Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

IND vs NZ 3rd ODI : वनडे सीरीज जिंकली, टीम इंडियासाठी वाईट बातमी, हार्दिक पंड्याच टेन्शन वाढलं

IND vs NZ 3rd ODI : या सीरीजमधील तिसरा वनडे सामना सुरु असताना, टीम इंडियासाठी एक वाईट बातमी आली. वनडे सीरीजनंतर टीम इंडियाला न्यूझीलंड विरुद्ध T20 सीरीज खेळायची आहे.

IND vs NZ 3rd ODI : वनडे सीरीज जिंकली, टीम इंडियासाठी वाईट बातमी, हार्दिक पंड्याच टेन्शन वाढलं
Rahul Dravid-Hardik pandyaImage Credit source: Getty
Follow us
| Updated on: Jan 25, 2023 | 8:25 AM

इंदोर – टीम इंडियाने न्यूझीलंड विरुद्ध वनडे सीरीज जिंकलीय. मालिकेत 3-0 असं क्लीन स्वीप केलं. तिसऱ्या वनडेत टीम इंडियाने 90 धावांनी विजय मिळवला. या सीरीजमधील तिसरा वनडे सामना सुरु असताना, टीम इंडियासाठी एक वाईट बातमी आली. वनडे सीरीजनंतर टीम इंडियाला न्यूझीलंड विरुद्ध T20 सीरीज खेळायची आहे. हार्दिक पंड्या या सीरीजमध्ये टीम इंडियाच नेतृत्व करणार आहे. पण सीरीज सुरु होण्याआधीच ऋतुराज गायकवाडच्या बातमीने हार्दिक पंड्याच टेन्शन वाढवलय.

‘या’ प्रमुख खेळाडूच्या मनगटाला दुखापत

ऋतुराज गायकवाड T20 टीमचा भाग आहे. पण तो पूर्णपणे फिट नाहीय. इंडियन एक्स्प्रेसच्या वृत्तानुसार, ऋतुराज गायकवाड मनगटाच्या दुखापतीचा सामना करतोय. त्याला नॅशनल क्रिकेट अकादमीत पाठवण्यात आलय. हैदराबाद विरुद्ध रणजी सामन्यात त्याने फक्त 8 धावा केल्या. त्यानंतर शुन्यावर बाद झाला. महाराष्ट्राच्या या बॅट्समनने बीसीसीआयच्या मेडिकल टीमला माहिती दिलीय. बॅटिंग करताना त्याच्या मनगटात दुखापत असल्याच सांगितलय. तपास आणि उपचारांसाठी त्याला एनसीएमध्ये पाठवण्यात आलय.

पृथ्वी शॉ साठी दरवाजे उघडू शकतात

न्यूझीलंड विरुद्ध तीन T20 सामन्यांच्या सीरीजला 27 जानेवारीपासून सुरुवात होणार आहे. ऋतुराज गायकवाड अनफिट असेल, तर पृथ्वी शॉ ला संधी मिळू शकते. तो न्यूझीलंड विरुद्ध सलामीला येईल. पृथ्वीला या सीरीजसाठी टीम इंडियात संधी मिळालीय. पृथ्वी शॉ याआधी 2021 मध्ये श्रीलंका दौऱ्यावर टीम इंडियाकडून शेवटचा सामना खेळला होता. भारताचा मीडल ऑर्डरमधील फलंदाज श्रेयस अय्यर आधीपासूनच एनसीएमध्ये आहे. पाठीच्या दुखापतीमुळे न्यूझीलंड विरुद्ध वनडे सीरीज तो खेळू शकला नाही. ऑस्ट्रेलिया विरुद्धच्या 4 कसोटी सामन्यांच्या मालिकेतील पहिल्या दोन टेस्टसाठी श्रेयसची निवड झालीय. जबरदस्त फॉर्ममध्ये आहे गायकवाड

ऋतुराज गायकवाड हैदराबाद विरुद्ध चालला नाही. पण सध्या तो जबरदस्त फॉर्ममध्ये आहे. तामिळनाडू विरुद्ध 195 धावांची तो मोठी इनिंग खेळला. त्याआधी आंध्र प्रदेश आणि सौराष्ट्राविरुद्ध अर्धशतकी खेळी केली होती. मागच्या 10 मॅचेसमध्ये ऋतुराज गायकवाडने 5 सेंच्युरी आणि 2 अर्धशतकं झळकवली आहेत. यात एका द्विशतकाचा समावेश आहे.

महाराष्ट्रासह मुंबईकरांसाठी मोठी बातमी, पुढील 4 ते 5 दिवस राज्यात...
महाराष्ट्रासह मुंबईकरांसाठी मोठी बातमी, पुढील 4 ते 5 दिवस राज्यात....
'कुत्रे अन् मांजरांवरून..', वाघ्या कुत्र्याच्या वादावर जरांगेंचं भाष्य
'कुत्रे अन् मांजरांवरून..', वाघ्या कुत्र्याच्या वादावर जरांगेंचं भाष्य.
प्रत्येक गोष्टीत वाद..., वाघ्या समाधीच्या वादावरून मुख्यमंत्री संतापले
प्रत्येक गोष्टीत वाद..., वाघ्या समाधीच्या वादावरून मुख्यमंत्री संतापले.
'... तर मुंडेंची आमदारकी रद्द होणार', अजंली दमानियांचं मोठं वक्तव्य
'... तर मुंडेंची आमदारकी रद्द होणार', अजंली दमानियांचं मोठं वक्तव्य.
'मुलं मुंडेंची बायको नाही, अस कसं..', करूणा शर्मांची पहिली प्रतिक्रिया
'मुलं मुंडेंची बायको नाही, अस कसं..', करूणा शर्मांची पहिली प्रतिक्रिया.
करूणा शर्मांच्या याचिकेवर मुंडेंचे वकील म्हणाले, लग्न झालच नाही तर...
करूणा शर्मांच्या याचिकेवर मुंडेंचे वकील म्हणाले, लग्न झालच नाही तर....
सालियन प्रकरणातील मोठी बातमी, दिशा खाली पडली तेव्हा तिच्या शरिरावर....
सालियन प्रकरणातील मोठी बातमी, दिशा खाली पडली तेव्हा तिच्या शरिरावर.....
त्यांनी घरात कबर बनवा, औरंगजेबाच्या कबरीवरून धीरेंद्र शास्त्रींचं मत
त्यांनी घरात कबर बनवा, औरंगजेबाच्या कबरीवरून धीरेंद्र शास्त्रींचं मत.
लाडक्या बहिणींना 2100 कधी मिळणार? महायुतीच्या नेत्यानं वर्षच सांगितलं
लाडक्या बहिणींना 2100 कधी मिळणार? महायुतीच्या नेत्यानं वर्षच सांगितलं.
'सगळं लपवण्याचा प्रयत्न...', आरोपींच्या कबुलीनंतर दमानियांकडून सवाल
'सगळं लपवण्याचा प्रयत्न...', आरोपींच्या कबुलीनंतर दमानियांकडून सवाल.