पुण्याच्या ऋतुराज गायकवाडने उघड केलं MS Dhoni ने सांगितलेलं सिक्रेट
काय होतं ते सिक्रेट? ऋतुराजच्या डेब्युच्यावेळी धोनी त्याला एकच गोष्ट म्हणाला होता....
मुंबई: टीम इंडियाकडे आज अनेक टँलेटेड खेळाडू आहेत. त्यापैकीच एक आहे ऋतुराज गायकवाड. मूळचा पुण्याच्या असलेल्या ऋतुराज गायकवाडने आयपीएलमधून स्वत:ची ओळख बनवली. ऋतुराजकडे टी 20 चा स्पेशलिस्ट क्रिकेटपटू म्हणून पाहिलं जातं. त्याला टी 20 क्रिकेटमध्ये टीम इंडियाकडून आतापर्यंत अनेक संधी मिळाल्या आहेत. पण ऋतुराजला अपेक्षित प्रभाव पाडता आलेला नाही. पण पुण्याच्या या युवा खेळाडूकडून भरपूर अपेक्षा आहेत.
सिक्रेट उघड केलं
याच ऋतुराज गायकवाडने धोनीने सांगितलेलं सिक्रेट उघड केलय. ऋतुराज गायकवाडने आयपीएलमध्ये डेब्यु केला, त्यावेळी धोनीने त्याला एक मोलाचा सल्ला दिला होता. ऋतुराज आयपीएलमधील लोकप्रिय फ्रेंचायजी चेन्नई सुपर किंग्जकडून खेळतो.
पहिल्या सीजनमध्ये ऋतुराजसाठी किती रक्कम मोजली?
2019 च्या आयपीएल लिलावात सीएसकेने ऋतुराजला 20 लाख रुपयांच्या बेस प्राइसमध्ये विकत घेतलं होतं. त्यानंतर पुढच्याच म्हणजे 2021 च्या सीजनमध्ये ऋतुराजने आपलं टॅलेंट दाखवून दिलं. त्याने 16 मॅचेसमध्ये 635 धावा फटकावल्या. 2022 च्या सीजनमध्ये फ्रेंचायजीने 6 कोटी रुपये मोजून त्याला रिटेन केलं.
धोनीचा विचार एकदम स्पष्ट होता
“मी आयपीएलमध्ये डेब्यु केला. त्यावेळी धोनीचा विचार एकदम स्पष्ट होता. त्याने मला खेळाचा आनंद घेण्याचा सल्ला दिला. सीएसकेच प्रतिनिधीत्व करणं ही खूप मोठी झेप आहे. अनेक महान खेळाडू या ड्रेसिंग रुमचा भाग राहिले आहेत. त्यामुळेच धोनीने मला त्या क्षणाचा आनंद घेण्याचा सल्ला दिला” सुपर किंग्ज अकादामीतील विद्यार्थ्यांशी संवाद कार्यक्रमात गायकवाडने ही गोष्ट सांगितली.
अजून काय सांगितलं ऋतुराजने
ऋतुराज गायकवाड मागच्या काही सीजनमध्ये सातत्यपूर्ण फलंदाजी करणारा सीएसकेचा ओपनर आहे. 2021 च्या सीजनमध्ये सर्वाधिक धावांसाठी तो ऑरेज कॅपचा मानकरी ठरला होता. “मी एका चांगल्या टीममध्ये आहे. त्याबद्दल मी आभार मानतो. सीएसकेमधील वातावरण खूपच चांगलं आहे. एमएस धोनी नेहमी आसपास असतो. त्याची मदत होते” असं ऋतुराजने सांगितलं.