Ruturaj Gaikwad: 5 षटकार, 14 चौकार, मराठमोळ्या ऋतुराज गायकवाडचा पुन्हा क्रिकेटमध्ये डंका, टीम इंडियाचं तिकीट मिळणार?

विजय हजारे करंडक क्रिकेट स्पर्धेत महाराष्ट्राचा हा सलग दुसरा विजय आहे. तर ऋतुराजनं दोन्ही सामन्यात शतक ठोकण्याचा पराक्रम केलाय. विशेष म्हणजे महाराष्ट्राचा कर्णधार म्हणून ट्रॉफिच्या आदल्या दिवशीच त्याच्या नावाची घोषणा केली होती.

Ruturaj Gaikwad: 5 षटकार, 14 चौकार, मराठमोळ्या ऋतुराज गायकवाडचा पुन्हा क्रिकेटमध्ये डंका, टीम इंडियाचं तिकीट मिळणार?
ऋतुराज गायकवाडने विजय हजारे ट्रॉफित सलग दोन सामन्यात शतक ठोकलंय
Follow us
| Updated on: Dec 10, 2021 | 1:10 PM

विजय हजारे ट्रॉफिचे (Vijay Hazare Trophy) सामने सुरु झालेत आणि गेल्या दोन दिवसात एकच नाव सगळीकडे आहे आणि ते आहे आपल्या मराठमोळ्या ऋतुराज गायकवाडचे. (Ruturaj Gaikwad) त्याला कारणही तसच आहे. पठ्ठ्यानं कामगिरीच अशी केलीय की टीम इंडियासाठी त्याची दावेदारी मजबूत होताना दिसतेय. ऋतुराजनं छत्तीसगडच्याविरोधात नाबाद दीडशतकी खेळी केलीय. तसच दोन दिवसात दोन शतकं लगावलीत. त्याच्या खेळीच्या जोरावरच महाराष्ट्रानं छत्तीसगडचा 8 गडी राखून दणदणीत पराभव केला. विजय हजारे करंडक क्रिकेट स्पर्धेत महाराष्ट्राचा हा सलग दुसरा विजय आहे. तर ऋतुराजनं दोन्ही सामन्यात शतक ठोकण्याचा पराक्रम केलाय. विशेष म्हणजे महाराष्ट्राचा कर्णधार म्हणून ट्रॉफिच्या आदल्या दिवशीच त्याच्या नावाची घोषणा केली होती. म्हणजे तीन दिवस गायकवाडाच्या पोराच्याच पराक्रमाची चर्चा आहे.

मध्यप्रदेशविरोधातही शतकी खेळी विजय हजारे करंडक स्पर्धेत मध्यप्रदेश विरुद्धचा मॅचही महाराष्ट्रानं जिंकला(Maharashtra Cricket Team). त्यातही ऋतुराजनं भारी कामगिरी केली. अवघ्या 85 बॉल्समध्ये शतक ठोकलं. यश नहारसोबत त्यानं या सामन्यातही 107 रन्सची शतकी भागिदारी पूर्ण केली. बिचारा यशचं मात्र एका रन्सनं अर्धशकत हुकलं. तो 55 बॉल्सवर 49 रन्स काढून आऊट झाला. ऋतुराजसाठी हा खरं तर डबलधमाका आहे. कारण कप्तान झाल्यानंतर लागोपाठच्या दोन सामन्यात त्यानं दोन शतकं ठोकलीयत.

छत्तीसगडनं 276 रन्सचं टार्गेट दिलं होतं. (Chhattisgarh Cricket Team) ते गायकवाडच्या महाराष्ट्रानं 47 ओव्हर्स आणि फक्त दोन विकेट गमावून पूर्ण केलं. त्यात ओपिनिंगला आलेल्या ऋतुराजनं 143 चेंडुत 5 उत्तुंग षटकार, 14 धमाकेदार चौकाराच्या मदतीनं 154 रन्सची नाबाद खेळी केली. यात त्याला खरी मदत मिळाली ती यश नहारची. कारण 22. 5 ओव्हर्समध्ये दोघांनी 120 रन्सची ओपिनिंग पार्टनरशिप केली. तिथच महाराष्ट्राच्या विजयाची पायाभरणी झाली. त्यानंतर यश हा शशांक चंद्राकरकडून यष्टिचित झाला. पण त्यानंतर आलेला नौशाद शेख महत्वाचा ठरला. त्यानेही ऋतुराजला साथ देत 37 रन्स ठोकल्या. ऋतुराज आणि नौशादची शतकी भागिदारी मात्र अवघ्या 4 रन्सने हुकली. दोघांची पार्टनरशिप 96 धावांची होती. त्यानंतर राहुल त्रिपाठी खेळायला आला. त्यानं 23 रन्स काढल्या. ऋतुराज आणि राहुलनं विजयी खेळी केली.

