाखवली मोठी कामगिरी
महाराष्ट्राच्या टीमने फायनलमध्ये किती धावा केल्या?
नवी दिल्ली: Vijay Hazare Trophy टुर्नामेंटमध्ये महाराष्ट्राची सर्वाधिक भिस्त आहे, ती ऋतुराज गायकवाडवर. ही टीम फायनलमध्ये पोहोचलीय, त्यात ऋतुराज गायकवाडचा रोल महत्त्वाचा आहे. त्याचा फॉर्म महाराष्ट्रासाठी महत्त्वाचा आहे. आज सौराष्ट्राविरुद्ध फायनल मॅचमध्येही ऋतुराजचा तोच अंदाज पहायला मिळाला. ऋतुराजने विजय हजारे ट्रॉफीच्या फायनलमध्ये महाराष्ट्राकडून शतक ठोकलं. या टुर्नामेंटमधील मागच्या 5 इनिंग्समधील त्याने झळकावलेलं सलग तिसरं शतक आहे. या टुर्नामेंटमध्ये ऋतुराज गायकवाड भन्नाट फॉर्ममध्ये आहे.
महाराष्ट्राची धीमी सुरुवात
सौराष्ट्रची टीम तिसऱ्यांदा विजय हजारे ट्रॉफीच्या फायनलमध्ये खेळत आहे. त्यांच्याविरुद्ध महाराष्ट्राने पहिली बॅटिंग केली. महाराष्ट्राला आज अपेक्षित सुरुवात मिळाली नाही. 8 रन्सवर पहिला विकेट गेला. त्यानंतर दुसऱ्या विकेटसाठी अर्धशतकी भागीदारी झाली. तिसरा विकेट लवकर पडला. महाराष्ट्राच्या टीमची धीमी सुरुवात झाली. 32 ओव्हरपर्यंत 3 विकेट गमावून फक्त 105 धावा झाल्या होत्या.
चेंडूवर एकदा नजर बसली, आणि मग….
महाराष्ट्राची धीमी सुरुवात म्हणजे ऋतुराजच्या बॅटमधूनही तितक्या वेगाने धावा बनत नव्हत्या. पण चेंडूवर नजर बसल्यानंतर ऋतुराजने चेंडू आणि धावांमधील अंतर वेगाने कमी केलं. ऋतुराजने आपल्या शतकाची स्क्रिप्ट लिहिली. स्पर्धेतील मागच्या 5 इनिंगमधील त्याच हे चौथं शतक आहे.
मोठया मॅचचा खेळाडू
याआधी ऋतुराजने आसाम विरुद्ध सेमीफायनल मॅचमध्ये 168 आणि यूपी विरुद्ध क्वार्टर फायनलमध्ये नाबाद 220 धावा चोपल्या होत्या. यातून तो मोठ्या मॅचमध्ये कसा खेळतो, ते दिसून येतं. तो सहजतेने दबाव हाताळू शकतो.
महाराष्ट्राच्या टीमने फायनलमध्ये किती धावा केल्या?
विजय हजारे ट्रॉफीच्या फायनलमध्ये ऋतुराजने 131 चेंडूत 108 धावा केल्या. यात 7 चौकार आणि 4 षटकार आहेत. महाराष्ट्राच्या टीमने निर्धारित 50 ओव्हर्समध्ये 9 बाद 248 धावा केल्या आहेत. सौराष्ट्राच्या टीमला विजयासाठी 249 धावांचे लक्ष्य दिले आहे.