टॉस नेमका कोण जिंकणार याची उत्सुकता होतीच. तर नशीबानं छत्तीसगडला साथ दिली. टॉस जिंकल्यानंतर छत्तीसगडनं बॅटींग निवडली. त्यांनी 7 बाद 275 असा सन्मानजनक स्कोअर उभा केला. त्यात महाराष्ट्राकडून मुकेश चौधरीनं सर्वाधिक 4 बॅटसबन बाद केले. तर राहुल त्रिपाठीनं 2. तरणजितसिंह धिल्लोनला 1 विकेट घेता आली.

ऋतुराजचा चलता शिक्का आयपीएलमध्ये धमाकेदार खेळी करुन ऋतुराज (Ruturaj Gaikwad in IPL) चर्चेत आहे. त्याच्या त्याच कामगिरीच्या जोरावर धोनीच्या चेन्नई सुपरकिंग्जनं त्याला 6 कोटी रुपये देऊन रिटेन केलंय. आयपीएलमध्ये त्यानं 22 मॅचेसमध्ये 46 च्या सरासरीनं 839 रन्स खोऱ्यानं ओढल्यात. यात 1 शतक आणि 7 अर्धशतकांचा समावेश आहे. अर्थातच त्यानं पर्पल कॅप मिळवली होती हे वेगळं सांगायला नको.

हे सुद्धा वाचा:

Nagpur ZP | सरपंच भवनाजवळील लॉनवर खर्च केले लाखो रुपये; पण गेल्या दोन वर्षांत एकही बुकिंग नाही, कारण काय?

Pandu Movie | भाऊची कमाल कुशलची धमाल, ‘पांडू’ची वारी, हिंदीवर भारी, विकेंडला जमवला कोटींचा गल्ला!

Sugar Factory :अतिरीक्त साखरेवर आता इथेनॉल निर्मितीचा रामबाण पर्याय, देशातील इथेनॉल निर्मितीमध्ये महाराष्ट्राचा मोठा वाटा

भुजबळांची नाराजी,भाजप प्रवेशाचा गेमप्लॅन अन्... दमानिया काय म्हणाल्या?
भुजबळांची नाराजी,भाजप प्रवेशाचा गेमप्लॅन अन्... दमानिया काय म्हणाल्या?.
भिवंडी हादरली....निर्जनस्थळी अल्पवयीन मुलीची हत्या, मृतदेह आढळताच....
भिवंडी हादरली....निर्जनस्थळी अल्पवयीन मुलीची हत्या, मृतदेह आढळताच.....
नातवासोबत एकनाथ शिंदेंचा शेतात फेरफटका, शेतीकामात रमले अन्...
नातवासोबत एकनाथ शिंदेंचा शेतात फेरफटका, शेतीकामात रमले अन्....
शिरसाट मंत्री होताच अॅक्शनमोडवर,कॅमेऱ्यासमोरच महिला अधिकाऱ्यांना झापलं
शिरसाट मंत्री होताच अॅक्शनमोडवर,कॅमेऱ्यासमोरच महिला अधिकाऱ्यांना झापलं.
'तुमचा संतोष देशमुख करू...', तानाजी सावंत यांच्या दोन पुतण्यांना धमकी
'तुमचा संतोष देशमुख करू...', तानाजी सावंत यांच्या दोन पुतण्यांना धमकी.
धनंजय मुंडे अन् वाल्मिक कराडचे संबंध काय? अंजली दमानियांचा हल्लाबोल
धनंजय मुंडे अन् वाल्मिक कराडचे संबंध काय? अंजली दमानियांचा हल्लाबोल.
मुख्यमंत्री किंवा दादांनी बीडच पालकमंत्रिपद स्वीकाराव, कोणी केली मागणी
मुख्यमंत्री किंवा दादांनी बीडच पालकमंत्रिपद स्वीकाराव, कोणी केली मागणी.
हिवाळ्यात पावसाळा? 26-27 डिसेंबरला अवकाळी पाऊस, 'या' ठिकाणी कोसळणार
हिवाळ्यात पावसाळा? 26-27 डिसेंबरला अवकाळी पाऊस, 'या' ठिकाणी कोसळणार.
सिगारेट बट्सपासून 100 कोटींचा व्यवसाय, तरुणाची भन्नाट कल्पना
सिगारेट बट्सपासून 100 कोटींचा व्यवसाय, तरुणाची भन्नाट कल्पना.
बंगल्याच्या वाटपावरून महायुतीत धुसफूस? शिवसेनेच्या मंत्र्यांकडून खंत
बंगल्याच्या वाटपावरून महायुतीत धुसफूस? शिवसेनेच्या मंत्र्यांकडून खंत.